वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १२/१ पृ. २८-३१
  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे उदाहरण
  • दाने देण्याच्या प्रवृत्त्या
  • सहभाग घेण्याचे मार्ग
  • राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “पैसा येतो तरी कोठून?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ‘आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करा’—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाला का दिले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १२/१ पृ. २८-३१

“सर्व चांगल्या देणगीचा” दाता

“एके प्रसंगी मला, रिफॉर्म चर्चच्या एका उपाध्यायाने बोलावले होते. मी माझे चर्च कसे सांभाळतो याची त्याला माहिती हवी होती. मी त्याला म्हटले: . . . ‘आम्ही कोणाला वेतन देत नाही; लोकात भांडणे होतील असे काहीही नाही. आम्ही कधीही वर्गणी गोळा करत नाही.’ ‘तुम्हाला पैसा कसा मिळतो?’ त्याने पृच्छा केली. मी उत्तर दिले, ‘हे पहा, डॉ.——, मी जर तुम्हाला अगदी साधी सोपी खरी गोष्ट सांगितली तर तुमचा तिच्यावर विश्‍वासच बसणार नाही. लोक अशाप्रकारे आवड दाखवतात तेव्हा, त्यांच्यासमोरून कोणतेच दान-पात्र फिरवले जात नाही. यासाठी होणारा खर्च पाहिल्यावर ते स्वतःला विचारतात, “ह्‍या सभागृहाचा काही खर्च आहे. . . . तर मग यासाठी मी कशाप्रकारे मदत देऊ शकतो?”’ त्याने जणू काय असा विचार करून माझ्याकडे पाहिले की, ‘तुम्हाला काय वाटते, मी अजाण मनुष्य आहे?’ मी म्हणालो, ‘पहा, डॉ.——, मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. . . . एखाद्याला आशीर्वाद मिळतो व त्याच्याकडे भौतिक मिळकत असते तेव्हा, प्रभूसाठी तिचा वापर करण्याची त्याची इच्छा असते. त्याच्याकडे काहीही मिळकत नसल्यास, त्याच्यामागे आम्ही टुमणे का लावावे?’”

—चार्ल्स टी. रसेल, वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष, “द वॉचटावर,” जुलै १५, १९१५.

यहोवा देवाने प्रथम दिल्यामुळे आम्ही देतो. त्याच्या देण्याची सुरवात, अपरंपार, अनिश्‍चित कालापासूनच, त्याचा “एकुलता एक पुत्र,” जी त्याची सर्वप्रथम निर्मिती होती त्यासोबत झाली. (योहान ३:१६) प्रीतीमुळे, जीवनाचे दान त्याने इतरांना दिले.

देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, आम्हासाठी यहोवाची सर्वश्रेष्ठ देणगी आहे. परंतु देवाच्या देण्याचा शेवट केवळ त्याच्या पुत्राला देण्याकरवीच होत नाही. प्रेषित पौल यहोवाच्या ‘अवर्णनीय मोफत दानाला’ “देवाची अपार कृपा” असे म्हणतो. (२ करिंथकर ९:१४, १५) या दानात, देव येशू ख्रिस्ताकरवी त्याच्या लोकांसाठी देत असलेल्या, सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा आणि प्रेमळ-कृपेचा एकूण समावेश होतो. ही अपात्री कृपा इतकी अद्‌भुत आहे की ती मानवाच्या वर्णन किंवा व्यक्‍त करण्याच्या शक्‍तीपलिकडील आहे. तरीपण, देवाच्या देण्याचे आणखी काही पैलू आहेत.

बऱ्‍याच काळाआधी, एका राजाने सुज्ञपणे व लीनतेने कबूल केले की, दान म्हणून ज्या काही चांगल्या गोष्टी त्याने दिल्या त्या खरेपणाने यहोवाच्या मालकीच्या होत्या. त्याने म्हटले: “आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] राज्यही तुझेच, तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस. . . . आम्हास या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावी असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत.”—१ इतिहास २९:११-१४.

देवाचे उदाहरण

येशू ख्रिस्ताचा शिष्य, याकोबाला यहोवा देव, प्रत्येक बाबतीत उत्तम असलेल्या कोणत्याही गोष्टीचा उगम असल्याचे माहीत होते. त्याच्याकडून केवळ परिपूर्ण दान येते. याकोबाने लिहिले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.”—याकोब १:१७.

