वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१५ पृ. २
  • अनुभवी प्रचारकांकडून शिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुभवी प्रचारकांकडून शिका
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांना मदत करण्याचा एक मार्ग कोणता?
    आमची राज्य सेवा—२०१३
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या
    आपली राज्य सेवा—२०१५
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ६/१५ पृ. २

अनुभवी प्रचारकांकडून शिका

आपल्या मंडळीत असलेल्या अनुभवी प्रचारकांची आपण नक्कीच मनापासून कदर करतो. हे प्रचारक कदाचित अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत असावेत. त्यांपैकी काही जण सेवेमध्ये अलिकडंच अधिक प्रभावी झाले असावेत. येशू ख्रिस्तानं या शेवटल्या दिवसांत, प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्याद्वारे ख्रिस्ती मंडळ्यांचं मार्गदर्शन कसं केलं ते या प्रचारकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं असावं. (मत्त. २८:१९, २०) सेवेत भाग घेण्याद्वारे या प्रचारकांनी जेव्हा समस्यांचा व परिक्षांचा सामना केला तेव्हा त्यांनी देवाचं पराकोटीचं सामर्थ्य अनुभवलं आहे. (२ करिंथ. ४:७) सत्यात मुरलेल्या या प्रचारकांकडून आपण बरंच काही शिकू शकतो. शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. (स्तोत्र ७१:१८) त्यामुळं त्यांच्याकडून शिकून घेण्यासाठी आपण नेहमी संधी शोधली पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो?

सेवेत: प्रभावी पद्धतीनं सेवा करण्यासाठी सर्वांनाच, मग ते नवीन प्रचारक असोत अथवा बऱ्‍याच वर्षांपासून सत्यात असलेले असोत, सर्वांनाच प्रशिक्षणाची गरज आहे. अनुभवी प्रचारकांसोबत सेवा केल्यास, आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो. (टेहळणी बुरूज १५ फेब्रुवारी २०१५ “सेवाकार्यातील तुमचा आवेश टिकवून ठेवा” या लेखामधील, “नवीन प्रचारकांना मदत करा” या शीर्षकाखालील तिसरा परिच्छेद पाहा.) अनुभवी प्रचारकांसोबत सेवा केल्यानं तुम्हाला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं?

तुम्ही एखाद्या अनुभवी प्रचारकाला तुमच्यासोबत सेवा करण्यास विचारू शकता. हा अनुभवी प्रचारक आजारी असेल तर तुम्ही कधीकधी तुमच्या बायबल विद्यार्थ्याला त्याच्या घरी अभ्यासासाठी बोलवू शकता. आणि अभ्यासानंतर तुम्ही या प्रचारकाला, ‘मी कुठं सुधारणा केली पाहिजे,’ असं विचारू शकता.

त्यांच्यासोबत वेळ घालवा: अनुभवी प्रचारकांना चांगल्या प्रकारे ओळखण्याकरता त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांना तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठी घरी बोलवा किंवा जर ते घराबाहेर पडू शकत नसतील तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन कौटुंबिक उपासना करा. ते सत्यात कसे आले, सत्यात टिकून राहण्यासाठी त्यांना कोणकोणत्या समस्यांचा, परिक्षांचा सामना करावा लागला ते विचारा. त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? मंडळीत त्यांनी कोणती वाढ पाहिली? यहोवाची सेवा करताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींत आनंद मिळतो?

पण प्रचारक अनुभवी असले तरी आपण त्यांच्याकडून जास्त अपेक्षा बाळगू नयेत. त्यांनाही काही समस्या असतील. वय झाल्यामुळं ते कदाचित आपल्यासोबत सेवेत जास्त वेळ घालवू शकणार नाहीत. परंतु इतर प्रचारकांप्रमाणे ते सेवेतील या नाहीतर त्या पैलूत कुशल असतील. (रोम. १२:६-८) आणि यहोवाच्या सेवेत त्यांना भरपूर अनुभव असल्यामुळं आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा