वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. ८
  • पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन पत्रिका आकर्षक रूपात!
    आमची राज्य सेवा—२०१४
  • पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. ८
एक बहीण ‘दुःख कधी संपेल का?’ या पत्रिकेचा वापर करून बस स्टॉपवर असलेल्या एका स्त्रीला अनौपचारिकपणे साक्ष देत आहे.

ख्रिस्ती जीवन

पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?

२०१८ जानेवारीपासून जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका  या पुस्तिकेच्या पहिल्या पानावर चर्चेसाठी नमुने दिले जाऊ लागले. घरमालकाला फक्‍त प्रकाशनं देण्याऐवजी त्याच्यासोबत चर्चा करण्याचं प्रोत्साहन आपल्याला देण्यात आलं. प्रचारकांना ही पद्धत शिकता यावी म्हणून चर्चेसाठी असणाऱ्‍या नमुन्यांचे व्हिडिओ दाखवण्यात येऊ लागले. फक्‍त बायबलचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल हे या व्हिडिओंमध्ये दाखवलं जाऊ लागलं. पण म्हणून याचा असा अर्थ होतो का, की आपण घरोघरच्या प्रचारकार्यात लोकांना प्रकाशनं देऊच नये? अजिबात नाही. कारण पत्रिकांचा वापर करून चर्चेची सुरुवात करणंसुद्धा एक प्रभावकारी पद्धत आहे. आपण कोणतीही पत्रिका खाली दिलेल्या पद्धतीने देऊ शकतो:

  1. १. पहिल्या पानावर दिलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायला सांगा.

  2. २. मग बायबल त्या विषयाबद्दल काय सांगतं ते दुसऱ्‍या पानाच्या सुरुवातीला असलेल्या वचनातून दाखवा. वेळ असेल तर पत्रिकेच्या आत दिलेली माहिती वाचून त्यावर चर्चा करा.

  3. ३. मग ती पत्रिका घरमालकाला द्या आणि त्यांना ती त्यांच्या वेळेत वाचायला सांगा.

  4. ४. निघण्याआधी पुढच्या भेटीसाठी “थोडा विचार करा” या उपशीर्षकाखाली दिलेला प्रश्‍न दाखवा.

‘भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?’ ही पत्रिका आणि त्यातले वैशिष्ट्यं दाखवणारे १ ते ४ अंक

पुनर्भेटीत तुम्ही त्या प्रश्‍नाचं उत्तर द्या आणि पुढच्या भेटीसाठी आणखी एक प्रश्‍न विचारा. हा प्रश्‍न तुम्ही आपल्या वेबसाईटवरून निवडू शकता किंवा मग तुम्ही दिलेल्या पत्रिकेच्या मागे असणाऱ्‍या प्रकाशनातून निवडू शकता. आणि योग्य वेळी देवाकडून आनंदाची बातमी!  या माहितीपत्रकातून किंवा शिकवण्याच्या साधनांमध्ये अभ्यासासाठी असणाऱ्‍या प्रकाशनातून अभ्यास सुरू करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा