वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१ पृ. २६-२९
  • ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करा’—कसे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करा’—कसे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवाचा सन्मान कर’
  • ‘तुमचे द्रव्य’—म्हणजे काय?
  • गतकाळातील उदाहरणे
  • आपल्या दिवसांतील ‘स्वेच्छिक अर्पणे’
  • यहोवा आपला आदर करणाऱ्‍यांना आशीर्वाद देतो
  • यहोवाला का दिले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “पैसा येतो तरी कोठून?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१ पृ. २६-२९

‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करा’—कसे?

“तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने परमेश्‍वराचा सन्मान कर.” सुमारे २,६०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या या सुज्ञ प्रेरित शब्दांमध्ये विपुल मात्रेत यहोवाचे आशीर्वाद उपभोगण्याची गुरुकिल्ली बंदिस्त आहे; कारण लेखक पुढे असे म्हणतो: “म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.”—नीतिसूत्रे ३:९, १०.

देवाचा सन्मान करणे म्हणजे काय? यहोवाचा सन्मान करणारे ते द्रव्य काय आहे? आणि ते आपण कसे करू शकतो?

‘यहोवाचा सन्मान कर’

शास्त्रवचनांमध्ये, सन्मान यासाठी असलेला मुख्य इब्री शब्द कावोध याचा अक्षरशः अर्थ “भारीपण” असा होतो. तेव्हा, एखाद्या व्यक्‍तीचा सन्मान करणे म्हणजे, त्याला किंवा तिला महत्त्वपूर्ण, प्रभावकारी समजणे किंवा त्याच्या वा तिच्याबद्दल आदरबुद्धी बाळगणे. सन्मान यासाठी असलेला दुसरा इब्री शब्द, येकर याचाही अर्थ “मौल्यवान” आणि “किंमती वस्तू” असा होतो. तसेच, बायबलमध्ये “सन्मान” असे भाषांतरित केलेला ग्रीक शब्द टाईमे सुद्धा, बहुमान, मौल्यवान, किंमती असाच अर्थ देतो. यास्तव, एखादी व्यक्‍ती गाढ आदराने व बहुमानाने दुसऱ्‍या व्यक्‍तीचा सन्मान करते.

सन्मान देण्याचा दुसराही पैलू आहे. विश्‍वासू यहुदी मर्दखयच्या वृत्तान्ताचा विचार करा ज्याने एकदा प्राचीन पर्शियाचा राजा अहश्‍वेरोश याच्याविरुद्ध रचलेला कट हाणून पाडला होता. नंतर, जेव्हा राजाला कळाले की मर्दखयच्या या सत्कृत्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला नव्हता, म्हणून त्याने त्याचा प्रधान मंत्री हामान याला विचारले, की राजा ज्याच्यावर खूष आहे अशा मनुष्याचा सन्मान कसा केला पाहिजे. तेव्हा हामानला आपलाच सन्मान होणार असे वाटले; पण त्याचा हा ग्रह किती चुकीचा होता! हामान म्हणाला, की अशा मनुष्याला “महाराज धारण” करतात तो पोषाख घालून “ज्या घोड्यावर महाराज स्वारी करितात” त्यावर बसवावे. आणि मग, त्याला “घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यांतून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्यापुढे ललकारावे की, राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना या प्रकारे होते.” (एस्तेर ६:१-९) इथे, एखाद्या व्यक्‍तीचा सन्मान करण्यामध्ये जाहीरपणे त्याचा आदर करणे समाविष्ट होते जेणेकरून सर्व लोक त्याचा खूप आदर करू शकतील.

त्याचप्रकारे, यहोवाचा सन्मान करण्याचे दोन पैलू आहेत: व्यक्‍तिगतरीत्या त्याला बहुमान दाखवणे आणि त्याच्या नावाची घोषणा करण्याच्या कामात सहभाग व पाठबळ देऊन जाहीरपणे त्याची स्तुती करणे.

‘तुमचे द्रव्य’—म्हणजे काय?

आपले द्रव्य म्हणजे आपले जीवन, आपला समय, आपली कौशल्ये आणि आपली शक्‍ती ही होय. आणि आपल्या भौतिक वस्तू? येशूने एका गरजू विधवेला मंदिराच्या दानपेटीत अगदी कमी किंमतीच्या दोन टोल्या टाकताना पाहिल्यावर जे म्हटले त्याचा विचार करा. तो म्हणाला: “ह्‍या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी [इतर अंशदात्यांपेक्षा] आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.” (लूक २१:१-४) यहोवाच्या उपासनेत उन्‍नती व्हावी म्हणून या विधवेने आपल्या भौतिक मालमत्तेचा उपयोग केल्याबद्दल येशूने तिची प्रशंसा केली.

स्पष्टतः मग, शलमोनाने ज्या द्रव्याचा उल्लेख केला त्यात, आपल्याजवळ असलेल्या मालमत्तेचा देखील समावेश होतो. आणि ‘आपल्या सर्व उत्पन्‍नातील प्रथम फळ’ या संज्ञेचा अर्थ, तुमच्या द्रव्यातील सर्वोत्तम ते यहोवाला देणे असा होतो.

पण, भौतिक गोष्टी दिल्याने देवाचा सन्मान कसा काय होतो बरे? सर्व गोष्टी त्याच्याच मालकीच्या नाहीत का? (स्तोत्र ५०:१०; ९५:३-५) राजा दाविदाने यहोवाला केलेल्या एका कळकळीच्या प्रार्थनेत हे कबूल केले, की “सर्वकाही तुझ्यापासून प्राप्त होते.” आणि मंदिराच्या बांधकामासाठी त्याने व त्याच्या लोकांनी केलेल्या मोठ्या देणगीविषयी दावीद म्हणाला होता: “तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो.” (१ इतिहास २९:१४) म्हणजे, आपण यहोवाला काही अर्पण करत असतो तेव्हा, त्यानेच आपल्याला त्याच्या चांगुलपणामुळे दिलेल्या गोष्टी त्याला परत देत असतो. (१ करिंथकर ४:७) पण, आधी नोंद केल्याप्रमाणे, यहोवाचा सन्मान करण्यात, इतरांच्या नजरेत त्याला उंचावण्याचा समावेश होतो. शिवाय, खऱ्‍या उपासनेच्या उन्‍नतीकरता वापरल्या जाणाऱ्‍या भौतिक देणग्या देवाचा आदर करतात. अशाप्रकारे यहोवाचा आदर करण्याची बायबलमध्ये उत्तम उदाहरणे आहेत.

गतकाळातील उदाहरणे

सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी यहोवाला, इस्राएलांना रानात उपासनेचे ठिकाण प्राप्त व्हावे म्हणून निवासमंडपाची सोय करावी लागली तेव्हा, ईश्‍वरी रचनेकरता पुष्कळ बहुमूल्य वस्तू हव्या होत्या. ‘ज्याची मनापासून इच्छा असेल त्याला यहोवासाठी अर्पण’ आणू द्यावे असे यहोवाने मोशेस आज्ञापिले. (निर्गम ३५:५) तो अहवाल पुढे म्हणतो: “ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शन-मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्‍वराला अर्पण आणिले.” (निर्गम ३५:२१) खरे पाहता त्यांनी, प्रमाणापेक्षा जास्त अर्पणे आणली असल्यामुळे शेवटी “आणखी अर्पणे आणण्यास लोकांस प्रतिबंध” घालावा लागला.—निर्गम ३६:५, ६.

दुसरे उदाहरण पहा. निवासमंडपाने आपले कार्य साधल्यानंतर व मंदिराच्या बांधकामाची तयारी चालली असताना, दाविदाचा पुत्र शलमोन भविष्यात जे मंदिर बांधणार होता त्यासाठी स्वतः दाविदाने मोठी देणगी दिली. इतरांनीही त्याला सामील व्हावे म्हणून त्याने त्यांना आमंत्रण दिले तेव्हा, पुष्कळ लोक मौल्यवान वस्तूंच्या देणग्या घेऊन आले. नुसत्या चांदी आणि सोन्याचीच किंमत आजच्या चालू किंमतीनुसार जवळजवळ ५,००० कोटी इतकी होती. लोकांनी “प्रसन्‍न होऊन खऱ्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्‍वराप्रीत्यर्थ ती अर्पणे केली होती.”—१ इतिहास २९:३-९; २ इतिहास ५:१.

आपल्या दिवसांतील ‘स्वेच्छिक अर्पणे’

आपल्या दिवसांत स्वेच्छिक अर्पणांद्वारे मिळणाऱ्‍या आनंदात आपण कशाप्रकारे भाग घेऊ शकतो? राज्याचा प्रचार आणि शिष्य बनवणे हे सर्वात महत्त्वपूर्ण काम आज जगात चालले आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) आणि यहोवाने राज्याच्या पार्थिव आस्थेचे काम पूर्ण करण्याकरता आपल्या साक्षीदारांना योग्य समजून त्यांच्यावर ते सोपवले आहे.—यशया ४३:१०.

यहोवाचे साक्षीदार आज जे कार्य करत आहेत त्यासाठी पैशाची गरज आहे हे स्पष्ट आहे. राज्य सभागृहे, संमेलन गृहे, शाखा कार्यालये, कारखाने आणि बेथेल गृहे बांधून त्यांची निगा राखण्यासाठी पैसा हा लागतोच. विविध भाषांत बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने छापून त्यांचे वितरण करण्याकरताही पैसा लागतो. मग, हे सर्व संघटनात्मक खर्च कसे काय पुरवले जातात बरे? काटेकोरपणे स्वेच्छिक असलेल्या देणग्यांद्वारे!

बहुतेक देणग्या अशा लोकांकडून असतात ज्यांची परिस्थिती अगदीच बेताची असते; जसे की येशूने पाहिलेली ती विधवा. या पैलूत यहोवाचा आदर करण्याची हातची संधी घालवू न देण्याची इच्छा असल्यामुळे ते, “आपल्या शक्‍तीप्रमाणे” व केव्हा केव्हा तर आपल्या ‘शक्‍तीपलीकडेही आपण होऊन’ माफक रकमेची देणगी देतात.—२ करिंथकर ८:३, ४.

“प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो,” असे प्रेषित पौलाने करिंथमधील ख्रिस्तीजनांना लिहिले. (२ करिंथकर ९:७) संतोषाने देण्याकरता सुयोजनेची गरज आहे. पौलाने करिंथकरांना सांगितले: “आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.” (१ करिंथकर १६:२) त्याचप्रकारे, आज राज्यकार्याच्या उन्‍नतीकरता देणगी देऊ इच्छिणारे, खासगीत व स्वेच्छेने आपल्या मिळकतीतून काही रक्कम बाजूला काढून ठेवू शकतात.

यहोवा आपला आदर करणाऱ्‍यांना आशीर्वाद देतो

भौतिक समृद्धीमुळे आध्यात्मिक समृद्धी होत नसल्यामुळे, आपल्या मौल्यवान गोष्टींचा—आपला वेळ, आपली शक्‍ती, आणि आपली भौतिक संपत्ती यांचा—यहोवाचा आदर करण्याकरता उदारतेने उपयोग केल्याने आपल्याला समृद्ध आशीर्वाद मिळतील. कारण, सर्व गोष्टींचा मालक असलेला देव आपल्याला ही खातरी देतो की: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”—नीतिसूत्रे ११:२५.

