वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp25 क्र. १ पृ. ९
  • युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पाप
  • मानवी सरकार
  • सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत
  • युद्ध आणि संघर्षांचा अंत कसा होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • देवाचा मानवांसाठी काय संकल्प आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • युद्धांची आणि संघर्षांची आपल्या सगळ्यांनाच झळ कशी बसते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
  • लोक का मरतात?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२५
wp25 क्र. १ पृ. ९

युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?

युद्ध आणि हिंसक संघर्षांची मूळ कारणं काय आहेत आणि अशा भयंकर घटना अजूनही का घडतात हे बायबलमध्ये सांगितलंय.

पाप

देवाने आपल्या पहिल्या आईवडिलांना, म्हणजे आदाम आणि हव्वाला त्याच्या प्रतिरूपात बनवलं होतं. (उत्पत्ती १:२७) याचा अर्थ ते शांती आणि प्रेम यांसारखे देवाचे गुण स्वाभाविकपणे दाखवू शकत होते. (१ करिंथकर १४:३३; १ योहान ४:८) पण आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडली आणि पाप केलं. याचा परिणाम असा झाला, की आपल्या सगळ्यांना त्यांच्यापासून वारशाने पाप आणि मरण मिळालं. (रोमकर ५:१२) वारशाने मिळालेल्या या पापामुळे माणसांमध्ये चुकीचे विचार आणि चुकीची कामं करायची प्रवृत्ती आहे.—उत्पत्ती ६:५; मार्क ७:२१, २२.

मानवी सरकार

देवाने माणसांना माणसांवर राज्य करण्यासाठी बनवलंच नव्हतं. बायबल म्हणतं: “मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही. त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.” (यिर्मया १०:२३) त्यामुळेच मानवी सरकारं युद्ध आणि हिंसा कायमची काढून टाकू शकत नाहीत.

सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत

बायबल म्हणतं, की “सगळं जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहान ५:१९, तळटीप) ‘तो दुष्ट’ म्हणजे सैतान. तो अतिशय खूनी प्रवृत्तीचा आहे. (योहान ८:४४) सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत आज लोकांना युद्ध आणि हिंसा करायला भडकवतात.—प्रकटीकरण १२:९, १२.

युद्धाची आणि हिंसेची मूळ कारणं माणूस नाहीशी करू शकत नाही. पण देव ते नक्कीच करू शकतो

धर्म आणि युद्ध

धर्म सहसा युद्धाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देतात. अशा खोट्या धर्मांना बायबलमध्ये “मोठी बाबेल” असं नाव दिलंय. (प्रकटीकरण १८:२) ‘पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या सर्वांच्या रक्‍तासाठी’ देव मोठ्या बाबेलला जबाबदार ठरवतो. (प्रकटीकरण १८:२४) याबद्दल जास्त माहितीसाठी jw.org/mr या वेबसाईटवर, “मोठी बाबेल” या शीर्षकाखाली दिलेली माहिती पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा