वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km १०/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑक्टोबर ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. ऑक्टोबर २२ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहाच्या सेवा सभेत ईश्‍वरी शिक्षणामुळे ऐक्य (इंग्रजी), या व्हिडिओवर चर्चा केली जाणार असल्यामुळे सर्वांना तो व्हिडिओ पाहण्यास उत्तेजन द्या. पृष्ठ १ वर सुचवल्यानुसार, ऑक्टोबर १५ चे टेहळणी बुरूज आणि ऑक्टोबर ते डिसेंबरचे सावध राहा! या मासिकांचा उपयोग करून दोन प्रात्यक्षिके दाखवा.

३५ मि: “सणासुदीच्या दिवसांत यहोवाचा आदर करा.”a परिच्छेद ४ च्या आधारावर एक प्रात्यक्षिक आणि परिच्छेद ५ व ६ मधील मुद्दे दाखवून देणारे इतर संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.

गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १२ (११३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: तुमचे “ऐकणारे अंतःकरण” आहे का? (१ राजे ३:९) जुलै १५, १९९८ टेहळणी बुरूज पृष्ठे २९-३१ वर आधारित वडिलांचे भाषण. मंडळीबरोबर कार्य करताना आपण कोणकोणत्या मार्गांनी आज्ञाधारकपणा दाखवू शकतो त्याची चर्चा करा.

२० मि: आपल्या मासिकांचा चांगला उपयोग करा. सेवा पर्यवेक्षक आणि मासिकांचे वितरण हाताळणारे बांधव, स्थानिक मासिक वितरणाविषयी चर्चा करतात. एका महिन्यात जितक्या मासिकांचे वितरण केल्याचा अहवाल दिला आहे त्याच्या तुलनेत दर महिन्याला मंडळीत किती प्रती मिळतात याचा उल्लेख ते आपल्या चर्चेत करतात. माहितीनुसार, बऱ्‍याच प्रती शिल्लक राहतात किंवा त्या फेकून दिल्या जातात. तेव्हा, प्रचारक आपल्या मासिकांचा चांगला उपयोग कसा करू शकतील? हे दोन बांधव, ऑक्टोबर ४, १९९९ च्या सप्ताहाच्या सेवा सभेतील “मासिके देण्यास नेहमी तयार असा!” या भागामधील सात मुद्द्‌यांवर चर्चा करतात. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९८ पृष्ठे २८-९ वरील अनुभवाची उजळणी ते करतात व त्यात सुचवलेले मुद्दे आपण स्थानीयरीत्या कसे लागू करू शकतो त्यावर चर्चा करतात. दर महिन्याला आमची राज्य सेवा यात सादर होणाऱ्‍या नमुना सादरतांचा उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन मिळते.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २५ (२०४)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ १ वर सुचवलेल्या सादरतांचा उपयोग करून, टेहळणी बुरूज नोव्हेंबर १ आणि सावध राहा! ऑक्टोबर ते डिसेंबर या दोन मासिकांच्या सादरतांची दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके करून दाखवा.

१० मि: तुम्ही काय म्हणाल? “यहोवाचे साक्षीदार बायबलचे स्पष्टीकरण कसे देतात?” या प्रश्‍नाचे युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे २०४-५ वर दिलेले स्पष्ट उत्तर संक्षिप्तपणे दाखवा. पुनर्भेटीत या प्रश्‍नाला तुम्ही कसे उत्तर द्याल त्याचे एक चांगले तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा. प्रात्यक्षिकात शेवटी मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे प्रेमळपणे उत्तेजन दिल्याचे देखील दाखवा.

२५ मि: “ईश्‍वरी शिक्षणामुळे ऐक्य—खऱ्‍या बंधुवर्गातील ऐक्याचे चित्र.” श्रोत्यांबरोबर चर्चा. या भागाची प्रस्तावना व समाप्ती करताना पहिल्या आणि शेवटल्या परिच्छेदांचा उपयोग करा. व्हिडिओवर होणाऱ्‍या चर्चेत सर्वांना उत्साहाने भाग घेता यावा म्हणून पुरवलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचा उपयोग करा. मंडळीतील कोणी, दुसऱ्‍या देशांतील अधिवेशनांना उपस्थित राहून आले असेल तर त्यांना, आपल्या संघटनेचा आंतरराष्ट्रीय विस्तार आणि ऐक्य प्रत्यक्ष पाहून कसे वाटले ते विचारा. नाहीतर, १९९४ वार्षिकपुस्तक, पृष्ठे ७-९ (इंग्रजी) आणि १९९५ वार्षिकपुस्तक, पृष्ठे ८-११ (इंग्रजी) मधील काही हृदयस्पर्शी अनुभव सांगा. डिसेंबर महिन्यात आपण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत (इंग्रजी) या व्हिडिओची उजळणी करणार आहोत.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १९ (१६४)

१२ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना ऑक्टोबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नोव्हेंबर महिन्याची साहित्य सादरता, अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक आहे. या संक्षिप्त सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा: “आर्थिक चणचण असलेल्या या काळात जगणे अतिशय कठीण झाले आहे. सर्वांचे भले होईल अशा मार्गाने मानवी सरकारे या समस्येचे निवारण करतील असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाचे मत ऐका.] मला बायबलमधील हा एक विचार खूप प्रोत्साहनदायक वाटला.” स्तोत्र ७२:१२-१४ वाचा. आणि मग, तुमचा विषय अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तकाशी जोडून ते प्रकाशन घरमालकास द्या.

१५ मि: स्थानीय गरजा.

१८ मि: “आध्यात्मिक आहाराविषयी तुमच्या सवयी कशा आहेत?”b आध्यात्मिक अन्‍न खाण्याच्या चांगल्या सवयी टिकवून ठेवण्यासाठी आपण का व कसे प्रयत्न केले पाहिजेत ते सांगण्यासाठी टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९९७ पृष्ठे २८-३१ वरील काही मुद्द्‌यांवर श्रोत्यांना आणखी विवेचन करायला सांगा.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

१० मि: स्थानीय घोषणा.

१८ मि: संपूर्ण कुटुंब मिळून सभांची तयारी करणे. सभांमध्ये भाग घेता यावा म्हणून सर्वजण सभांची तयारी कशी करू शकतात यावर पिता आपल्या कुटुंबाबरोबर चर्चा करतो. टेहळणी बुरूज जुलै १, १९९९ पृष्ठे १९-२० परिच्छेद ९ मधील सुचनांचा अवलंब करून ते सप्ताहाच्या टेहळणी बुरूज अभ्यासात उत्तरे देण्याची तयारी करतात. (१) प्रत्येक सदस्य उत्तरे देण्याकरता एक अथवा दोन प्रश्‍न निवडतो. (२) संबंधित परिच्छेदांची उजळणी केल्यावर ते त्यांवरील उत्तरे स्वतःच्या शब्दांत सांगतात. (३) परिच्छेदात उल्लेखलेली मुख्य शास्त्रवचने निवडून ती विषयाशी कशी संबंधित आहेत यावर चर्चा करतात व ती वचने लेखाला लागू करण्याकरता काय म्हणता येईल ते सांगतात. सर्वजण सभेत भाग घेण्यास उत्सुक आहेत.

१७ मि: “आपला हेतू काय आहे?” c मंडळीच्या सभांना उपस्थित राहणे महत्त्वपूर्ण का आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्‍यक आहे यावर जोर द्या. हे कसे करता येऊ शकते ते दाखवण्यासाठी, ज्ञान पुस्तकाच्या पृष्ठे ६-८ वरील १७ व्या अध्यायाचा उपयोग करून चांगली तयारी केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा