“आपण यहोवाच्या घराकडे जाऊ”
१ “आपण यहोवाच्या घराकडे जाऊ” या निमंत्रणाला दाविदाने फार आतुरतेने प्रतिसाद दिला. (स्तोत्र १२२:१) मंदिराने सूचित असणारे यहोवाचे “घर” ज्यांना खऱ्या देवाची भक्ति करण्याची इच्छा होती अशा लोकांसाठी, ही एकत्र येण्याची जागा होती. शांती आणि सुरक्षिततेचे हे पवित्र स्थान होते. आज, जगव्याप्त ख्रिश्चन मंडळी देवाचे “घर,” “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. (१ तीमथ्य ३:१५) ह्या मार्गाकरवी तारणासाठी सर्व तरतुदी उपलब्ध केल्या आहेत. ह्याचकारणास्तव, देवाच्या राज्यसत्तेखाली अभिवचन दिलेल्या आशीर्वादांचा आनंद उपभोगायचा आहे तर “सर्व राष्ट्रांतील” लोकांनी येणे भाग आहे.—यशया २:२.
२ ह्या “घर” यात २२९ राष्ट्रांच्या, ६९,००० पेक्षा अधिक मंडळ्यांचा समावेश आहे. संपूर्ण जगभरातील राज्य सभागृहांची दारे खुली आहेत, आणि चाळीस लाखापेक्षा अधिक आवेशी कर्मचारी: “या! . . . ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट घेवो’” हे निमंत्रण देत आहेत. (प्रकटी २२:१७) पुष्कळांनी हा संदेश ऐकला व कृतज्ञतेने प्रतिसाद दिला आहे. अनेक दुसऱ्यांना हे ज्ञान कळले आहे परंतु ते अद्याप यहोवाच्या घरात ख्रिश्चन मंडळींच्या संगतीत आले नाहीत. अशा लोकांना “आध्यात्मिकतेची भूख” आहे जी मंडळीत मिळणाऱ्या तरतुदीनेच शमविली जाऊ शकते. (मत्तय ५:३) ह्या युगाची समाप्ती अगदी जलद येत आहे व अशा कठीण काळात आम्ही जगत आहोत. उदासीन किंवा नाखुष वृत्तीचा परिणाम धोक्याचा असू शकेल. लोकांनी त्याच्या संस्थेच्या जवळ येण्याद्वारे “देवाच्या निकट जाणे” फार निकडीचे आहे. (याकोब ४:८) आम्ही त्यांची कशी मदत करु शकतो?
३ संस्थेकडे आस्था निरवा: आस्थवाईक लोकांचे लक्ष आमच्या प्रथम भेटीपासूनच संस्थेकडे निरवू शकतो. आम्ही व्यक्तीगतपणे शास्त्र वचनांना अचूक शोधून काढत असू आणि मूलभूत शिकवणींचे विवेचन देत असू तरी आपण अशाप्रकारच्या ज्ञानाचे उगम नाहीत. हा दासवर्ग जो “यथाकाळी खावयास अन्न” पुरवितो त्यांच्या मार्फत आम्ही जे काही शिकलो ते सर्व ह्या संस्थतून आले आहे. (मत्तय २४:४५-४७) सुरवातीपासूनच नव्या लोकांनी हे ओळखले पाहिजे की शुद्ध भक्तित आपण किंवा स्थानीक मंडळीच नव्हे तर एक संघटित, ईश्वरशासित, जागतिक संस्था आहे जी यहोवाच्या मार्गदर्शनानेच चालविली जाते.
४ आम्हाला मिळत असलेल्या मार्गदर्शनाचा उगम यहोवा देवाकडून आहे, ज्याने आम्हाला मार्गदर्शन व शिकवण्याचे अभिवचन दिले आहे. (स्तोत्र ३२:८; यशया ५४:१३) ह्या सूचनांचा प्रथम आपल्या साहित्यांतून प्रसार होतो. आस्थेवाईक लोकांमध्ये साहित्यांसाठी आपण एक उच्च दर्जा निर्माण केला व त्यामध्ये जीवन वाचविण्याच्या सूचना आहेत हे त्यांनी ओळखले तर ते कदाचित त्यांना वाचतील आणि त्यांना लगेचच फेकून देण्याऐवजी त्यामधील संदेश त्यांच्या जीवनात ते लागू करतील. आम्ही साहित्यांना अशाप्रकारे सादर केले पाहिजे की ज्यामुळे त्यांच्यासाठी आदर निर्माण होऊ शकतो. संस्थेला कृतज्ञता दाखवणे व त्याच्या तरतुदींवर अवलंबून राहण्यासाठी ते नविन लोकांना शिकविते.
५ समाजामध्ये नियमितरित्या सूचना मिळण्याची केंद्रिय सभा आहे हे आस्थवाईक लोकांना कळवा. सभागृहाचा पत्ता आणि सभांची वेळ त्यांना सांगा. आमच्या सभा व भूतकाळात ते ज्या धार्मिक मेळाव्यास उपस्थित राहिले असतील यांच्यामधील फरक याचे विवेचन करा. सर्वांचे इथे स्वागत केले जाते; फंडाच्या कोणत्याही व्यक्तीगत मागण्या किंवा वर्गणी घेतल्या जात नाही. नियुक्त सेवक कार्यक्रम हाताळत असताना, सर्व त्यामध्ये उत्तरे देऊ शकतात व कार्यक्रमाच्या भागात सहभाग घेऊ शकतात. कुटुंबियांचे स्वागत आहे; आमच्या पवित्र शास्त्र चर्चेमध्ये मुलांचा देखील समावेश आहे. आमचे सेवक खास अंगरखा किंवा वस्त्र परिधान करत नाहीत. राज्य सभागृहाला सुंदरपणे सजविले जाते, आणि त्यात मेणबत्त्या, मूर्त्या, किंवा प्रतिमा नाहीत. स्थानिक शेजाऱ्यांमध्ये राहणारेच तेथे उपस्थित असतात.
६ पवित्र शास्त्र अभ्यासांवर प्रगतिशील आस्था निरवा: पवित्र शास्त्र अभ्यासाचा प्रधान हेतू, देवाच्या वचनाचे सत्य शिकवणे हा आहे. त्याने यहोवाच्या संस्थेबद्दल विद्यार्थ्यामध्ये कृतज्ञता उत्पन्न केली पाहिजे आणि त्याचा एक भाग होण्याच्या गरजेसाठी त्या व्यक्तीला जाणीव करुन दिली पाहिजे. पहिल्या शतकात येशू व त्याच्या शिष्यांनी केलेल्या महान कामामुळे अनेक प्रामाणिक जन आकर्षित झाले व एका केंद्रिय नियमन मंडळाखाली काम करण्यासाठी त्यांना एकत्रित केले. ज्या वसाहतींमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, तेथे नियमित शिक्षण व सूचना मिळण्यासाठी मंडळ्या स्थापन केल्या. ह्या मंडळ्यांबरोबर सहवास राखणाऱ्यांना आध्यात्मिक दृष्ट्या दृढता मिळाली आणि सर्व संकटे सहन करण्यासाठी त्यांना मदत मिळाली. (इब्री १०:२४, २५; १ पेत्र ५:८-१०) आमच्या दिवसात “सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र” करण्याचा यहोवाचा उद्देश आहे. (इफिस १:९, १०) यामुळेच संपूर्ण जगभरात आमचा “बंधुवर्ग” आहे.—१ पेत्र २:१७.