राजा दाविदाच्या निधनानंतर, त्याचा पुत्र शलमोन याने यहोवाच्या निदर्शनाप्रमाणे एका भव्य मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या पित्याने साठवून ठेवलेल्या स्वेच्छिक देणग्यांचा वापर केला. शलमोनाने जोपर्यंत देवाची विश्‍वासूपणे उपासना केली तोपर्यंत “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल . . . शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.” (१ राजे ४:२५) इस्राएलने जोपर्यंत ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान केला,’ तोपर्यंत त्यांची कोठारे भरलेली होती, द्राक्षकुंड तुडूंब भरून वाहत होती.

नंतर, संदेष्टा मलाखीद्वारे यहोवा म्हणाला: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, . . . ‘मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.’” (मलाखी ३:१०) यहोवाने दिलेले हे वचन पूर्ण केल्याचा पुरावा, त्याचे सेवक आज उपभोगत असलेल्या आध्यात्मिक समृद्धतेवरून दिसतो.

राज्य आस्था वाढवण्यात आपण आपला सहभाग पूर्ण करतो तेव्हा यहोवा नक्कीच आपल्यावर खूष होतो. (इब्री लोकांस १३:१५, १६) याशिवाय, आपण जर ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटलो’ तर तो आपल्याला आपले पोषण करण्याचे वचन देतो. (मत्तय ६:३३) तेव्हा, अगदी आनंदाने ‘आपल्या द्रव्याने आपण यहोवाचा सन्मान करू या.’

[२८, २९ पानांवरील चौकट]

काहीजण निवडतात असे जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या देण्याचे विविध मार्ग

अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या दान पेटीत टाकण्यासाठी आधीच पैसे जमा करतात किंवा किती टाकणार याचा अंदाज लावतात. मंडळ्या प्रत्येक महिन्याला ही रक्कम वॉच टावर संस्थेच्या ब्रुकलिन न्यूयॉर्क मधील मुख्यालयास अथवा स्थानिक शाखा कार्यालयास पाठवतात.

स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla, 410 401, Mah., या पत्त्यावर किंवा तुमच्या राष्ट्रात कार्य करणाऱ्‍या संस्थेच्या कार्यालयासही पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.

सशर्त-देणगी योजना एका खास योजनेखाली वॉच टावर संस्थेला पैसे पाठवता येतील; ही योजना अशी आहे, की जर पैसे देणाऱ्‍याला व्यक्‍तिगत गरजेमुळे त्याचे पैसे परत हवे असतील तर त्याला ते परत केले जातील. अधिक माहितीकरता, कृपया वर दिलेल्या पत्त्यावर संस्थेशी संपर्क साधा.

योजनापूर्वक देणे रोख पैशाचे दान व पैशाच्या सशर्त देणग्या यांसोबत जगव्याप्त राज्य सेवेच्या लाभासाठी देण्याचे इतर आणखी मार्ग आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: विमा: वॉच टावर संस्थेला, आयुर्विमा पत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्ती/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही धोरणांबद्दल संस्थेला कळवावे.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्‍तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या अपेक्षांनुसार, वॉच टावर संस्थेच्या विश्‍वस्तासाठी किंवा संस्थेला मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवावे.

शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉच टावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात.

स्थावर संपत्ती: वॉच टावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्‍तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.

मृत्यूपत्रे आणि ठेवी: मालमत्ता किंवा पैसा कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला दिला जाऊ शकतो, किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेचा लाभ करणारी ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्युपत्र किंवा ठेव कराराची एक प्रत संस्थेला पाठवली पाहिजे. योजनापूर्वक देण्याच्या या व्यवस्थांमध्ये इच्छुक असलेल्यांनी, खाली दिलेल्या संस्थेच्या पत्त्यावर अथवा तुमच्या राष्ट्रांत कार्य करणाऱ्‍या संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या व्यवस्थांपैकी कोणत्याही व्यवस्थेशी संबंधित असलेल्या प्रस्तुत दस्तऐवजाची एक प्रत संस्थेला मिळाली पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा