“पैसा येतो तरी कोठून?”
वॉच टावर संस्थेचा “यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना” हा व्हिडियो पाहणारे प्रभावित होतात. विविध वंश आणि पार्श्वभूमींतील सुंदर पुरुष आणि स्त्रियांना एकवाक्यतेत हसतखेळत काम करत असल्याचे ते पाहतात. हजारो आनंदी कामगारच नव्हे, तर संस्थेच्या ब्रुकलिन मुख्यालयातील आणि वॉलकिल, न्यूयॉर्क येथील त्यांच्या शेतमळ्यांतील इमारतींचा मोठा कॉम्प्लेक्स देखील व्हिडियो पाहणाऱ्यांचे लक्ष वेधतो. अद्ययावत तंत्रज्ञान—छपाई आणि पुस्तक-बांधणीची अति-वेगवान साधनसामग्री ज्याद्वारे दर महिन्यास अनेक लाखो प्रकाशनांचे उत्पादन केले जाते तसेच संगणक साहित्याचे विविध प्रकार आणि साहित्याच्या प्रकाशनासाठी पूरक असणारे इतर अनेक विभाग या इमारतींमध्ये पाहण्यास मिळू शकतात, असे हा व्हिडियो दाखवतो.
संपत्तीचा विलक्षण खर्च यावरून दिसतो. म्हणूनच काही विचारतात, “पैसा येतो तरी कोठून?”
संस्थेच्या जागतिक मुख्यालयास भेट देणारे अभ्यागत देखील अशाच प्रकारे प्रभावित होतात. अभ्यागत, नवी ३०-मजली निवासी इमारत पाहण्यासाठी त्यांच्या माना उंचवतात; ३,००० पेक्षा अधिक स्वंयसेवकांच्या निवासाकरता असणाऱ्या इमारतींपैकी ही एक इमारत आहे. ब्रुकलिनच्या उत्तरेपासून सुमारे ११० किलोमीटर दूर असलेल्या नवीन वॉचटावर शैक्षणिक केंद्राला भेट दिल्यामुळे देखील अनेक जण मंत्रमुग्ध होतात. केंद्राचे बांधकाम चालू असून तेथे सुमारे १,२०० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे. तेथे दर वर्षी मिशनऱ्यांच्या दोन वर्गांना प्रशिक्षित करून त्यांना त्यांच्या नियुक्तींवर परदेशी पाठविण्यात येईल. या ठिकाणाहून संयुक्त संस्थानांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या १०,००० पेक्षा अधिक मंडळ्यांना मार्गदर्शन दिले जाते. जगव्याप्त अनेक शाखांनी देखील अलीकडे त्यांच्या सुविधांमध्ये विस्तार केला आहे किंवा तसे करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही सर्व कामे पार पाडण्यासाठी पैशाची मोठी पुंजी लागते. लोक विचारतात, “पैसा येतो तरी कोठून?”
आपल्यासारख्या कोणाही सर्वसामान्य लोकांकडून हा पैसा येतो, हे याचे उत्तर होय. प्रचार आणि शिक्षणाचे महत्त्वपूर्ण ख्रिस्ती कार्य पुढे नेता यावे म्हणून होता होईल तितके करण्याची इच्छा असणारे लोक जगभरात आहेत. अशा प्रकारचा स्वेच्छेचा आत्मा पूर्ववर्ती आहे.
प्राचीन इस्राएलने मांडलेले उदाहरण
सुमारे ३,५०० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी, उदार देणग्यांची गरज निर्माण झाली. यहोवाने त्याची उपासना करता यावी म्हणून मोशेला निवासमंडप किंवा “दर्शनमंडप” उभारण्याची सूचना दिली होती. ईश्वरी रीत्या दिलेल्या या आराखड्याने नाना प्रकारच्या बहुमोल गोष्टींची मागणी केली. यहोवाने आज्ञा दिली: “तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ [यहोवाप्रीत्यर्थ] आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे.” (निर्गम ३५:४-९) लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखविली? आपणास अहवाल सांगतो की, “ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शन-मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वराला [यहोवाला] अर्पण आणिले.” या ‘स्वसंतोषी अर्पणात’ क्रमशः इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली की, ‘यहोवाने जे काम करण्याची आज्ञा दिलेल्या कामासाठी आवश्यक होते त्यापेक्षा ते पुष्कळ अधिक’ होते. (निर्गम ३५:२१-२९; ३६:३-५) या लोकांनी किती निःस्वार्थतेचा, उदारतेचा आत्मा प्रदर्शित केला!
त्यानंतर सुमारे ५०० वर्षे पूर्ण होण्याच्या आतच, इस्राएलांकडून पुन्हा एकदा उदार देणग्यांची मागणी करण्यात आली. जेरूसलेममध्ये यहोवासाठी कायमस्वरूपी मंदिर उभारावे ही दावीद राजाची इच्छा, त्याचा पुत्र शलमोनाकडून पूर्ण व्हावयाची होती. त्याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींना गोळा करण्यात आणि समर्पित करण्यात स्वतः दावीदाचा सिंहाचा वाटा होता. ‘यहोवासाठी भेट’ आणा असे दावीदाने जाहीर केले तेव्हा इतर जण त्याला येऊन मिळाले. याचा परिणाम? “त्या समयी लोकांस फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ ती अर्पणे केली होती; दावीद राजासहि मोठा हर्ष झाला.” (१ इतिहास २२:१४; २९:३-९) देण्यात आलेल्या फक्त चांदी आणि सोन्याचे मूल्य चालू किंमती नुसार, सुमारे ५० अरब डॉलर इतके झाले असेल!—२ इतिहास ५:१.
कोणावरही देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली नव्हती, हे या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. ते पूर्णतः “स्वेच्छेने” आणि “खऱ्या मनाने” देण्यात आले होते. यहोवा केवळ पूर्ण अंतःकरणाने केलेल्या देणग्यांमुळेच संतुष्ट होणार होता. याप्रमाणेच, गरजवंत ख्रिश्चनांना मदत करण्यास्तव पैसे देण्याची वेळ आली तेव्हा, प्रेषित पौलाने लिहिले ते “कुपणतेने” द्यावयाचे नव्हते. त्याने पुढे म्हटले: “आपआपल्या मनांत ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:५, ७.
आजची गरज
आज देणग्यांची गरज आहे का? अर्थातच आहे, आणि वेळ पुढे जाईल तसे ती आणखीन भासेल. का बरे?
ख्रिश्चनांना या अंत समयात विशिष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.
आपण ‘व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या’ शेवटास अधिकाअधिक जवळ पोहंचत असताना प्रचार आणि प्रशिक्षणाचे हे महत्त्वपूर्ण कार्य साध्य करण्यासाठी पुष्कळ वेळ आणि साधनसंपत्ती लागते. का बरे? कारण देव राज्याचा संदेश “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” नेण्यामध्ये हे सर्व गोवलेले आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) अनेक लोक पहिल्या शतकातील यहुद्यांप्रमाणे शास्त्रवचनांमध्ये पारंगत नाहीत. वास्तविक पाहता, पृथ्वीवर राहणारे बहुसंख्य लोक बायबलशी देखील परिचित नाहीत आणि बायबल देवाचे वचन असल्याचे ते मान्य करत नाहीत. प्रचारकांना प्रशिक्षित करणे आणि दूरच्या प्रदेशांमध्ये पाठविणे अगत्याचे आहे. (रोमकर १०:१३-१५) यामध्ये गोवलेल्या बहुसंख्य भाषांचा विचार करा! ज्यांना प्रचार करण्यात आला आहे अशा लोकांकडे त्यांच्या स्वतःच्या भाषेत वाचन आणि अभ्यास करण्याकरता बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने असणे आवश्यक आहे. हे सर्व पद्धतशीरपणे पार पाडण्याकरता आणि त्यांना आध्यात्मिक प्रौढत्वाप्रत प्रगतिशीलपणे नेण्याकरता जेणेकरून ते देखील इतरांना सहाय्य करू शकतील, संघटनेची विस्तृत प्रमाणात आवश्यकता आहे.—२ तीमथ्य २:२.
‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता प्रथम गाजविली पाहिजे, तेव्हा शेवट होईल,’ असे येशूने म्हटले. (मत्तय २४:१४) म्हणूनच या महत्त्वपूर्ण कार्याची पूर्ती करण्यासाठी आपणास होता होईल तितके करण्याची हीच वेळ आहे. भौतिक धनाचे व्यावहारिक मूल्य नाहीसे होण्याआधी, आपल्या साधनसंपत्तीचा वापर करणे हाच तिचा सर्वोत्तम उपयोग असले.—यहज्केल ७:१९; लूक १६:९.
पैसा कोठे जातो?
वॉच टावर संस्था बायबल साहित्य २३० पेक्षा अधिक भाषांत तसेच अंधासाठी ब्रेल लिपीमध्ये आणि बधिरांसाठी सांकेतिक भाषेतील व्हिडियो प्रकाशित करते. त्याकरता प्रत्येक भाषेत अनुवादक आणि मुद्रितशोधकांच्या संघांची आवश्यकता असते. हे सर्व कार्य करण्याची, विशेषतः टेहळणी बुरूज नियतकालिक जे प्रत्येक महिन्यास १२१ तर एकाच वेळी १०१ भाषांत प्रकाशित होते, याची केवळ कल्पना करणे देखील विस्मयकारक आहे. तरी सुद्धा, जगभरातील लोकांना समान माहिती मिळावी व ती त्यांनी वाचावी हे जरूरीचे आहे. राज्य संदेश छपाईच्या अथवा ऑडियो किंवा व्हिडियो रेकॉर्डिंगच्या स्वरूपात उत्पन्न करण्यास्तव वापरण्यात येणाऱ्या कागदाच्या आणि इतर साहित्यांच्या किंमतींमध्ये दर वर्षी वाढ होते. अशा किंमती बांधवांनी केलेल्या अनुदानांकरवी भागवाव्या लागतात.
जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ७५,००० पेक्षा अधिक मंडळ्यांनी व्यापलेल्या क्षेत्रांत हे प्रचार आणि शिकविण्याचे कार्य पूर्ण केले जाते. त्यांचे एकीकरण करण्यासाठी आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षित प्रवासी पर्यवेक्षक प्रत्येक मंडळीला दर वर्षी सुमारे दोनदा भेट देतात. संमेलने देखील सूचना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अधिवेशनांकरता मोठ्या सुविधा भाड्याने घ्याव्या लागतात, ज्या विश्वासास फारच बळकटी देणाऱ्या आहेत. या उद्देशांसाठी तुमच्या अंशदानांचा देखील वापर केला जातो.
वर्षातून साधारणतः केवळ तीन वेळा संमेलनांचे आयोजन केले जात असले, तरी स्थानिक मंडळ्या साप्ताहिक पाच सभांकरता एकत्र येतात. (पडताळा निर्गम ३४:२३, २४.) सुवार्तेला प्रतिसाद देणाऱ्यांचे आगमन म्हणजे दर वर्षी हजारो नवीन मंडळ्यांची भर होय. संस्थेकडून करोडो रुपयांचे कर्ज घेऊन दर वर्षी शेकडो राज्यसभागृहे बांधली जातात तर इतर सभागृहांना दुरुस्त आणि विस्तृत केले जाते. हा आवर्तन निधी असून तो वारंवार उपयोगात आणला जात असला तरी त्याची मागणी सतत वाढतच आहे.
अभूतपूर्व वृद्धी झाल्याचे आणखी एक क्षेत्र म्हणजे भूतपूर्व सोवियत संघराज्याच्या हुकमतीखाली होती अशी पूर्वेकडील राष्ट्रे होत. या ठिकाणांमध्ये कार्यास मोकळीक देण्यात आली, ही प्रगतिकारक बातमी किती आनंदविणारी होती! आता यांपैकी अनेक राष्ट्रांत मिशनऱ्यांना पाठविण्यात येत आहे. काही प्रदेशांमध्ये नवीन शाखांची प्रस्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे जगव्याप्त बेथेल कुटुंबाच्या कर्मचारी वर्गाचे भाग असणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या १५,००० पेक्षा अधिक झाली आहे. अर्थातच, त्यांच्या निवासाकरता शाखा इमारती विकत घ्याव्या लागतात किंवा त्यांची बांधणी करावी लागते. या गरजेची पूर्ती करण्यासाठी तुमची अंशदाने हातभार लावतात.