७ आठवड्याच्या पवित्र शास्त्र अभ्यासात विद्यार्थ्यांनी संघटनेची गुणग्राहकता दाखवण्यास व त्यांच्या तारणासाठी तरतुदींचा त्यांनी फायदा घ्यावा या सूचनांचा समावेश असावा. प्रत्येक आठवडी थोडा वेळ संघटनेबद्दल, तिचे काम कसे चालते याचे वर्णन करण्यासाठी घ्या. नोव्हेंबर १, १९८४च्या वॉचटावर मध्ये तुम्हाला उपयुक्त बोलके मुद्दे मिळतील. जेहोवाज विटनेसस इन द ट्वेंटीयत सेंच्युरी आणि यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत ही दोन माहितीपत्रके संघटनेचे मुख्य पैलु व त्यांच्यामुळे आमचा कसा फायदा होतो याची चर्चा करतात. जेहोवाज विटनेसस—द ऑरगनायझेशन बिहाईंड द नेम हा विडिओ तुमच्या शास्त्राभ्यास विद्यार्थ्यांना दाखवण्याची योजना करा की जेणेकडून काय साध्य होत आहे हे ते स्वत: पाहतील. आमच्या राष्ट्राव्यतिरिक्त विविध राष्ट्र व संस्कृतींबद्दल येणारे विशिष्ट अहवाल व वार्षिक अहवाल पुस्तक मधले अनुभव तुम्ही त्यांना दाखवू शकता. इतर प्रकाशनांचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. काही कालावधीसाठी, आम्ही घरोघरी का जातो, आपल्या सभांचा उद्देश, आमच्या कामाची आर्थिकता, आणि संपूर्ण जगभरातल्या कार्याचा विस्तार यासर्वांचे प्रगतिशीलपणे वर्णन त्यांना द्या.
८ इतर साक्षीदारांबरोबर परिचय करुन दिल्यामुळे नव्या जनांवर उत्तेजक प्रभाव होऊ शकतो त्यामुळे मंडळीबद्दल त्यांची कल्पना विस्तारित होते, यासाठी, दुसऱ्या काही प्रचारकांना वेळोवेळी अभ्यासाला येण्याचे निमंत्रण द्या. मंडळीमधील कोणीतरी तुमच्या विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीचा असेल किंवा त्याच्या प्रमाणे त्याची आस्था असेल तर तुमच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीकोनाला नवीन पैलू मिळू शकतो. फक्त ओळख करुन घेण्यासाठी एखाद्या वेळी तुमच्याबरोबर वडील येऊ शकतात. अभ्यासाला फिरते पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीची भेट खरा आशीर्वाद असेल. शेजारीपाजारी कोणी साक्षीदार राहात असतील तर विद्यार्थ्याबरोबर परिचित झाल्याने विद्यार्थ्याला मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी आणखी उत्तेजन मिळू शकते.
९ नवोदितांना सभांना येण्यास उत्तेजन देणे: सभांना उपस्थित राहणे किती महत्त्वाचे आहे हे नवोदितांनी ओळखून घेणे जरुरीचे आहे. त्यांच्या आस्थेला चेतना द्या. वॉचटावर अभ्यासात जो विषय हाताळला जाणार आहे तो त्यांना दाखवा. येणाऱ्या जाहीर भाषणांचे विषय त्यांना सांगा. ईश्वरशासित सेवा प्रशालेत तसेच मंडळीच्या पुस्तक अभ्यासात जो भाग हाताळला जाणार आहे त्याचे ठळकपणे विवेचन द्या. सभांमध्ये तुम्ही काय शिकता व त्यांना उपस्थित राहिले पाहिजे अशी गरज तुम्हाला का वाटते याबद्दल तुमचे व्यक्तीगत विचार सांगा. शक्य असल्यास, त्यांना ने-आणण्याची व्यवस्था करा. सभेला जाण्याआधी एखादा टेलीफोन केल्याने उपस्थित राहण्यासाठी त्यांना अधिक प्रवर्तक वाटेल.
१० सभेला जेव्हा एखादा शास्त्र विद्यार्थी येतो, तेव्हा त्याचे स्वागत झाले असे त्याला वाटू द्या. त्याची ओळख इतरांबरोबर व वडीलांबरोबरही करुन द्या. तो जर जाहीर भाषणाला उपस्थित राहणार असेल तर, वक्त्याशी त्याचा परिचय करुन द्या. त्याला राज्य सभागृह दाखवा. साहित्यांचा, मासिक काऊंटरचा, दान पेटीचा, पुस्तकालयाचा, आणि वार्षिक वचनाचा हेतू काय आहे त्याचे वर्णन द्या. त्याला हे कळू द्या की हे सभागृह फक्त उपासनेचे घर नव्हे तर प्रचारकार्याला स्थानिकरित्या संघटित करण्याचे देखील एक केंद्र आहे.
११ आमच्या सभा कशा चालविल्या जातात याचे वर्णन द्या. आम्ही वापरत असलेली प्रकाशने त्यांना दाखवा. पवित्र शास्त्र आमचे प्रधान पाठ्यपुस्तक आहे हे दर्शवा. मुलांसहीत सर्वजण यात भाग घेऊ शकतील. सर्व संगीत व कवन आपल्या भक्तिसाठी यहोवाच्या साक्षीदारांनीच रचली आहे हेही सांगा. उपस्थित असलेल्या लोकांच्या विविध पार्श्चवभूमीकडे त्यांचे लक्ष वेधवा. मित्रत्त्वाचे व आदरातिथ्याचे सकारात्मक विचार सांगा. अशी प्रामाणिक आस्था विद्यार्थ्याला पुन्हा येण्याचे तीव्र कारण असेल.
१२ काही जण मागे का राहिलेत: अनेकदा, तुम्ही जेवढे काही केले असले तरी काही जण संस्थेच्या जवळ येण्यास टाळाटाळ करतात. खचून जाऊ नका. त्यांच्या जागी तुम्ही स्वत:ला ठेवा. आजपर्यंत त्यांना काही खास प्रसंगाव्यतिरिक्त धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची तितकी गरज भासली नसावी. त्यांच्या कुटुंबाचे सदस्य किंवा त्यांचे निकट मित्र त्यांच्यावर कदाचित दबाव आणत असतील. त्यांचे शेजारी अपमानकारक बोलत असल्यामुळे त्यांची हिंमत खचून गेली असेल. आणि काही जण सामाजिक व मनोरंजनाच्या मागे लागले असतील हे नक्की आहे. ते यांच्याकडे कठीण प्रतिबंध अशा दृष्टीकोनातून पाहतील; म्हणून तुम्हाला त्यांना योग्य यथार्थदर्शनाने सर्व गोष्टी पाहावयास सांगण्याची आणि “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे” त्याची खात्री करण्याची मदत दिली पाहिजे.—फिलि १:१०.
१३ त्यांनी स्थिर राहण्यास शास्त्रवचनीय कारणे द्या. आमच्या संगतीच्या एकत्रिकरणामुळे मिळणाऱ्या उत्तेजनाची व आध्यत्मिक बांधणीची आपल्या सर्वांना अत्यावश्यक गरज आहे यावर अधिक भर द्या. (रोम १:११, १२) येशूने हे स्पष्ट केले की कौटुंबिक छळामुळे मागे पडलो हे कारण योग्य नाही. (मत्तय १०:३४-३९) पौलाने आम्हाला आवर्जून सांगितले की आपण येशूचे शिष्य आहोत अशी ओळख देण्यासाठी आम्ही लाजता कामा नये. (२ तीमथ्य १:८, १२-१४) व्यक्तीगत ध्येय आणि चित्तविभ्रम यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे; नाहीतर ते आमच्यासाठी पाश होतात. (लूक २१:३४-३६) ज्यांना यहोवाचे आशीर्वाद हवेत तर अशांनी चंचल नव्हे तर मनपूर्वक असले पाहिजे. (कलस्सै ३:२३, २४) अशा पवित्र शास्त्र तत्त्वांसाठी गुणग्राहकता हळुहळू मनावर ठसवल्याने आध्यात्मिकरित्या प्रगती करण्यासाठी त्यांच्यासाठी मार्ग खुला होईल.
१४ दरवाजे खुले आहेत: खऱ्या भक्तिचे यहोवाचे घर इतरांपेक्षा उच्च आहे. “चला आपण यहोवाच्या पर्वतावर चढून जाऊ . . . तो आम्हास त्याचे आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू” हे निमंत्रण आज २२९ राष्ट्रात संपूर्ण जगात दिले जात आहे. (यशया २:३) नवोदितांचा सकारात्मक दृष्टीकोन त्यांचा जीव वाचवील. यहोवाच्या संघटनेकडे त्यांची आस्था निरवण्यास त्यांना मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.