ख्रिस्ती जीवन
तुम्हीपण प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करू शकता!
यहोवाने दिलेली जबाबदारी आपल्याला पार पाडता येईल का, अशी शंका मोशेला वाटत होती. (निर्ग ४:१०, १३) तुम्हालापण कधी असं वाटलं आहे का? तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत आहात का? आपल्याला घरोघरचं प्रचारकार्य जमेल का, अशी शंका तुम्हाला वाटते का? किंवा तुम्ही एक तरुण साक्षीदार असाल आणि शाळेत तुमच्या सोबत्यांना साक्ष द्यायला कदाचित तुम्ही घाबरत असाल. किंवा मग एखाद्या प्रकारचं सार्वजनिक साक्षकार्य किंवा टेलिफोनद्वारे साक्षकार्य करायला तुम्हाला भीती वाटत असेल. तर मग अशा वेळी यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला ताकद द्यावी अशी त्याच्याकडे कळकळून प्रार्थना करा. (१पेत्र ४:११) आणि यहोवाने तुम्हाला दिलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला लागेल ती मदत पुरवेल अशी पक्की खात्री बाळगा.—निर्ग ४:११, १२.
धैर्यवान . . . प्रचारक हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
सिस्टर ओयामा हिला कोणत्या गोष्टीची भीती वाटत होती?
तिला हवी असलेली ताकद आणि धैर्य कुठून मिळालं?—यिर्म २०:७-९
आपली सेवा वाढवल्यामुळे तिला कसा फायदा झाला?
प्रचारकार्यात येणाऱ्या कोणत्या समस्यांचा सामना करण्यासाठी यहोवा आपली मदत करू शकतो?