ख्रिस्ती जीवन
चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा?
जानेवारी २०१८ पासून, आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका हिच्या पहिल्या पानावर चर्चेसाठी असलेले नमुने दिले जात आहेत. आपण त्यांचा वापर कसा करू शकतो?
विद्यार्थी भाग सादर करताना: भाग सादर करताना चर्चेसाठी असलेल्या नमुन्यामध्ये दिलेल्या प्रश्नाचा, वचनाचा आणि पुढच्या भेटीसाठी असलेल्या प्रश्नाचा तुम्ही वापर केला पाहिजे. पण, याचा अर्थ चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांच्या व्हिडिओमध्ये वापरलेले शब्द जसेच्या तसे वापरावेत असा होत नाही. हवं असेल तर तुम्ही वेगळी सेटींग, प्रस्तावना, तर्क करण्याची वेगळी पद्धत वापरू शकता. तसंच, तुम्ही सादर करत असलेल्या भागात जरी साहित्य देण्याबद्दल काही विशेष सूचना नसल्या, तरी शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं साहित्य तुम्ही देऊ शकता.
प्रचारकार्यात असताना: प्रचारकार्यात वेगवेगळ्या विषयांवर बोलता यावं म्हणून चर्चेसाठी असलेले नमुने देण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीला जर खरोखरच आणखी जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही चर्चा पुढे चालू ठेवू शकता. यासाठी तुम्ही पुनर्भेटीसाठी असलेल्या नमुन्यातल्या प्रश्नाचा किंवा वचनाचा वापर करू शकता. तुम्ही नमुन्यात थोडासा फेरबदल करून किंवा पूर्णपणे वेगळी प्रस्तावना वापरून बोलू शकता. आधीच्या महिन्यात वापरलेला विषय किंवा दुसरं एखादं वचन तुमच्या क्षेत्रात जास्त परिणामकारक आहे का? तुमच्या क्षेत्रातले लोक चालू घडामोडींबद्दल किंवा नुकत्याच आलेल्या एखाद्या बातमीबद्दल बोलायला जास्त उत्सुक आहेत का? या प्रश्नांचा विचार करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर करू शकता. पण हे सर्व करत असताना आपला मुख्य उद्देश पुढील शब्दांप्रमाणे असला पाहिजे: “आनंदाच्या संदेशासाठी मी सर्वकाही करतो, जेणेकरून मला तो इतरांना सांगता यावा.”—१कर ९:२२, २३.