हे सर्व कार्य सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांपासून दुर्लक्षित नाही. यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या प्रयत्नांना फोल ठरविण्यासाठी ते प्रयत्नांची शर्थ करतात किंवा त्यांच्यासमोर समस्या उभ्या करतात. (प्रकटीकरण १२:१७) देवाच्या लोकांचा प्रचार करण्याच्या आणि त्याच्या धार्मिक नियमांनुसार जगण्याच्या अधिकाराच्या रक्षणार्थ अधिक न्यायिक कारवाया, हा याचा अर्थ होय. याशिवाय, सैतानाच्या व्यवस्थीकरणातील युद्धाचे विध्वंसकारी परिणाम तसेच नैसर्गिक आपत्ती म्हणजे आपल्या पीडित बंधू आणि भगिनींना आणि त्यांच्यासह असणाऱ्या इतरांना बहुतेकवेळा सहाय्याचा पुरवठा करावा लागतो. ही महत्त्वपूर्ण मदत पुरवण्यासाठी तुमची अंशदाने सहाय्य करतात.
यहोवा तुम्हाला प्रतिफळ देईल
प्रभुच्या कार्यात वाढ करण्यासाठी आपला समय आणि साधनसंपत्ती यांचा उदारपणे वापर केल्यामुळे अधिक आशीर्वाद मिळतात. ते कसे काय? कारण अखेरीस सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या आहेत आणि तो आपल्याला प्रतिफळ देईल. नीतिसूत्रे ११:२५ म्हणते: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” यहोवाची उपासना पुढे नेण्यात आपण आपला भाग पूर्ण करतो तेव्हा तो खरोखरच आनंदी होतो. (इब्रीयांस १३:१५, १६) नियमशास्त्राच्या कराराधिन आवश्यक असणारी अंशदाने आणणाऱ्या प्राचीन इस्राएलांना त्याने अभिवचन दिले: “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हांकरिता वर्षितो की नाही या विषयी माझी प्रतीति पाहा.” (मलाखी ३:१०) आध्यात्मिक समृद्धता जिचा आज यहोवाचे सेवक आनंद लुटतात यावरून यहोवा त्याचे अभिवचन पूर्ण करतो याची प्रचिती मिळते.
तारणाच्या दिवसाची घोषणा करण्याचे आणि प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना जीवनाच्या मार्गावर आणण्यास मदत करण्याचे हे भव्य कार्य सदासर्वकाळ चालू राहणार नाही. (मत्तय ७:१४; २ करिंथकर ६:२) परंतु प्रभुच्या ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सर्व लोकांना एकत्र केले पाहिजे. (योहान १०:१६) आज त्या आव्हानास पूर्ण करणे किती आवश्यक आहे! धार्मिकतेच्या नवीन जगात सिंहावलोकन करत असता, ‘अखेरच्या एकत्रीकरणाच्या कार्यात माझा संपूर्ण सहभाग होता’ असे म्हणण्याद्वारे आपल्यातील प्रत्येकाला किती आनंद होईल!—२ पेत्र ३:१३.
[३० पानांवरील चौकट]
राज्य-प्रचार कार्यासाठी काही जण कशा प्रकारे देणग्या देतात
जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या: “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या वर्गणीच्या पेटीत टाकण्यासाठी अनेक जण आधीच पैसे जमा करतात किंवा किती टाकणार याचा ते अंदाज करतात. मंडळ्या प्रत्येक महिन्याला ही रक्कम वॉच टावर संस्थेच्या जवळच्या शाखा दफ्तराला पाठवतात.
दाने: स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीकडे पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान गोष्टींची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.
सशर्त-देणगी योजना: देणगी देणाऱ्याच्या मृत्यूपर्यंत, वॉच टावर संस्थेकडे पैसे सुपूर्द केले जाऊ शकतात. शिवाय, वैयक्तिक गरज भासल्यास देणगी देणाऱ्याला हे पैसे परत केले जाऊ शकतील अशी देखील योजना आहे.
विमा: वॉच टावर संस्थेला, आयुर्विमा पत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्ती/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही धोरणांबद्दल संस्थेला कळवावे.
बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र किंवा वैयक्तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या गरजेनुसार, वॉच टावर संस्थेला सुपूर्द किंवा मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवावे.
शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉच टावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळेल अशा योजनेकरवी दिली जाऊ शकतात.
स्थावर संपत्ती: वॉच टावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखी करार करण्याआधी, त्या व्यक्तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.
संकल्प आणि ठेव: वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी येथे, कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे, मालमत्ता किंवा पैसा मृत्युपत्रदत्त या दाखल किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेचा लाभ करत असलेली ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्युपत्र किंवा ठेव कराराची प्रत संस्थेला पाठवली पाहिजे.
या विषयाच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास, पुढील पत्त्यावर लिहा, Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा तुमच्या स्थानिक शाखा दफ्तराला लिहा.