वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp25 क्र. १ पृ. १४-१५
  • युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • युद्धाचे भीषण परिणाम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
wp25 क्र. १ पृ. १४-१५
युद्धामध्ये हात गमावलेला एक वयस्कर माणूस व्हिलचेअरवर बसून बाहेर आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेत आहेत.

युद्ध आणि संघर्ष असतानाही तुम्ही शांती अनुभवू शकता

पूर्वी सैन्यात असलेला गॅरी म्हणतो, “बायबल अभ्यास करण्याआधी मला कळतच नव्हतं, की जगात इतकी क्रूरता, अन्याय आणि समस्या का आहेत. पण आता मला मनाची शांती आहे. मला माहीत आहे, की लवकरच देव हे जग अशा एका जगात बदलून टाकेल जिथे प्रत्येकाला खूप सुरक्षित वाटेल.”

बायबलमुळे फक्‍त गॅरीलाच नाही तर आणखी बऱ्‍याच जणांना मदत झाली आहे.

बायबलमध्ये सांगितलंय: “हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस.”—स्तोत्र ८६:५.

यामुळे कशी मदत होते: “या वचनामुळे मला खातरी मिळते, की यहोवा खूप दयाळू आहे. मला माहीत आहे, की पूर्वी युद्धात भाग घेऊन मी जे काही केलंय त्यासाठी यहोवा मला नक्की माफ करेल.”—विल्मार, कोलंबिया.

बायबलमध्ये सांगितलंय: “मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवतोय; जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.”—यशया ६५:१७.

यामुळे कशी मदत होते: “लष्करात असताना मी जे काही पाहिलं, अनुभवलं त्यामुळे पुढे मला मानसिक आजाराचा आणि नैराश्‍याचा सामना करावा लागला. पण बायबलमधल्या या वचनामुळे मला सतत याची आठवण होते, की यहोवा माझ्या मनात उठलेलं हे विचारांचं वादळ शांत करेल आणि युद्धाच्या वाईट आठवणी कायमच्या पुसून टाकेल. पुन्हा कधीच त्या माझ्या मनात, माझ्या विचारांत डोकावणार नाहीत. खरंच, यहोवाकडून मला मिळालेली ही किती मोठी भेट आहे!”—झफिरा, अमेरिका.

बायबलमध्ये सांगितलंय: “त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.”—स्तोत्र ७२:७.

यामुळे कशी मदत होते? “मी नेहमी या शब्दांचा विचार करते आणि मला जाणवतं, की लवकरच युद्ध आणि युद्धामुळे झालेल्या वाईट गोष्टी कायमच्या काढून टाकल्या जातील आणि पुन्हा कधीच आपल्याला आपल्या जवळच्या लोकांच्या सुरक्षेची काळजी वाटणार नाही.”—ओलेक्सान्द्रा, युक्रेन.

बायबलमध्ये सांगितलंय: “मेलेले जिवंत होतील. . . . मातीत मिळालेल्या रहिवाशांनो, जागे व्हा आणि जल्लोष करा!”—यशया २६:१९.

यामुळे कशी मदत होते? “तुत्सी लोकांविरूद्ध झालेल्या जातिसंहारात माझ्या कुटुंबातले जवळजवळ सगळेच लोक मारले गेले. पण या वचनामुळे मला खातरी मिळते, की मला माझे सगळे लोक पुन्हा भेटतील. त्यांना जेव्हा पुन्हा जिवंत केलं जाईल तेव्हा त्यांचे आनंदी चेहेरे पाहण्याची आणि त्यांचा आवाज ऐकण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”—मेरी, रुआंडा.

बायबलमध्ये सांगितलंय: “थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील . . . पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.”—स्तोत्र ३७:१०, ११.

यामुळे कशी मदत होते? “युद्ध संपलं तरी अन्याय आणि वाईट लोक अजूनही आहेत. पण बायबलमधल्या या वचनांमुळे मला खूप बळ मिळतं. यहोवा सगळं काही पाहतो आणि माझी परिस्थिती समजून घेतो. तो वचन देतो, की हे सगळं लवकरच संपेल आणि या गोष्टी पुढे कोणी आठवणारसुद्धा नाहीत.”—दलेर, ताजिकिस्तान.

वर उल्लेख केलेले हे सगळे लोक यहोवाच्या लाखो साक्षीदारांपैकी आहेत आणि मनाची शांती मिळवायला बायबलमुळे त्यांना मदत झाली आहे. यहोवाचे साक्षीदारांनी वांशिक, राष्ट्रीय, तसंच वेगवेगळ्या जमातींमध्ये आणि लोकांमध्ये असलेल्या द्वेषावर मात केली आहे. (इफिसकर ४:३१, ३२) राजकारणाच्या बाबतीत ते कोणाचीही बाजू घेत नाहीत. शिवाय ते हिंसाचारातही सहभाग घेत नाहीत.—योहान १८:३६.

यहोवाचे साक्षीदार एका प्रेमळ कुटुंबाप्रमाणे एकमेकांना मदत करतात. (योहान १३:३५) उदाहरणार्थ, आधी उल्लेख केलेली ओलेक्सान्द्रा हिला युद्धामुळे तिच्या बहिणीसोबत दुसऱ्‍या देशात पळून जावं लागलं. ती म्हणते: “सीमा पार करताच आम्हाला तिथले साक्षीदार दिसले. ते आम्हाला घ्यायला आले होते. त्यांच्या मदतीमुळेच एका नवीन देशात राहायला, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला आम्हाला मदत झाली.”

आम्ही तुम्हालाही आमच्या सभांना यायचं आमंत्रण देतो. तिथे बायबलमधल्या शांतीच्या संदेशाबद्दल शिकवलं जातं आणि तो कसा लागू करायचा ते सांगितलं जातं. यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेचं जवळचं ठिकाण शोधण्यासाठी किंवा एखाद्या यहोवाच्या साक्षीदारासोबत कायम जीवनाचा आनंद घ्या! या प्रकाशनातून चर्चेद्वारे मोफत बायबल अभ्यासाची विनंती करण्यासाठी jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा