ऑक्टोबरसाठी सेवा सभा
ऑक्टोबर ७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७ (२)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. मासिकाच्या अलिकडच्या अंकातील बोलके मुद्दे ठळकपणे मांडा.
२० मि: “सुवार्ता सादरता—थेट पवित्रा घेऊन अभ्यास सुरु करणे.” प्रश्नोत्तराने हाताळणी. परिच्छेद ३ व ४ चा विचार केल्यावर क्रिएशन तसेच शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेद्वारे थेट पवित्रा कसा घेता येऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. अशा थेट पावित्र्याने तुम्हाला घरमालकाच्या आस्थेची जाणीव होऊ शकेल. आरंभाला प्रकाशनाचे वितरण झालेले असो वा नसो, पण ज्यांनी आस्था दाखवली अशा सर्वांची परतभेट घेण्याबद्दलची गरज जोर देऊन सांगा. या सप्ताहाच्या शेवटाला क्षेत्र कार्यामध्ये थेट पवित्रा वापरुन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन सर्वांना द्या.
१५ मि: प्रश्न पेटी, “आमची राज्य सेवा नवा आकार घेते,” व ईश्वरशासित वृत्त. या सप्ताहाच्या शेवटी क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
गीत १५७ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१४ (२३)
१० मिः स्थानिक घोषणा. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रसेवेत जी मासिके वापरली जातील त्यातील मुद्यांची उजळणी करा. वेळ असेल त्याप्रमाणे एक किंवा दोन प्रात्यक्षिके सादर करा.
२० मिः नव्या सेवा वर्षासाठी व्यक्तीगत ध्येये ठेवा. सेवा देखरेखे मंडळीच्या गत वर्षाच्या कार्याची उजळणी करतात. जेथे सुधारणा केली गेली तेथे उबदार प्रशंसा करा. नवीन कार्य वर्षात ज्या प्रकारात स्थानिकरित्या सुधारणा करायच्या बाकी असतील ते सांगा व त्याबद्दलचे व्यावहारिक प्रस्ताव मांडा. विभागीय देखरेख्यांच्या मागच्या अहवालाची उजळणी करा. जी गरज आहे त्याबद्दल तसेच दिलेली सूचना कशी लागू करावी यावरील साहित्य शोधण्यासाठी इंडेक्स वापरा. जे कार्यात विश्वासूपणे टिकून आहेत ते इतरांना प्रोत्साहन देतात. (इब्री ६:१०) गेल्या सेवा वर्षात ज्यांनी चांगली प्रगति केली अशा दोघा प्रचारकांची किंवा पायनियरांची मुलाखत घ्या. त्यांनी १९९२ साठी कोणती ध्येये ठेवली आहेत? याशिवाय पुष्कळ वर्षे सेवा केलेल्या विश्वासू प्रचारकाची किंवा पायनियरची मुलाखत घ्या व त्याला किंवा तिला कोणकोणत्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागले व त्यावर यहोवा तसेच त्याची संस्था याजकडून मिळालेल्या मदतीने कशी मात करता आली ते सांगू द्या. १९९२च्या सेवा वर्षात आपले सेवकपण सुधारण्यासाठी योग्य ध्येये ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मिः “दुसऱ्यांचे भले करण्याची आमची जबाबदारी पूर्ण करणे.” प्रश्नोत्तर रुपाने सहभागिता. ४थ्या परिच्छेदाचा विचार करताना, राज्यसभागृहात एक वडील एका प्रचारकाने कित्येक वर्षापासून आपले जे विश्वसनीय उदाहरण राखले आहे त्याबद्दल त्याची कशी प्रशंसा करतात हे दाखविणारे प्रात्यक्षिक सादर करा. मदतीकरता काय केले जाऊ शकते याची विचारणा करू शकता. तरीपण, प्रशंसेवर अधिक भर दिला जाण्यास हवा.
गीत ९४ (५९) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४४ (११०)
१० मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. संस्थेकडील अनुदानाचे पोच मिळालेले पत्र वाचा आणि संस्थेच्या तसेच मंडळीच्या कार्यासाठी प्रचारकांनी जे आर्थिक पाठबळ दिले त्याविषयी त्यांचे आभार व्यक्त करा.
२० मिः “मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था—भाग ३.” मंडळीचे दोन पुस्तक अभ्यास चालक साहित्याची चर्चा करतात व स्थानिक गोष्टींचा अवलंब स्पष्ट करतात. सेवा व्यवस्थेसंबंधाने प्रचारक सहकार्य दाखवतात तेव्हा परस्परांना जो लाभ मिळतो त्यावर भर द्या. ज्या घरी क्षेत्रकार्यासाठी सभा आयोजित केली जाते तेथे आदरपूर्वक वागणूक ठेवण्याविषयीचा उल्लेख करा आणि ज्यांनी आपले घर अशा व्यवस्थेसाठी दिले आहे अशांची प्रशंसा करा. (रा.से. ४/८६ पृ. ३) खरे म्हणजे, वेळोवेळी विविध स्थळांची गरज भासणार असल्यामुळे ज्यांना आपली घरे उपलब्ध करावीशी वाटतात अशांनी अध्यक्षीय देखरेखे किंवा सेवा देखरेखे यांना सांगावे. सेवेबद्दलची ध्येये ठेवणे हे गेल्या आठवड्यात सांगण्यात आलेले मुद्दे येथे जोडा. क्षेत्रकार्यातील ध्येये पूर्ण करण्यासाठी सेवा देखरेखे प्रचारकांना उत्तेजन व मदत देऊ शकतील.
१५ मिः “युथ्स—वील यू पास द टेस्ट ऑफ ख्रिश्चन लॉयल्टी?” वॉचटावरच्या जून १५, १९९१ अंकातील साहित्यावर आधारित भाषण. दुटप्पी जीवन जगण्यातील मूर्खता भर देऊन सांगा. (प्रादेशिकः “मन व शरीर यांना शुद्ध राखा.” टेहळणी बुरुज एप्रिल १, १९९१.)
गीत १७१ (१६) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८७ (९३)
१० मिः स्थानिक घोषणा. मासिकाच्या अलिकडील अंकातील एक किंवा दोन मुद्दे ठळकपणे सांगा. या आठवड्याच्या शेवटी प्रचारकांना क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
२० मिः “पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा—भाग ३.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ वर असताना एक अनुभवी प्रचारक एका नव्या प्रचारकाची सेवाकार्यात कशी मदत करतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. नवीन प्रचारक अनुभवी प्रचारकाकडून ऐकलेल्या प्रस्तावानुसार खऱ्या आक्षेपाला कसे उत्तर देत आहे याबद्दलच्या सरावाच्या वर्गाचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मिः स्थानिक गरजा किंवा स्थानिक क्षेत्रात योग्य रितीने वापरल्या जाऊ शकतील अशा प्रस्तावनांची चर्चा करा. ही चर्चा रिझनिंग पुस्तकातील पृष्ठे ९-१५ वरील साहित्यावर आधारीत ठेवा. थेट पवित्र वापरुन ज्यांना या महिन्यात पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करता आला अशांचे अनुभव त्रोटकपणे सांगू द्या.
गीत ७० (३९) व समाप्तीची प्रार्थना.