दान देण्याच्या बाबतीत देखील, मानवापासून देव किती वेगळा आहे हे याकोबाने पाहिले. मानव उत्तम दाने देऊ शकतो परंतु सर्वदा देत नाही. ही दाने स्वार्थी मनोवृत्तीतून उद्‌भवत असतात, किंवा एखाद्या व्यक्‍तीला काही वाईट करण्यास मोहीत करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यहोवाठायी तफावत नाही; तो बदलत नाही. अशाप्रकारे, ती दाने देण्याची रीत देखील बदलत नाही. त्या सर्वदा शुद्ध असतात. त्या सर्वदा मानवजातीच्या हिताला व आनंदाला प्रेरणा देतात. त्या सर्वदा दयाळू आणि साहाय्यकारी असून, नाशकारी नसतात.

दाने देण्याच्या प्रवृत्त्या

याकोबाच्या दिवसात, लोकप्रिय धार्मिक नेते केवळ मानवांनी पाहावे या दृष्टीने दाने देत असत. त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे त्यांनी दिले. मनुष्यांकडील प्रशंसेची तीव्र इच्छा असल्यामुळे, त्यांनी त्यांच्या धार्मिक दर्जांबरोबर हातमिळवणी केली. तथापि, ख्रिश्‍चनांनी वेगळे राहावयाचे होते. येशूने त्यांना सल्ला दिला: “ह्‍यास्तव, जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस, तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर, दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा; म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.”—मत्तय ६:२-४.

ख्रिश्‍चनांनी दान देण्याचे कारण म्हणजे, इतरांची गरज भागविण्यासाठी त्यांना मदत करणे किंवा त्यांना आनंदी करण्याचे किंवा खरी भक्‍ती वाढवण्याचे असले पाहिजे. हे स्व-संतुष्टपणासाठी नाही. शेवटी, यहोवाची नजर आमच्या अंतःकरणाच्या खोल भागापर्यंत जाऊ शकते. तो दानधर्मामागील आमच्या आंतरिक प्रवृत्तीला पाहू शकतो.

यहोवाचे साक्षीदार दान देण्याच्याबाबतीत, यहोवा देव आणि त्याच्या पुत्राच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. त्यांच्याजवळ असलेले ते देतात. त्यांच्याजवळ राज्याची सुवार्ता आहे व हे इतरांच्या आशीर्वादासाठी ते देतात. नीतीसूत्रे ३:९ मध्ये लिहिलेले त्यांना माहीत आहे: “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने परमेश्‍वराचा [यहोवा, न्यूव.] सन्मान कर.” वस्तुतः प्रत्येक शाखा दप्तर, मंडळी, आणि वैयक्‍तिक जण सर्वांच्या हितासाठी, वर्गणी देण्याची उत्सुकता दाखवत असल्यामुळे बंधूवर्गाला आध्यात्मिकतेत दृढ व समृद्ध होण्यास मदत मिळते. भौतिक समृद्धता आध्यात्मिक समृद्धतेकडे निरवत नाही, परंतु यहोवाच्या कार्याच्या मदतीसाठी आध्यात्मिक समृद्धता पुरेशी भौतिक समृद्धता आणते.

सहभाग घेण्याचे मार्ग

सुवार्तेला साहाय्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे प्रत्येक जण वैयक्‍तिकरित्या मदत देऊ शकतो. एक मार्ग राज्य सभागृहांविषयी आहे. मंडळीचे सर्वच सदस्य राज्यसभागृहाचा वापर करतात. त्याच्या बांधणीसाठी किंवा भाडे, वीज, तपमान नियंत्रण (उष्णता, व थंड), तसेच त्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कोणीतरी पैसा पुरवलेला आहे. मंडळीतील प्रत्येकाचा हातभार आवश्‍यक असल्यामुळे, राज्य सभागृहात वर्गणीच्या पेट्या ठेवलेल्या असतात, व प्राप्त झालेले ऐच्छिक दान, मंडळीसाठी झालेला खर्च भागवण्यासाठी वापरले जाते. उरलेली वर्गणी मंडळीने घेतलेल्या निर्णयावरून वॉचटावर संस्थेच्या स्थानिक शाखा दप्तराला पाठवली जाऊ शकते.

जगाच्या काही भागातील सर्वसामान्य लोकांप्रत सुवार्ता न पोहचलेल्या ठिकाणी मिशनरी व खास पायनियरांच्या प्रशिक्षण तसेच मदतीसाठी संस्थेच्या शाखा दप्तराला वर्गणी पाठवली जाऊ शकते. राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यातील इतर खर्च, फिरत्या पर्यवेक्षकांच्या कार्याच्या बाबतीत आहे. पहिल्या शतकात फिरत्या पर्यवेक्षकांच्या कार्याच्यासंबंधी एक उत्तम उदाहरण मांडलेल्या, फिलिप्पैमधील मंडळीची प्रशंसा प्रेषित पौलाने केली: “माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही, तर दुसऱ्‍यांदाही पाठवले.” (फिलिप्पैकर ४:१४-१६, पं. रमाबाई भाषांतर) सर्व शाखांच्या पूर्ण वेळेच्या सेवेच्या पैलूतील या खर्चाव्यतिरिक्‍त, सर्व शाखांमध्ये असलेल्या, प्रत्येक बेथेल गृहाची तसेच तेथे राहणारे व काम करणाऱ्‍यांची व्यवस्था पहावी लागते. सुवार्तेचा सुंदर संदेश असलेल्या प्रकाशनांना लिहिण्याचा व छापण्याचा हा विशेषाधिकार निश्‍चितच देवाने दिलेला आहे, परंतु प्रकाशनांचे वितरण देखील आवश्‍यक आहे व त्यामुळे खर्च होत असतो. यानंतर संमेलने, आणि अधिवेशनांसाठी लागणारा खर्च, तसेच ‘सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थन’ करण्यासाठी न्यायालयीन खटल्यासाठीचा खर्च असतोच जे, सांगायला नको.—फिलिप्पैकर १:७.

यहोवाच्या प्रत्येक सेवकाने राज्याचा प्रचार करण्यासाठी खर्च केलेला वेळ, व तो देत असलेला भौतिक संचय देखील ऐच्छिक आहे. प्रेषित पौलाने, खऱ्‍या भक्‍तीची वाढ होण्यात मदत व्हावी म्हणून वापरण्यासाठी लागणारा पैसा नियमित बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला दिला: “आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची . . . आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे.”—१ करिंथकर १६:१, २.

एखादी व्यक्‍ती वर्गणी देते तेव्हा, तिचा वापर कसा केला जाईल हे त्या व्यक्‍तीला नेहमीच स्पष्टपणे माहीत नसते, परंतु राज्य प्रचारकार्याच्या वाढीच्या परिणामावरून हे ती पाहू शकते. १९९३ यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल, यातील अहवाल, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार ४५,००,००० पेक्षाही अधिक ख्रिश्‍चन सेवकांकरवी २०० पेक्षा अधिक देशात आणि समुद्राच्या द्वीपावर झाल्याचे दाखवतात. हे अहवाल हर्षदायक आहेत. यास्तव, दिलेले दान कितीही असले तरी ते जगभरामध्ये राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी मदत करते.

सर्वांच्या दानाला एकत्र करण्याद्वारे या कार्याला हातभार लावला जातो. काही जण अधिक देऊ शकतात, ज्यामुळे प्रचार कार्याला मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. इतरजण कमी देतात. परंतु प्रमाणात वर्गणी देणाऱ्‍यांना खजील होता कामा नये किंवा त्यांचा सहभाग अतिशय अल्प असल्याचे त्यांनी वाटू देऊ नये. यहोवाला नक्कीच असे वाटत नाही. यहोवाने, विधवेच्या अल्प देणगीची किती गुणग्राहकता बाळगली, हे दाखवताना येशूने ही गोष्ट स्पष्ट केली. “त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले, तेव्हा तो म्हणाला: ‘मी तुम्हाला खरे सांगतो ह्‍या दरिद्री विधवेने, सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.’”—लूक २१:२-४.

आमची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी, यहोवा खूष होईल अशा मार्गांनी आम्ही त्याला देऊ शकतो. आम्ही आमच्या राजाला व न्यायाधीशाला कशाप्रकारे महिमा देऊ शकतो हे स्तोत्रकर्त्याने थोडक्यात सांगितले. तो स्पष्ट करतो: “परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव.] नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.” (स्तोत्रसंहिता ९६:८) यास्तव, आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने प्रथम आम्हाला दिल्यामुळे, त्याच्या उदाहरणाचे अनुकरण आम्ही आमचे आनंदी दान देण्याकरवी करू शकतो.

[३० पानांवरील चौकट]

राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कोणत्या देणग्या देतात

▫ जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या: अनेक जण, “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी वर्गण्या—मत्तय २४:१४” हे लेबल असलेल्या वर्गणीच्या पेटीत पैसे टाकण्यासाठी आधीच जमा करतात किंवा किती टाकणार याचा ते अंदाज करतात. प्रत्येक महिन्याला मंडळ्या तिच्यातील रक्कम संस्थेच्या मुख्यालयाला, ब्रुकलीन, न्यूयॉर्क येथे किंवा जवळच्या शाखा दप्तराला पाठवतात.

▫ दाने: स्वेच्छेने दिलेल्या पैशाच्या देणग्या, थेटपणे Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah. येथे, किंवा संस्थेच्या स्थानिक शाखेला पाठवल्या जाऊ शकतात. दागिने किंवा इतर मौल्यवान गोष्टींची देखील देणगी दिली जाऊ शकते. या वर्गण्या थेट दान आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्र देखील यासोबत पाठवावे.

▫ सशर्त योजना: देणगी देणाऱ्‍याच्या मृत्यूपर्यंत, वॉचटावर संस्थेकडे पैसे सुपूर्द केले जाऊ शकतात, शिवाय, वैयक्‍तिक गरज भासल्यास देणगी देणाऱ्‍याला हे पैसे परत केले जाऊ शकतील अशी देखील योजना आहे.

▫ विमा: वॉचटावर संस्थेला, आयुर्विमापत्राचा उपभोग घेणारी किंवा सेवानिवृत्तीत/निवृत्तीवेतन योजना असे नाव दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही धोरणांबद्दल संस्थेला कळवावे.

▫ बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाणपत्र, किंवा वैयक्‍तिकाचे सेवानिवृत्ती खाते, स्थानिक बँकेच्या गरजेनुसार, वॉचटावर संस्थेला सुपूर्द किंवा मृत्यूनंतरचे देय म्हणून दिले जाऊ शकते. अशा कोणत्याही योजनेबद्दल संस्थेला कळवले पाहिजे.

▫ शेअर भाग आणि बंधपत्रे: वॉचटावर संस्थेला शेअर भाग आणि बंधपत्रे, थेट दानाकरवी किंवा दात्याला त्याची प्राप्ती सतत मिळणाऱ्‍या योजनेकरवी दिली जाऊ शकतात.

▫ स्थावर संपत्ती: वॉचटावर संस्थेला विक्रीयोग्य स्थावर संपत्ती, थेट दानाकरवी किंवा दाता त्याच्या किंवा तिच्या जीवनभर त्यावर जगू शकतो, अशी जीवन संपत्ती राखून ठेवण्याद्वारे दिली जाऊ शकते. स्थावर संपत्तीचा लेखीकरार करण्याआधी, त्या व्यक्‍तीने संस्थेशी संपर्क साधला पाहिजे.

▫ संकल्प आणि ठेव: वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटी ऑफ पेन्सिलवेनियाला, कायद्याने निष्पादन केलेल्या मृत्युपत्राद्वारे, मालमत्ता किंवा पैसा मृत्युपत्रदत्त या दाखल किंवा संस्थेला उपभोग घेणारी ठेव करार हे नाव देण्याद्वारे दिला जाऊ शकतो. धार्मिक संस्थेचा लाभ करत असलेली ठेव, विशिष्ट कराचे फायदे देऊ शकते. मृत्यूपत्र किंवा ठेव कराराची प्रत संस्थेला पाठवली पाहिजे.

या विषयाच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास, Watch Tower Bible and Tract Society of India, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah. येथे, किंवा या मासिकाच्या प्रकाशकाला लिहा.

[३१ पानांवरील चित्रं]

तुमच्या वर्गण्यांचा वापर कसा केला जातो

१. बेथेल स्वयंसेवक

२. शाखा दप्तरांची बांधणी

३. अरिष्ट मदत

४. राज्य सभागृहे

५. मिशनरी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा