वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. १६
  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. १६
कोलाज: १. एक बहीण आणि तिचा पती प्रचारकार्यात एका स्त्रीसोबत बोलत असताना “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या माहितीपत्रकाचा वापर करत आहेत. २. तीच बहीण आठवड्यादरम्यानच्या सभेत भाग सादर करताना “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या माहितीपत्रकाचा वापर करत आहे.

ख्रिस्ती जीवन

चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?

चर्चेसाठी असलेले नमुने सहसा खूप विचार करून तयार केले जातात आणि बऱ्‍याच प्रचारकांना त्यांचा वापर केल्यामुळे प्रचारकार्यात चांगले परिणाम दिसून आले आहेत. पण, जगातल्या सगळ्याच भागांत परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे सेवाकार्य करताना  प्रचारक आपल्या क्षेत्रातली परिस्थिती लक्षात घेऊन संभाषण सुरू करण्यासाठी वेगळी पद्धत किंवा वेगळा विषय निवडू शकतात. पण खास मोहीम असते त्या वेळी सगळ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करण्याची जी जबाबदारी येशूने आपल्यावर सोपवली आहे ती पार पाडणं हेच आपलं ध्येय आहे.​—मत्त २४:१४.

पण विद्यार्थी भाग सादर करण्याच्या बाबतीत काय? याबद्दल जून २०२० च्या कार्यपुस्तिकेत पान ८ वर ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यात आता बदल करण्यात आला आहे. तो बदल पुढीलप्रमाणे आहे: विद्यार्थी भाग सादर करताना, प्रचारकांनी ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका  यात असलेल्या नमुन्यांचा विषय वापरला पाहिजे. पण ते आपल्या क्षेत्रातल्या परिस्थितीप्रमाणे त्या विषयावर आधारित एखादा वेगळा प्रश्‍न, वचन, पुढच्या भेटीसाठी असलेला प्रश्‍न किंवा सेटिंग वापरू शकतात. काही वेळा तुमच्या विद्यार्थी भागासोबत एखादी विशिष्ट सूचना दिलेली असेल. अशा वेळी तुम्ही त्या सूचनेप्रमाणे तो भाग सादर केला पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा