सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या
हे का महत्त्वाचं: येशूच्या नवीन शिष्यांनी, त्यानं सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळायला शिकलं पाहिजे. या सर्व गोष्टींमध्ये, इतरांना सत्य शिकवणंदेखील समाविष्ट आहे. (मत्त. २८:१९, २०) पुष्कळ नवीन प्रचारक, ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाग घेण्यास पात्र ठरतात तेव्हा सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना ते अनौपचारिक साक्षही देऊ लागतात. ते शिकत असलेल्या गोष्टींबद्दल जसजशी त्यांच्या मनात कदर वाढत जाते आणि सर्व लोकांना सुवार्ता कळावी अशी यहोवाची इच्छा आहे हे त्यांना समजतं तसतसं ते क्षेत्र सेवेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त करतात. (रोम. १०:१३, १४) बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक म्हणून मंडळीत घोषणा केल्यानंतर त्यांना उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळं आध्यात्मिक प्रगतीसाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलताना त्यांचं मनोबल आणखी वाढेल.—लूक ६:४०.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
तुमचा बायबल विद्यार्थी नुकताच प्रचारक झाला असेल तर घरोघरची सेवा करताना, पुनर्भेट घेताना किंवा बायबल अभ्यासाला जाताना त्याला सोबत घ्या. पण तुमचा कोणी बायबल विद्यार्थी नसेल तर मंडळीतल्या कोणत्याही नवीन प्रचारकाला तुमच्यासोबत घ्या.