वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९१ पृ. १
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या
    आपली राज्य सेवा—२०१५
  • अनुभवी प्रचारकांकडून शिका
    आपली राज्य सेवा—२०१५
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—क्षेत्रात तुमच्यासोबत काम करणाऱ्‍या प्रचारकाला मदत करा
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km १०/९१ पृ. १

पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा

भाग ३: इतरांच्या मदतीस हातभार लावणे

१ सेवकपणाची तालीम देण्याविषयीचे उत्तम उदाहरण म्हणून पौल हा वडील बंधू व तीमथ्य हा भक्‍तीमान युवक यांजमधील नातेसंबंधाचा उल्लेख केला जातो. (१ करिंथ ४:१७) तीमथ्याला जे ज्ञान व तालीम मिळाली ती त्याने इतरांना द्यावी हा त्याला पौलाकडून निर्देश मिळाला. (२ तीम. २:१, २) हीच पद्धत आज आपल्याला आपल्या मंडळीत अनुसरता येईल.

२ इतरांना तालीम द्याः भारतात गेल्या तीन वर्षापेक्षा सध्या ३,५०० अधिक प्रचारक आहेत ही गोष्ट आपण लक्षात आणल्यास तालीम देण्याची केवढी गरज आहे ते स्पष्ट होते. बहुतेकांना प्रचारकांच्या अनुभवाकरवी तालीम प्राप्त होण्याचा लाभ मिळू शकेल. क्षेत्रकार्यात केवळ एक वा दोन तास खर्च करणाऱ्‍या एका भगिनीला अनुभवी प्रचारकाने मदत दिली तेव्हा तिला घरमालकाशी प्रभावी संभाषण करण्याचे शिकून घेता आले. यामुळे क्षेत्रकार्यात सहभागी होण्याची तिची नकारात्मक वृत्ती गायब झाली व ती सुवार्तेची आवेशी प्रचारक बनली. आता तर ती एक कुशल पायनियर आहे आणि जेव्हा ती आपल्या गतकाळाकडे पाहते तेव्हा म्हणतेः “सेवकपणात काय बोलायचे हेच मला शिकून घेण्याची गरज होती व ते केल्यामुळे मला हे सेवकपण आनंदी वाटू लागले.”

३ तुम्ही वडील, उपाध्य सेवक, पायनियर किंवा अनुभवी प्रचारक असाल तर इतरांच्या प्रगतिसाठी तुम्हाला काय करता येणे शक्य आहे? याचे पहिले पाऊल हे की, तुम्ही मंडळीच्या तुमच्या पुस्तक अभ्यास चालकांना याविषयी बोला व दुसऱ्‍या प्रचारकाला मदत देण्याची तुमची तयारी आहे हे सांगा.

४ संघटीत होऊन तयारीत राहाः एकत्र मिळून काम करण्यासाठी निश्‍चित योजना आखल्यामुळे साहाय्य मिळते. तुम्हासोबत काम करणाऱ्‍याला अनिश्‍चितपणा किंवा निराश बनल्याचे सुरवातीला वाटेल; पण आपणासोबत कोणी आहे व तो गरजेच्या वेळी आपल्याला मदत करील ही जाणीव त्याला बळ देईल. (उप. ४:९) यासाठी, जेथे पवित्र शास्त्रीय विषयाबद्दल बोलण्याची इच्छा प्रदर्शित करणारे लोक अधिकपणे आढळू शकतील अशा क्षेत्राची शक्यतो निवड करा. हे नवीन लोकांना संभाषणात सहभाग घेण्यासाठी व अधिक आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी मदत करील.

५ या तालमीत प्रगतिशील राहण्यासाठी आस्थेवाईकांची पुनर्भेट कशी घ्यावी याचीही चर्चा करणे लाभदायक ठरेल. यासाठी सुरवातीच्याच भेटीत पाया रचला पाहिजे. घरमालकाला, नंतरच्या भेटीत ज्याचे उत्तर देता येईल असा प्रश्‍न टाकून, तो पाया साध्य करता येईल. अनुभव नसणाऱ्‍यांना तालीम देतेवळी त्यांच्यासोबत बसून तयारी करण्याची व नंतर सोबत त्या भेटीला जाण्याची खात्री असू द्या. एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु केला आहे आणि नव्या प्रचारकाला तो स्वतः चालविण्यास जमू शकत नसल्याचे वाटत असेल तेव्हा अधिक अनुभवी प्रचारकाने, नवा प्रचारक स्वतः घेऊ शकेल अशा स्थितीस येईपर्यंत, त्याच्यासमक्ष तो काही वेळा चालवून दाखवावा.

६ संस्थेमध्ये नवीन लोकांची अधिक भर पडत असता क्षेत्र कार्याच्या अनुषंगाने तत्परतेचा शैक्षणिक कार्यक्रम योजला पाहिजे हे उघड दिसत आहे. याकरता, ज्यांनी प्रचारकार्यातील आपली गुणवत्ता वाढवली आहे अशांकडून मदत मिळण्याची गरज आहे. तुम्ही कोणाला मदत केली तर काही काळातच हा देखील “इतरांना शिकवण्यास योग्य” ठरू शकेल.—२ तीम. २:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा