वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp25 क्र. १ पृ. १०-१३
  • युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव सर्व मानवी सरकारांचा अंत करेल
  • देव पाप काढून टाकेल
  • सैतानाचा आणि दुष्ट स्वर्गदूतांचा देव नाश करेल
  • युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • मध्य पूर्व देशांमध्ये युद्ध—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
wp25 क्र. १ पृ. १०-१३
युद्धाने उद्ध्‌वस्त झालेल्या एका शहरात एका ढिगाऱ्‍यावर बसून विचार करत असलेला एक सैनिक.

मानव युद्धांचा अंत करू शकत नाहीत

युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?

बायबलमध्ये सांगितलंय की कोणताही मानव नाही, तर देवच “सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत” करेल.—स्तोत्र ४६:९.

देव सर्व मानवी सरकारांचा अंत करेल

देव सर्व मानवी सरकारांचा एका युद्धात अंत करेल. त्या युद्धाला बायबलमध्ये हर्मगिदोनa म्हटलंय. (प्रकटीकरण १६:१६) त्या वेळी ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी’ एकत्र केलं जाईल. (प्रकटीकरण १६:१४) म्हणूनच हर्मगिदोन हे सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध असेल.

देव सर्व मानवी सरकारांना काढून टाकेल आणि त्यांच्या जागी त्याचं राज्य, म्हणजे त्याचं सरकार आणेल. हे सरकार स्वर्गातून राज्य करेल आणि त्याचा कधीच नाश होणार नाही. (दानीएल २:४४) देवाने या राज्याचा राजा म्हणून त्याच्या मुलाला, म्हणजे येशू ख्रिस्ताला निवडलंय. (यशया ९:६, ७; मत्तय २८:१८) येशूने याच राज्यासाठीb आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं होतं. (मत्तय ६:९, १०) संपूर्ण जगावर राज्य करणारं हे एकमेव सरकार असेल.

पण मानवी शासकांप्रमाणे येशू त्याच्या अधिकाराचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणार नाही. तो सगळ्यांशी न्यायाने वागेल आणि कोणताही भेदभाव करणार नाही. त्यामुळे कोणालाही अशी चिंता नसेल, की आपण एका विशिष्ट वंशाचे, राष्ट्राचे किंवा संस्कृतीचे असल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. (यशया ११:३, ४) लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागणार नाही. का बरं? कारण सगळ्यांचं भलं करण्यासाठी येशूचं प्रत्येकाकडे लक्ष असेल. “साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची; दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल. . . . तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.

देवाचं राज्य पृथ्वीवरच्या सगळ्या विध्वंसक शस्त्रांचा नाश करेल. (मीखा ४:३) ज्यांना युद्ध करायचंच आहे आणि जे इतरांना शांतीने जगू देणार नाहीत अशा दुष्ट लोकांचाही तो नाश करेल. (स्तोत्र ३७:९, १०) त्यामुळे प्रत्येकाला, मग तो पुरुष असो, स्त्री असो किंवा लहान मूल असो, ते पृथ्वीवर कुठेही गेले तरी त्यांना अगदी सुरक्षित वाटेल.—यहेज्केल ३४:२८.

देवाच्या शासनाखाली सगळे लोक अतिशय चांगल्या परिस्थितीत राहतील. ज्या कारणांमुळे लोक आज लढतात ती कारणंच हे सरकार काढून टाकेल; जसं की गरिबी, उपासमार आणि राहायची अपुरी सोय. प्रत्येकाला भरपूर प्रमाणात पौष्टिक अन्‍न आणि राहायला आरामदायी घर असेल.—स्तोत्र ७२:१६; यशया ६५:२१-२३.

देवाच्या शासनाखाली युद्धाचे सगळे वाईट परिणाम काढून टाकले जातील. युद्धामुळे झालेल्या शारीरिक, तसंच मानसिक आणि भावनिक जखमासुद्धा भरून काढल्या जातील. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांनाही पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. (यशया २५:८; २६:१९; ३५:५, ६) ताटातूट झालेली कुटुंबं पुन्हा एकत्र येतील आणि युद्धाच्या दुःखद आठवणींसारख्या “आधीच्या गोष्टी नाहीशा” होतील.—प्रकटीकरण २१:४.

देव पाप काढून टाकेल

देवाचं सरकार संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा सर्व लोक एकाच खऱ्‍या देवाची, म्हणजे “प्रेमाचा आणि शांतीचा देव” यहोवाc याची उपासना करतील. (२ करिंथकर १३:११) एकमेकांसोबत शांतीने कसं राहायचं हे लोक शिकतील. (यशया २:३, ४; ११:९) आणि जे लोक शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करतील ते पापाच्या सगळ्या परिणामांपासून मुक्‍त होतील.—रोमकर ८:२०, २१.

सैतानाचा आणि दुष्ट स्वर्गदूतांचा देव नाश करेल

देवाचं सरकार लोकांना युद्ध करायला भडकवणाऱ्‍या सैतानाचा आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांचा नाश करेल. (प्रकटीकरण २०:१-३, १०) त्यांचा कोणताही वाईट प्रभाव नसल्यामुळे सगळीकडे “विपुल शांती असेल.”—स्तोत्र ७२:७.

युद्धाचा आणि हिंसक संघर्षांचा अंत करायचं देवाचं वचन पूर्ण होईल अशी तुम्ही पक्की खातरी ठेवू शकता. कारण देवाकडे युद्धांचा अंत करायची ताकद आणि तसं करायची इच्छाही आहे.

  • युद्ध आणि हिंसेचा अंत करण्यासाठी लागणारी बुद्धी आणि अफाट शक्‍ती देवाकडे आहे. (ईयोब ९:४) त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही.—ईयोब ४२:२.

  • लोकांना दुःखात पाहून देवाला फार वाईट वाटतं. (यशया ६३:९) “हिंसाचाराची आवड असलेल्यांचा तो द्वेष करतो.”—स्तोत्र ११:५.

  • देव नेहमीच दिलेला शब्द पाळतो. तो खोटं बोलूच शकत नाही.—यशया ५५:१०, ११; तीत १:२.

भविष्यात देव खरी आणि कायम टिकणारी शांती आणेल.

एक कुटुंब नंदनवनात आनंदाने एका डोंगरावर बसलेलं आहे आणि शेजारी घोडे चरत आहेत.

देवच युद्धांचा अंत करेल

देवाने आतापर्यंत युद्धांचा अंत का केला नाही?

देवाने आतापर्यंत युद्धांचा अंत का केला नाही, असा प्रश्‍न कदाचित तुमच्या मनात असेल. या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी jw.org/mr या बेवसाईटवर “देवाने दुःख का राहू दिलं?” हा व्हिडिओ पाहा.

a jw.org/mr या बेवसाईटवर “हर्मगिदोन म्हणजे काय?” हा लेख वाचा.

b jw.org/mr या बेवसाईटवर “देवाचं राज्य काय आहे?” हा व्हिडिओ पाहा.

c यहोवा हे देवाचं नाव आहे.—स्तोत्र ८३:१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा