दुसऱ्यांचे भले करण्याची आमची जबाबदारी पूर्ण करणे
१ प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना असा सल्ला दिलाः “परोपकार व दानधर्म करणे विसरु नका.” (इब्री. १३:१६) प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची आपल्या बांधवांना मदत देण्याची तयारी, त्यांचे देव तसेच एकमेकांवर केवढे गाढ प्रेम आहे याची बळकटी पुरविणार होते. (योहान १३:१५) आम्हाला देखील दुसऱ्यांचे भले करण्याचे व इतरांमध्ये सहभागी करण्याचे उत्तेजन दिले आहे.
२ हे साध्य करण्यासाठी यहोवाने आम्हाला आध्यात्मिकरित्या चांगली भरवणूक करण्याची व चांगली तयारी करण्याची तरतुद पुरविली आहे. वॉचटावर तसेच अवेक! च्या प्रत्येक अंकात माहितीचे केवढे चांगले भांडार आहे! प्रत्येक अंक हाती पडताच त्याचे वाचन करणे हे किती आनंदमय ठरते! शास्त्रवचनीय माहितीवर मनन करण्यामुळे आम्हाला सेवाकार्यात तसेच इतरांसोबत संभाषण करण्यासाठी विशिष्ट मुद्दे लक्षात घेता येऊ शकतील. आम्ही प्रत्येक सभेची व खासपणे टेहळणी बुरुज याचा जो साप्ताहिक विचारविनिमय होतो त्याची तयारी करण्यासाठी वेळ देण्यास हवा. देवाच्या वचनाच्या व्यक्तीगत अभ्यासामुळे आम्हाला “ख्रिस्ताचे मन” जोपासता येते आणि आम्हास भेटणाऱ्या सर्वांना कृपायुक्त बोलणे सादर करण्यासाठी समर्थ करते.—१ करिंथ. २:१४-१६; स्तोत्र. १९:१४.
३ स्वीकारण्यास योग्य अशी जबाबदारी: यहोवावर प्रीती प्रदर्शित करणारे सर्व आपले जीवन त्याला समर्पित करतात. समर्पणाशी संबंधित असणाऱ्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करण्यामुळे, आम्ही यहोवाचे आहोत तसेच आम्ही हे सैतानी जग व त्याच्या घातक मार्गांपासून स्वःतला वेगळे केले आहे हे दाखवीत असतो. येशू ख्रिस्ताने घालून दिलेला कित्ता अनुसरण्यामुळे आम्ही इतरांसाठी चांगले उदाहरण ठेवतो. (१ पेत्र २:२१) १९९२ मध्ये होणाऱ्या आणि “आमच्या जबाबदाऱ्यांचा भार वाहणे” हे शीर्षक असणाऱ्या विभागीय संमेलनातील कार्यक्रम आम्हाला आमच्या समर्पणास अनुसरून जीवन व्यतित करण्याचे उत्तेजन देतात.
४ सभांना नियमित उपस्थित राहिल्यामुळे एकमेकांसोबत उभारणीकारक विचारांची सहभागिता करण्याची मुभा मिळते. सभांसाठी केलेला वैयक्तीक अभ्यास व तयारी ही इतरांसमवेत सहभागी करता येईल अशी पुष्कळ चांगली माहिती देते. इतरांसंबंधाने अशी व्यक्तीगत आस्था उबदार व मित्रत्वाच्या कौटुंबिक आत्म्यास चालना देते. सभेत सहभाग घेण्याद्वारे आपण पौलाच्या इब्रीकर १०:२४, २५ वचनांशी सहमत आहोत व इतरांना उत्तेजन देण्याची आमची जबाबदारी आम्ही स्वीकारतो असे दाखवितो.
५ अधिक जबाबदाऱ्या मिळविण्यासाठी प्रयत्न कराः १९९२ या कार्यवर्षात आपल्याला साहाय्यक किंवा नियमित पायनियरींगसारख्या अधिक जबाबदाऱ्यांना मिळवता येईल का? कार्याच्या तासांची जी गरज आहे तिजवर अनावश्यक भर न देता, एकत्रीकरणाच्या कामात सहभागी होण्याची ही वाढती संधी आहे यावर आम्ही आपले लक्ष का केंद्रित करू नये? (योहान ४:३५, ३६) प्रशिक्षित असे प्रचारक व पायनियरांसोबत मिळून कार्य करण्यामुळे आमची सेवाकार्यातील कुशलता वाढविली जाईल. अधिक जणांनी मिळून साहाय्यक पायनियरींगचे कार्य केल्यास ते मंडळीची सुदृढता वाढविण्यास मदत करते. तर मग, या वर्षात शक्य आहे तर नियमित पायनियरींग करण्यासाठी किंवा नियमित रुपात साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी किंवा जेव्हा ती शक्य आहे तेव्हा करण्यासाठी अर्ज का भरू नये?
६ मंडळीतील लायक अशा समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांसाठी जबाबदाऱ्या त्वरेने दिल्या जातात. (१ तीमथ्य ३:१-१०, १२, १३) तरीपण, सर्वांना सभेत विचारपूर्वक निवेदने सादर करण्यात, ईश्वरशासित सेवा शाळेत सहभागी होण्यासाठी तसेच सेवा सभेत एखादे प्रात्यक्षिक किंवा दुसराच काही भाग हाताळण्यासाठी नेमणूक पूर्ण करून आपली स्वेच्छा दाखवता येईल. या मार्गाने तसेच राज्य सभागृहातील आपल्या वर्तनाने मुलेही स्वतःचे उदाहरण राखू शकतात. राज्य सभागृहाची स्वच्छता करण्याची किंवा इतर काही गरजांची काळजी करण्याची वेळ येते तेव्हा मुले त्यांच्या पुस्तक अभ्यास गटासोबत मिळून आपली मदत देऊ शकतील.—रा.से. ४/७६ पृ. १, ८.
७ इतरांचे भले करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची स्वेच्छा असल्याचे येशूने “माझी इच्छा आहे,” या शब्दांनी व्यक्त केले. (लूक ५:१२, १३) त्याच्या उदाहरणाला अनुसरुन आम्ही आमच्या बांधवांना, क्षेत्रकार्यात भेटणाऱ्या आस्थेवाईक लोकांना आणि प्रामाणिक जनांना यहोवाच्या संस्थेसोबत नियमित रुपाने सहभाग घेण्याचे उत्तेजन देऊ शकतो. “सर्वांचे . . . बरे करावे” ही आमची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दृढ निश्चय व व्यक्तीगत त्याग करण्याची हाक आहे. (गल. ६:१०) पण जे चांगले साध्य केले जाते ते पाहिल्यावर आम्हीही पौलाच्या या उद्गारांशी सहमत होऊ शकू की, “अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.”—इब्री. १३:१६.