ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत
१ इतरांना सत्य शिकवणे व ‘सार्वकालिक जीवनाबद्दल योग्य मनोवृत्ती असलेल्यांना’ शिष्य बनवणे हे सर्व ख्रिश्चनांकरता एक इष्ट ध्येय आहे. (प्रे. कृत्ये १३:४८, NW; मत्त. २८:१९, २०) यहोवाच्या संघटनेने हे साध्य करण्यासाठी आपल्याला एक उत्कृष्ट साधन—सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक दिले आहे. त्याचे शीर्षक गृह बायबल अभ्यासांचे मोठे महत्त्व ठळकपणे मांडते कारण एकमेव खरा देव, यहोवा आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांचे ज्ञान घेण्यावर सार्वकालिक जीवन अवलंबून आहे.—योहा. १७:३.
२ ज्ञान पुस्तक, गृह बायबल अभ्यास चालवण्यामध्ये उपयोगात आणले जाणारे संस्थेचे मुख्य प्रकाशन आहे. त्याचा उपयोग केल्याने आपण साधेपणाने, स्पष्टपणे आणि अल्प काळात सत्य शिकवू शकतो. यामुळे शिकवल्या जाणाऱ्या लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचण्यात मदत होईल. (लूक २४:३२) अर्थात, चालकाने शिकवण्याचे चांगले तंत्र वापरण्याची गरज आहे. याकरताच, ही पुरवणी तयार करण्यात आली आहे; यात प्रभावशाली असल्याचे सिद्ध झालेल्या शिकवण पद्धतींबद्दल सल्ले व स्मरणिका पुरवल्या आहेत. समजबुद्धीने, व वैयक्तिक परिस्थितींनुसार येथे सादर केलेले काही अथवा सर्व सल्ले तुम्ही हळूहळू लागू करू शकाल. ही पुरवणी जपून ठेवा व वारंवार तिचा संदर्भ घ्या. त्यातील निरनिराळे मुद्दे, शिष्य बनवण्यासाठी ज्ञान पुस्तकाचा उपयोग करण्यात तुम्हाला अधिक प्रभावशाली बनवील.
३ प्रगतीशील गृह बायबल अभ्यास चालवा: संभाव्य ख्रिस्ती शिष्य व आध्यात्मिक बांधव अथवा बहीण या नात्याने विद्यार्थ्याबद्दल खरी व्यक्तिगत आस्था बाळगा. स्नेहपूर्ण, मैत्रिपूर्ण आणि उत्साही असा. चांगले ऐकणारे असण्याद्वारे, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अर्थात तिची पार्श्वभूमी व जीवनातील परिस्थिती जाणून घेऊ शकता ज्यामुळे तिला आध्यात्मिकरित्या सर्वोत्तमप्रकारे कशी मदत करावी हे जाणण्यास तुम्हाला मदत मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेण्यास इच्छुक असा.—१ थेस्सलनी. २:८.
४ एकदा अभ्यास स्थापित केल्यावर, ज्ञान पुस्तकातील अध्यायांचा अभ्यास अनुक्रमाने करणे उत्तम आहे. यामुळे विद्यार्थ्याला सत्याची प्रगतीशील समज प्राप्त करणे शक्य होईल कारण हे पुस्तक सर्वात तर्कशुद्ध क्रमाने बायबलच्या विषयांचा विकास करते. अभ्यास साधा व मनोरंजक असू द्या जेणेकरून तो सजीव असेल व पुढे प्रगती करीत राहील. (रोम. १२:११) परिस्थिती व विद्यार्थ्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे, एक तासाच्या एका सत्रात अभ्यासाची घाईघाई न करता तुम्ही बहुतांश अध्याय पूर्ण करू शकाल. शिक्षक तसेच विद्यार्थी या दोघांनीही प्रत्येक आठवडी अभ्यासाच्या वेळेला धरून राहिल्यास विद्यार्थी चांगली प्रगती करतील. यास्तव, बहुतांश व्यक्तींच्या बाबतीत, जवळजवळ सहा महिन्यांत पुस्तकातील १९ अध्याय पूर्ण करणे शक्य होईल.
५ प्रत्येक सत्राची सुरवात, साहित्याबद्दल आस्था उद्दीपित करणारी संक्षिप्त विवेचने मांडून करा. प्रत्येक अध्यायाचे शीर्षकच त्या अध्यायाचा मुख्य विषय असतो ज्यावर जोर देण्याची गरज आहे असे तुम्हाला दिसून येईल. प्रत्येक उपशिर्षकात एक मुख्य मुद्दा अलग केलेला असतो, ज्यामुळे तुम्हाला अध्यायाचा विषय ध्यानात ठेवण्यास मदत मिळते. अधिक न बोलण्याबद्दल दक्ष असा. त्याऐवजी, विद्यार्थ्याचे आर्विभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्याला जे आधीच माहीत आहे त्या आधारावर विशिष्ट सूचक प्रश्न विचारल्याने, त्याला तर्क करण्यास व योग्य निष्कर्ष काढण्यास मदत मिळेल. (मत्त. १७:२४-२६; लूक १०:२५-३७; पाहा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ५१, परिच्छेद १०.) ज्ञान पुस्तकातील छापील माहितीलाच जडून राहा. अधिक तपशीलांमुळे मुख्य मुद्यांचे महत्त्व कमी होऊ शकते किंवा ते अस्पष्ट होऊ शकतात आणि अभ्यास लांबवला जाऊ शकतो. (योहा. १६:१२) अभ्यास केल्या जाणाऱ्या विषयाला धरून नसलेला प्रश्न विचारण्यात आल्यास, बहुतांश वेळा तुम्ही अभ्यासाच्या शेवटी त्याचे उत्तर देऊ शकता. यामुळे, विचलित न होता तुम्ही त्या आठवड्याचा अध्याय पूर्ण करू शकाल. कालांतराने त्या विद्यार्थ्याच्या बहुतेक व्यक्तिगत प्रश्नांची उत्तरे अभ्यासादरम्यान दिली जातील हे त्यास समजावून सांगा.—पाहा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, पृष्ठ ९४, परिच्छेद १४.
६ त्रैक्य, जीवाचे अमरत्व, नरकाग्नी किंवा इतर खोट्या शिकवणुकींवर विद्यार्थी दृढपणे विश्वास करत असून ज्ञान पुस्तकात जे सादर केले आहे त्यामुळे तो समाधानी नसल्यास, तुम्ही त्यास युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तक किंवा त्या विषयाची चर्चा करणारे दुसरे एखादे पुस्तक देऊ शकता. तो जे काही वाचतो त्याबद्दल विचार केल्यावर तुम्ही त्याच्यासोबत त्या विषयावर अधिक चर्चा कराल हे त्यास सांगा.
७ यहोवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांकरता अभ्यासाची सुरवात व शेवट प्रार्थनेने केल्यामुळे तो प्रसंग आदरपूर्ण होतो, एखाद्याची आदरणीय मनःस्थिती होते व खरा शिक्षक म्हणून यहोवाकडे लक्ष वेधले जाते. (योहा. ६:४५) तो विद्यार्थी अद्यापही तंबाखूचा वापर करत असल्यास, अभ्यासादरम्यान तंबाखूचा वापर न करण्यासाठी तुम्हाला त्यास सांगण्याची गरज पडेल.—प्रे. कृत्ये २४:१६; याको. ४:३.
८ शास्त्रवचने, चित्र आणि उजळणी प्रश्नांद्वारे प्रभावकारीपणे शिकवा: शिक्षकाने साहित्याचा अभ्यास आधी कितीही वेळा केला असला, तरी विशिष्ट विद्यार्थ्याला लक्षात ठेवून एखादा कुशल शिक्षक प्रत्येक धड्याची उजळणी करील. यामुळे विद्यार्थ्याच्या प्रश्नांचा अजमास करण्यास मदत होते. प्रभावशालीपणे शिकवण्याकरता, अध्यायातील मुख्य मुद्यांची स्पष्ट समज मिळवा. शास्त्रवचने साहित्याला कसे लागू होतात ते पाहण्यासाठी ती काढून पाहा आणि अभ्यासादरम्यान कोणती वाचली जावीत ते ठरवा. चित्रांचा व अध्यायाच्या शेवटी दिलेल्या उजळणीच्या प्रश्नांचा उपयोग करून तुम्ही कसे शिकवू शकता याचा विचार करा.
९ शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग करून विद्यार्थी खरोखर बायबलचा अभ्यास करत आहे हे समजण्यास तुम्ही त्यास मदत करू शकता. (प्रे. कृत्ये १७:११) ज्ञान पुस्तकामध्ये, पृष्ठ १४ वरील “स्वतःच्या बायबलशी अधिक परिचित व्हा” या चौकटीचा उपयोग करून शास्त्रवचने कशी शोधावीत हे त्यास शिकवा. धड्यात उद्धृत केलेली वचने कशी ओळखावीत ते त्यास दाखवा. वेळ अनुमती देईल त्यानुसार, उल्लेखिलेली पण उद्धृत न केलेली शास्त्रवचने काढून ती वाचा. परिच्छेदात सांगितलेल्या माहितीला ती शास्त्रवचने कसा आधार देतात किंवा स्पष्ट करतात त्यावर विद्यार्थ्याला विवेचन मांडण्यास सांगा. वचनांमधील मुख्य भागांवर जोर द्या जेणेकरून धड्यामधील मुख्य मुद्यांची कारणे त्याला समजतील. (नहे. ८:८) सामान्यतः, शिक्षकाला, पुस्तकात दिलेली आहेत त्यापेक्षा अधिक वचने चर्चेमध्ये गोवण्याची गरज नाही. बायबल पुस्तकांची नावे आणि त्यांचा क्रम जाणण्याच्या महत्त्वाविषयी सांगा. विद्यार्थ्याने, जून १५, १९९१, टेहळणी बुरूज (इंग्रजी) नियतकालिकातील पृष्ठे २७-३० वाचल्यास त्याला लाभ मिळेल. उचित असेल तेव्हा, नवे जग भाषांतर (इंग्रजी) याचा उपयोग करण्यास उत्तेजन द्या. त्याचे विविध सदर, जसे की, समासातील संदर्भ आणि बायबल शब्दांची सूची यांचा उपयोग कसा करावा ते तुम्ही पुढे हळूहळू दाखवू शकता.
१० ईश्वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील अभ्यास ३४ स्पष्ट करतो, की उदाहरणे एखाद्याच्या विचारपद्धतीस चेतवतात व नवीन विचार समजण्यास अधिक सोपे करतात. ते बौद्धिक अपीलासोबत भावनात्मक आघातही जोडतात, जेणेकरून संदेश अशा जोरदारपणे कळवला जातो की जो वस्तुस्थितीच्या सरळ विधानांनी बहुतेकवेळा शक्य होत नाही. (मत्त. १३:३४) ज्ञान पुस्तकात अशी अनेक बोधक उदाहरणे आहेत जी सरळ असूनही शक्तिशाली आहेत. उदाहरणार्थ, १७ व्या अध्यायात दिलेले उदाहरण, यहोवा ख्रिस्ती मंडळीद्वारे आध्यात्मिकरित्या अन्न, वस्त्र आणि निवारा कसे पुरवतो याबद्दल आपली कृतज्ञता वाढवते. ज्ञान पुस्तकातील सुंदर सचित्र उदाहरणे, भावनांना उद्दीपित करण्यासाठी प्रभावशालीपणे उपयोगात आणली जाऊ शकतात. विद्यार्थ्याला पृष्ठ ८६ वरील चित्र पाहण्यास लावून, पृष्ठ १८५ वरील “आनंदी पुनरुत्थान” या उपशिर्षकाखाली परिच्छेद १८ चा प्रभाव वाढवला जाईल. यामुळे देव राज्यामधील वास्तविकता म्हणून पुनरुत्थानाचा विचार करण्यास त्याला प्रवृत्त केले जाईल.
११ बायबल विद्यार्थ्यांनी प्रत्येक धड्यासोबत आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज आहे. या कारणास्तव, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आढळणाऱ्या “तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा” या चौकटीतील उजळणी प्रश्ने विचारण्यास विसरू नका. जे काही अभ्यासले होते त्यावरचे मात्र बौद्धिक स्पष्टीकरण नव्हे तर त्यापेक्षाही अधिक स्पष्टीकरणाची अपेक्षा करा. यातील अनेक प्रश्न, अंतःकरणापासूनचा व्यक्तिगत प्रतिसाद मिळवण्याकरता बनवले आहेत. उदाहरणार्थ, पृष्ठ ३१ पाहा, जेथे विद्यार्थ्याला असे विचारण्यात आले आहे: “यहोवा देवाचे कोणते गुण तुम्हाला अधिक आवडतात?”—२ करिंथ. १३:५.
१२ विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता तयारी करण्यास प्रशिक्षण द्या: जो विद्यार्थी आधीच धडा वाचतो, उत्तरे रेखांकित करतो व त्यांना आपल्या शब्दांत कसे व्यक्त करावे याचा विचार करतो तो लवकर आध्यात्मिक प्रगती करील. तुमचे उदाहरण आणि उत्तेजन यांद्वारे तुम्ही अभ्यासाकरता तयारी करण्यास त्यास प्रशिक्षण देऊ शकता. त्याला तुमचे पुस्तक दाखवा ज्यामध्ये तुम्ही मुख्य शब्द अथवा वाक्यांश ठळक किंवा अधोरेखित केली आहेत. छापील प्रश्नांची थेट उत्तरे कशी शोधावीत ते समजावून सांगा. एकत्र मिळून एखाद्या अध्यायाची तयारी करणे विद्यार्थ्याला लाभदायक ठरेल. आपल्या शब्दात स्वतःला व्यक्त करण्याकरता त्यास उत्तेजन द्या. तेव्हाच, त्याला साहित्य कळते की नाही हे स्पष्ट होते. त्याने पुस्तकातून आपले उत्तर वाचून दाखवल्यास, दुसऱ्या कोणा व्यक्तीला तो हा मुद्दा स्वतःच्या शब्दात कसा समजावून सांगील असे विचारून विचार करण्यास तुम्ही त्यास उद्दिपित करू शकता.
१३ साप्ताहिक तयारीचा भाग म्हणून विद्यार्थ्याला उद्धृत न केलेली शास्त्रवचने काढून पाहण्यास प्रोत्साहन द्या कारण अभ्यासादरम्यान कदाचित ती सर्व वाचून काढण्यास वेळ नसेल. धडे तयार करण्यात तो जे परिश्रम घेत आहे त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. (२ पेत्र १:५; बायबल अभ्यासादरम्यान शिकणे वाढवण्याकरता शिक्षक व विद्यार्थी हे दोघेही काय करू शकतात यावरील जादा सूचनांकरता ऑगस्ट १५, १९९३, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे १३-१४ पाहा.) अशा तऱ्हेने, विद्यार्थ्याला अर्थपूर्ण विवेचनांची तयारी करण्यास व ती मंडळीच्या सभांमध्ये सांगण्यास प्रशिक्षण दिले जाते. ज्ञान पुस्तकातून व्यक्तिगत बायबल अभ्यास समाप्त झाल्यावर सत्यामध्ये प्रगती करत राहण्यास त्याला सज्ज करील अशा व्यक्तिगत अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा विकसित कराव्यात हे तो शिकेल.—१ तीम. ४:१५; १ पेत्र २:२.
१४ विद्यार्थ्यांना यहोवाच्या संघटनेकडे निर्देशित करा: विद्यार्थ्यांच्या आस्थेला यहोवाच्या संघटनेकडे निर्देशित करणे ही शिष्य बनवणाऱ्याची जबाबदारी आहे. विद्यार्थ्याने संघटनेला ओळखले आणि त्याची प्रशंसा केली व तिचा भाग असण्याची गरज जाणली तर विद्यार्थी लवकरात लवकर आध्यात्मिक प्रौढतेप्रत पोहंचेल. देवाच्या लोकांसोबत सहवास राखण्यात त्याला समाधान मिळावे व आपल्यासोबत राज्य सभागृहात जेथे ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये सादर केला जाणारा आध्यात्मिक व भावनिक आधार त्याला मिळू शकेल तेथे येण्याबद्दल त्याने उत्सुक असावे असे आपल्याला वाटते.—१ तीम. ३:१५.
१५ यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत हे माहितीपत्रक, यहोवा आपली इच्छा साध्य करण्यासाठी ज्या एकमेव दृश्य संघटनेचा उपयोग करत आहे त्याजशी व्यक्तींचा परिचय करून देण्याकरता बनवले आहे. एकदा अभ्यास स्थापित झाल्यावर विद्यार्थ्याला एक प्रत का देऊ नये बरे? अगदी सुरवातीपासूनच विद्यार्थ्याला सभांना येण्याचे आमंत्रण देत राहा. त्या कशा चालवल्या जातात ते स्पष्ट करा. तुम्ही त्यास, पुढे दिल्या जाणाऱ्या जाहीर भाषणाचा विषय सांगू शकता अथवा टेहळणी बुरूज नियतकालिकात चर्चिला जाणारा लेख त्यास दाखवा. कदाचित सभा चालू नसताना तुम्ही त्यास राज्य सभागृह पाहण्यास नेऊ शकता जेणेकरून पहिल्याच वेळी नवीन ठिकाणी जाण्याबद्दल त्याच्या मनात जर काही अस्वस्थता असेल तर ती दूर होईल. सभांना जाण्याकरता तुम्ही वाहतुकीची सोय करू शकता. उपस्थित राहिल्यावर, त्याचे स्वागत करा व त्याचा संकोच दूर करा. (मत्त. ७:१२) त्याची ओळख इतर साक्षीदारांसमवेत तसेच वडिलांशी देखील करा. तो मंडळीला त्याचे आध्यात्मिक कुटुंब समजू लागेल अशी आशा करू या. (मत्त. १२:४९, ५०; मार्क १०:२९, ३०) तुम्ही त्याच्यासमोर एखादे ध्येय ठेवू शकता, जसे प्रत्येक आठवडी एका सभेला उपस्थित राहणे व नंतर हळूहळू ते ध्येय वाढवा.—इब्री. १०:२४, २५.
१६ गृह बायबल अभ्यास ज्ञान पुस्तकातून पुढे जातो तसे, सभांमध्ये मंडळीसोबत नियमित सहवास राखण्याच्या गरजेला ठळक मांडणाऱ्या भागांवर जोर द्या. विशेषतः, पृष्ठे ५२, ११५, १३७-९, १५९, तसेच अध्याय १७ पाहा. यहोवाच्या संघटनेप्रती कृतज्ञेच्या तुमच्या स्वतःच्या भावनांना व्यक्त करा. (मत्त. २४:४५-४७) स्थानीय मंडळी व तुम्ही सभांमध्ये जे काही शिकता त्याविषयी सकारात्मकपणे बोला. (स्तोत्र ८४:१०; १३३:१-३) विद्यार्थ्याला, यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना (इंग्रजी) येथपासून सुरवात करून संस्थेचे प्रत्येक व्हिडिओ पाहावयास मिळाले तर ते चांगले असेल. संघटनेकडे आस्था कशी निर्देशित करावी याविषयावरील अधिक माहितीसाठी नोव्हेंबर १, १९८४, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे १४-१८ आणि एप्रिल १९९३ आमची राज्य सेवा पुरवणी पाहा.
१७ इतरांना साक्ष देण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या: लोकांसोबत अभ्यास करण्याचा आपला हेतू म्हणजे, यहोवासाठी साक्ष देणाऱ्यांना शिष्य बनवणे हा होय. (यश. ४३:१०-१२) याचा अर्थ, विद्यार्थी बायबलमधून जे काही शिकत आहे त्याविषयी त्याने इतरांसोबत बोलावे म्हणून शिक्षकाने त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. “हे सत्य तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसे समजावून सांगाल?” अथवा “एखाद्या मित्राला हे सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही कोणते शास्त्रवचन वापराल?” असे प्रश्न विचारून हे केले जाऊ शकते. ज्ञान पुस्तकात साक्षकार्य करण्यास उत्तेजन दिले आहे त्या मुख्य ठिकाणांवर जोर द्या, जसे पृष्ठे २२, ९३-५, १०५-६ तसेच अध्याय १८. उचित समयी, इतरांना अनौपचारिक साक्ष देताना विद्यार्थ्याने काही पत्रिका उपयोगात आणाव्यात म्हणून त्याला त्या दिल्या जाऊ शकतात. त्याने आपल्या कौटुंबिक सदस्यांना अभ्यासासाठी बसण्याकरता बोलवावे हे सुचवा. ज्यांना अभ्यास करावयास आवडेल असे त्याचे मित्र आहेत का? जे आस्थेवाईक आहेत अशांकडे तुमचा उल्लेख करावयास त्यास सांगा.
१८ ईश्वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा यांना उपस्थित राहण्याकरवी संभाव्य शिष्याला अधिक प्रशिक्षण आणि उद्दीपन प्राप्त होईल ज्याद्वारे त्याला सुवार्तेचा प्रचारक बनण्यास मदत मिळेल. प्रशालेत नाव नोंदवण्याविषयी किंवा बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्यास त्याने आस्था दाखवल्यास आपली सेवा (इंग्रजी) पुस्तकातील ९८ आणि ९९ पृष्ठांवर दिलेली तत्त्वे लागू होतील. त्याच्या जीवनातील एखादा पैलू त्याला पात्र ठरण्यापासून रोखत असल्यास, संस्थेच्या प्रकाशनांमध्ये त्या विषयावरील मदतदायी साहित्य शोधा आणि त्यास सांगा. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला तंबाखूचे किंवा इतर मादक औषधांचे व्यसन सोडवण्यात अडचण वाटत असेल. ख्रिश्चनांनी अशा हानीकारक सवयी का टाळाव्यात याबद्दल युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तक जोरदार शास्त्रवचनीय कारणे देते, व पृष्ठ ११२ वर इतरांना त्यापासून सुटका मिळवण्याकरता मदत देण्यात यशस्वी ठरलेला मार्ग दिला आहे. त्याच्यासोबत त्याविषयी प्रार्थना करा, व मदतीकरता यहोवावर अधिकाधिक विसंबून राहण्याचे त्यास शिकवा.—याको. ४:८.
१९ जाहीर सेवाकार्यात भाग घेण्याकरता एखादा पात्र ठरतो की नाही हे ठरवण्यासाठी अनुसरायची पद्धत जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठ १६ परिच्छेद ६ मध्ये दिली आहे. विद्यार्थी पात्र ठरल्यास, क्षेत्र सेवेतील त्याच्या पहिल्या दिवसाकरता तयारी करण्यास सराव सत्र घेणे मदतदायी ठरेल. सकारात्मक पद्धतीने, तुमच्या क्षेत्रात सामान्य असलेले लोकांचे प्रतिसाद आणि आक्षेप यांची चर्चा करा. शक्य असल्यास, प्रथम त्याची सुरवात घरोघरच्या कार्यापासून करा, आणि मग हळूहळू सेवेतील इतर पैलूबद्दल त्याला प्रशिक्षण द्या. तुमची सादरता तुम्ही संक्षिप्त व सरळ ठेवल्यास, त्याला अनुकरण करणे सोपे जाईल. उभारणीकारक आणि उत्तेजनात्मक असून कार्यात आनंद झळकवणारे असा ज्यामुळे तो तुमची मनोवृत्ती अनुसरील व तीच प्रतिबिंबित करील. (प्रे. कृत्ये १८:२५) नवीन शिष्याचे ध्येय, सुवार्तेचा नियमित, आवेशी प्रचारक बनणे हे असले पाहिजे. कदाचित सेवेकरता एखादा व्यावहारिक आराखडा तयार करण्यामध्ये तुम्ही त्यास मदत करू शकता. इतरांना साक्ष देण्याच्या क्षमतेत त्याने प्रगती करावी म्हणून त्याने ऑगस्ट १५, १९८४, पृष्ठे १५-२५; जुलै १५, १९८८, पृष्ठे ९-२०; जानेवारी १५, १९९१, पृष्ठे १५-२०; आणि जानेवारी १, १९९४, पृष्ठे २०-५ या अंकांची टेहळणी बुरूज (इंग्रजी) नियतकालिके वाचावी असे तुम्ही सुचवू शकता.
२० विद्यार्थ्यांना समर्पण आणि बाप्तिस्मा यांसाठी चालना द्या: प्रामाणिक अंतःकरणाच्या विद्यार्थ्याने देवाला समर्पण करून बाप्तिस्म्याकरता पात्र ठरण्यासाठी ज्ञान पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे पुरेसे शिकावयास हवे. (पडताळा प्रे. कृत्ये ८:२७-३९; १६:२५-३४.) तथापि, एखाद्या व्यक्तीने समर्पण करण्यास प्रवृत्त होण्याआधी यहोवाबद्दल भक्तीभाव विकसित केला पाहिजे. (स्तोत्र ७३:२५-२८) अभ्यासादरम्यान, यहोवाच्या गुणांबद्दल प्रशंसा विकसित करण्याच्या संधी पाहा. देवाप्रती तुमच्या सखोल भावनांना व्यक्त करा. विद्यार्थ्याने यहोवासोबत जिव्हाळ्याचा, व्यक्तिगत नातेसंबंध विकसित करण्याबद्दल त्याला विचार करण्यास मदत करा. तो खरोखर देवाला जाणू लागला व त्यावर प्रेम करू लागला, तर तो त्याची विश्वासूपणे सेवा करील कारण ईश्वरी भक्तीमध्ये, यहोवा एक व्यक्ती आहे, याबद्दल आपल्याला काय वाटते हे समाविष्ट आहे.—१ तीम. ४:७, ८; पाहा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, पृष्ठ ७६, परिच्छेद ११.
२१ विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र ११९:११; प्रे. कृत्ये १६:१४; रोम. १०:१०) त्याने, सत्य त्याच्यावर व्यक्तिगतपणे कसा प्रभाव पाडते हे पाहण्याची व तो जे काही शिकला आहे त्याविषयी काय करावे हे ठरवण्याची गरज आहे. (रोम. १२:२) दर आठवडी त्याच्यासमोर सादर केल्या जाणाऱ्या सत्यावर त्याचा विश्वास आहे काय? (१ थेस्सलनी. २:१३) त्याकरता, दृष्टिकोनात्मक प्रश्न विचारून तुम्ही विद्यार्थ्याला बोलावयास लावू शकता जसे की, तुम्हाला याबद्दल काय वाटते? याचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात कसा करू शकता? त्याच्या विवेचनांद्वारे त्याच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याकरता अधिक मदत कोठे जरूरी आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. (लूक ८:१५; पाहा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, पृष्ठ ५२, परिच्छेद ११.) ज्ञान पुस्तकामध्ये पृष्ठे १७२ आणि १७४ वरील चित्रांचे मथळे असे प्रश्न विचारतात: “तुम्ही देवाला प्रार्थनेद्वारे समर्पण केले आहे का?” आणि “तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून काय रोखत आहे?” हे प्रश्न, कदाचित विद्यार्थ्याला कार्य करण्यास प्रभावीपणे प्रेरणा देतील.
२२ जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठ १७, परिच्छेद ९ येथे बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकाला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असते तेव्हा कोणती पद्धत अनुसरली जाते ते दिले आहे. ज्ञान पुस्तक, “बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रश्न” यांची उत्तरे देण्याकरता एखाद्याला सज्ज करण्याच्या हेतूने लिहिण्यात आले होते; हे प्रश्न आपली सेवा (इंग्रजी) पुस्तकातील परिशिष्टात आढळतात व यांची उजळणी वडील त्याच्यासोबत करतील. ज्ञान पुस्तकातील छापील प्रश्नांची उत्तरे तुम्ही ठासून सांगितली असतील, तर बाप्तिस्म्याच्या तयारीकरता वडील ज्या प्रश्नांची सत्रे घेतात त्यासाठी विद्यार्थी सज्ज असला पाहिजे.
२३ गृह बायबल अभ्यास पूर्ण करणाऱ्यांना मदत करा: एखादा, ज्ञान पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करतो तेव्हा देवाची सेवा करण्यात त्याची प्रामाणिकता आणि त्याला किती आस्था आहे हे तोवर दिसून आले असेल अशी अपेक्षा केली जाते. (मत्त. १३:२३) यास्तव, पुस्तकाचे शेवटले उपशिर्षक असा प्रश्न करते, “तुम्ही काय कराल?” विद्यार्थ्याने देवासोबत विकसित करावयाचा नातेसंबंध, शिकलेले ज्ञान लागू करण्याची गरज आणि यहोवाप्रती आपले प्रेम प्रदर्शित करण्यासाठी लवकर हालचाल करण्याची गरज यांवर लक्ष केंद्रित करण्यास समाप्तीचे परिच्छेद त्याला विनंती करतात. ज्ञान पुस्तकाचा अभ्यास पूर्ण करणाऱ्यांसोबत दुसऱ्या प्रकाशनांचा अभ्यास करण्याची कोणतीही तरतूद नाही. जो विद्यार्थी देवाच्या ज्ञानाला प्रतिसाद देण्यास चुकतो त्याला आध्यात्मिकरित्या प्रगती करण्यासाठी काय केले पाहिजे हे दयाळुपणे व स्पष्टपणे समजावून सांगा. तुम्ही त्याच्यासोबत अधूनमधून संपर्क ठेवू शकता, जेणेकरून सार्वकालिक जीवनाकडे नेणारी पावले उचलण्याचा मार्ग त्याकरता मोकळा राहील.—उप. १२:१३.
२४ सत्य स्वीकारलेल्या आणि बाप्तिस्मा घेतलेल्या नवीन शिष्याला विश्वासात पूर्णतः स्थिर होण्यासाठी ज्ञान आणि समज वाढवण्यात पुष्कळ काही करावे लागेल. (कलस्सै. २:६, ७) ज्ञान पुस्तक पूर्ण केल्यावर त्याचा गृह बायबल अभ्यास चालू ठेवण्याऐवजी आध्यात्मिकरित्या प्रौढ होण्यासाठी तुम्ही स्वतःहून त्याला आवश्यक असलेले व्यक्तिगत साहाय्य देऊ शकता. (गलती. ६:१०; इब्री. ६:२) त्याच्या परीने तो, दररोज बायबलचे वाचन करून, ‘विश्वासू दासाकडील’ टेहळणी बुरूज व इतर प्रकाशनांचा व्यक्तिगतपणे अभ्यास करून, सभांची तयारी आणि त्यांना उपस्थित राहून आणि सह विश्वासूंसोबत सत्याची चर्चा करून पूर्ण समज मिळवू शकतो. (मत्त. २४:४५-४७; स्तोत्र १:२; प्रे. कृत्ये २:४१, ४२; कलस्सै. १:९, १०) त्याने आपली सेवा पुस्तक वाचून त्यामधील साहित्याचा अवलंब केल्यास, त्याची सेवा पूर्णपणे साध्य करण्यासाठी ईश्वरशासित पद्धतीने संघटित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यात येईल.—२ तीम. २:२; ४:५.
२५ शिकवण्याची कला विकसित करा: आपल्याला ‘लोकांस शिष्य करण्याची व त्यांस शिकवण्याची’ कामगिरी देण्यात आली आहे. (मत्त. २८:१९, २०) शिकवण्याची कला शिष्य बनवण्याशी अतूटपणे जुळलेली असल्यामुळे शिक्षक या नात्याने आपण सुधारणा करण्यास झटले पाहिजे. (१ तीम. ४:१६; २ तीम. ४:२) शिकण्याची कला कशी विकसित करावी यावर अधिक मार्गदर्शन मिळवण्याकरता, तुम्हाला प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील “शिकवण्याची कला विकसित करणे” आणि “तुमच्या ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचणे” हे अभ्यास १० आणि १५; सूक्ष्मदृष्टी, खंड दुसरा, यातील “शिक्षक, शिकवणे”; व “अग्नि-प्रतिबंधक साहित्याने बांधकाम करणे” आणि “तुम्ही शिकवता तेव्हा, अंतःकरणापर्यंत पोहंचा” हे टेहळणी बुरूज (इंग्रजी) नियतकालिकातील लेख, ऑगस्ट १, १९८४; “तुम्ही शास्त्रवचनांतून प्रभावीपणे तर्क करता का?,” मार्च १, १९८६; आणि “शिष्य बनविण्यातील आनंद कसा शोधावा,” फेब्रुवारी १५, १९९६, वाचावेसे वाटेल.
२६ तुम्ही ज्ञान पुस्तकाच्या साह्याने शिष्य बनवण्याचा प्रयत्न करता तसे, “वाढविणारा” यहोवा राज्याची सुवार्ता मानवी अंतःकरणांपर्यंत पोहंचवण्यात तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादित करील ही प्रार्थना सतत करत राहा. (१ करिंथ. ३:५-७) सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ज्ञानाची समज प्राप्त करण्यासाठी, कदर बाळगण्यासाठी आणि त्यानुसार कार्य करण्यासाठी इतरांना शिकवण्याच्या आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळो!