वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०१ पृ. १
  • आपला हेतू काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला हेतू काय आहे?
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या संघटनेकडे विद्यार्थ्यांना निर्देशित करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • सभांना उपस्थित राहण्यास इतरांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२००१
  • “आपण यहोवाच्या घराकडे जाऊ”
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km १०/०१ पृ. १

आपला हेतू काय आहे?

१ आपण लोकांबरोबर बायबलचा अभ्यास का करतो? केवळ लोकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी? त्यांच्या जीवनात सुधार आणण्यासाठी? भवितव्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन प्रज्वलित करण्यासाठी? नाही. आपला मुख्य हेतू लोकांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवणे हा आहे! (मत्त. २८:१९; प्रे. कृत्ये १४:२१) म्हणूनच, आपण ज्यांच्याबरोबर अभ्यास करतो त्यांनी मंडळीबरोबर सहवास राखला पाहिजे. ख्रिस्ती संघटनेबद्दल योग्य समज बाळगण्यावरच प्रामुख्याने त्यांची आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे.

२ हेतू कसा साध्य करू शकू: अभ्यासाच्या अगदी सुरवातीपासून तुमच्या विद्यार्थ्याला मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचा आग्रह करा. (इब्री १०:२४, २५) त्याला समजावून सांगा, की सभांना उपस्थित राहिल्याने, त्याचा विश्‍वास कसा मजबूत होऊ शकतो, देवाची इच्छा पूर्ण करण्यास त्याला कशी मदत मिळू शकते आणि यहोवाची स्तुती करू इच्छिणाऱ्‍या इतर बंधूभगिनींबरोबर तो उभारणीकारक सहवास कसा राखू शकतो. (स्तो. २७:१३; ३२:८; ३५:१८) मंडळीबद्दल आणि सभांबद्दल तुम्हाला व्यक्‍तिगतरीत्या असलेले प्रेम व प्रशंसा पाहून त्यालाही सभांना उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळेल.

३ यहोवाची संघटना म्हणजे एक आंतरराष्ट्रीय बंधूसमाज आहे हे नवीन लोकांना समजले पाहिजे. यहोवाचे साक्षीदार—या नावामागे असलेली संघटना (इंग्रजी) आणि आपला संपूर्ण बंधूसमाज (इंग्रजी) हे व्हिडिओ त्यांना दाखवा. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा संपूर्ण जगभरात आपल्या कोट्यवधी समर्पित सेवकांचा उपयोग करीत आहे हे समजण्यास त्यांना मदत करा. या नवीन लोकांना हे समजू द्या, की त्यांनाही देवाची सेवा करण्याचे आमंत्रण दिले जात आहे.—यश. २:२, ३.

४ आपल्या बायबल विद्यार्थ्याला येशूचा खरा शिष्य बनल्याचे पाहून आपल्या सर्वांना निश्‍चितच आकाश ठेंगणे वाटेल. कारण हाच तर आपला हेतू आहे!—३ योहा. ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा