गिलियड पदवीधरांना “देण्यात अधिक आनंद” वाटतो
यहोवाच्या साक्षीदारांच्या जगातील मुख्यालयाचे बेथेल कुटुंब तसेच इतर पाहुणे रविवारी, मार्च ६, १९९४ ला एकत्र जमले होते. तो आनंदाचा प्रसंग, वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ९६ व्या पदवीदानाचा होता. जवळपास, दोन दशके यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात सेवा केलेल्या कार्ल एफ. केलिन यांनी त्यांच्या प्रस्तावनेत ४६ विद्यार्थ्यांना सांगितले: “येशूने म्हटले की, घेण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद मिळतो. हेच तुमच्या मिशनरी नेमणूकीच्या बाबतीत असेल—जितके अधिक तुम्ही द्याल, तितके अधिक आनंदी तुम्ही व्हाल.”—प्रे. कृत्ये २०:३५, मराठी कॉमन लँग्वेज बायबल.
निरोपाचे बोधपर शब्द
यानंतर विद्यार्थ्यांपुढे भाषणाची मालिका सादर झाली. सेवा विभाग समितीचे सदस्य लिऑन वेविर यांनी “धीर यहोवाची महिमा करतो” हे शीर्षक विकसित केले. आम्ही सर्वच जण परीक्षांचा सामना करतो. (२ करिंथकर ६:३-५) बंधू वेविर यांनी दर्शवले, “आम्ही तणावाखाली असताना, स्वतःवरच विसंबून राहणे अतिशय सोपे असते.” तथापि, त्यांनी विद्यार्थ्यांना याची आठवण करुन दिली: “मानवांना सामान्य असणाऱ्या कोणत्याही परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा, यहोवाला याबाबतीत आस्था आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही.”—१ करिंथकर १०:१३.
“तुमच्या नेमणूकीची सर्वदा गुणग्राहकता बाळगा” हे, नियमन मंडळाचे सदस्य, लेमन र्स्विगल यांनी दिलेल्या पुढील भाषणाचे शीर्षक होते. इस्राएलांनी, ते कोठे राहतील व काय करतील याची निवड नेहमीच केली नाही. प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग विभागून दिला होता, व लेव्याना विशिष्ट कार्य करण्यासाठी नेमले होते. अशाचप्रकारे, आज खास पूर्ण वेळेच्या सेवेत असणारे अनेक जण—जसे की मिशनरी व बेथेल कुटुंबातील सदस्य—ते कोठे राहतील व कोणते काम करतील या गोष्टीला स्वतःच ठरवत नाही. पण जर एखादा त्याच्या नेमणूकीबद्दल अनिश्चितपणाच्या भावनेचा अनुभव घेत असल्यास काय? “तुम्ही जर आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे तत्परतेने पाहिले, व त्याच्या उदाहरणाचा जवळून विचार केला तर तुम्ही खचून जाणार नाही,” असे बंधू स्विंगल यांनी म्हटले.—इब्रीयांस १२:२, ३.
वॉचटावर मळे समितीचे सदस्य लिओनार्ड पिअरसन यांनी “केंद्रिभूत राहा” हा विषय सादर केला. त्यांनी म्हटले: “तुमच्याकडे एक उत्कृष्ट प्रतीचा कॅमेरा असल्यास, फोटो घेण्यासाठी सुंदर दृश्य, पार्श्वभूमी असूनही—तुमचा कॅमेरा, फोकसवर (प्रतिमा स्वच्छ येईल अशा भिंगाच्या केंद्रस्थानी) न आणल्यास फोटो खराब येऊ शकतात.” विस्तृत भिंगाप्रमाणेच, आमचे दृष्टिकोन जगभरात केल्या जात असलेल्या प्रचाराच्या बाबतीत व्याप्तरुपी असले पाहिजे. आम्ही सर्वकष चित्राला कधीही विसरता कामा नये. “स्वतःवर केंद्रिभूत होणारे, त्यांच्या नेमणूकीत दुःखी राहतील,” असे बंधू पिअरसन यांनी म्हटले. “यहोवावर व त्याने करण्यासाठी दिलेल्या कामावर केंद्रिभूत असणाऱ्यांना यश मिळेल.”
“कृतज्ञ असण्याची अनेक कारणे,” हे पुढील भाषणाचे शीर्षक होते, व ते नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, जॉन इ. बार यांनी दिले. “यहोवासाठी असलेल्या तुमच्या कृतज्ञतेच्या भावनेला कधीही गमावू देऊ नका,” अशी बंधू बार यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिली. “तुमची कोणतीही नेमणूक असली तरी, ती एक मोठ्या समाधानाचे स्त्रोत आहे.” कृतज्ञ मनोवृत्तीने दाविदाला हे लिहिण्यास प्रवृत्त केले: “माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे.” (स्तोत्र १६:६) “तुमच्या दैनंदिन जीवनात, यहोवाच्या जवळ असण्याची भावना, हा अमोल ठेवा तुम्हाजवळ आहे,” असे बंधू बार यांनी म्हटले. “तुम्ही यहोवाच्या नातेसंबंधाबद्दल कृतज्ञ आहात याच्या सहमताने जोवर त्याकडे पाहत राहाल, तोवर त्या नातेसंबंधाला तो कधीही तुम्हापासून हिरावून घेणार नाही.”
त्यानंतर गिलियड प्रशिक्षक जॅक रेडफोर्ड, “तुम्ही तुमच्या जीभेचा कसा वापर कराल?” या विषयावर बोलणार होते. घातक अविचारीपणाचे बोल किती वाईट करु शकतात! (नीतीसूत्रे १८:२१) जीभेला नियंत्रणाखाली कसे आणले जाऊ शकते? याचे उत्तर बंधू रेडफोर्ड यांनी दिले, “प्रथम तुम्ही तुमच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे, कारण जीभ, मन आणि हृदयाला प्रवर्तित करते.” (मत्तय १२:३४-३७) येशूने उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केले; त्याने यहोवाच्या नावाची महिमा करण्यासाठी जीभेचा वापर केला. बंधू रेडफोर्ड यांनी वर्गाला सांगितले की, “आज यहोवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ आहे. ती वचने तुम्हाला माहीत आहेत. तुमच्याकडे ‘सुशिक्षितांची जिव्हा’ आहे. यास्तव, यहोवाला समर्पित केलेल्या मन आणि हृदयाने नेहमीच जीभेला मार्गदर्शित करा.”—यशया ५०:४.
प्रार्थनेचे महत्त्व, “तुम्ही यहोवाच्या सान्निध्यात असल्याप्रमाणे चालत आहात का?” या भाषणात स्पष्ट केले. प्रशालेचे निबंधक, उलीसेस ग्लास यांनी म्हटले: “एखादा पिता त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी काबाडकष्ट करतो परंतु, त्यांच्याबरोबर कधी बोलत नाही किंवा प्रेमाचे शब्द काढत नसल्यास, काबाड कष्ट करण्याची त्याची मनोवृत्ती प्रीतीमुळे नव्हे तर, दुःखाने कराव्या लागणाऱ्या कर्तव्यामुळे आहे, असा निष्कर्ष त्याचे कुटुंब काढू शकते. हेच आमच्या बाबतीत असू शकते. आम्ही देवाच्या सेवेत व्यग्र असू. पण आम्ही प्रार्थना केली नसल्यास, आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्याला समर्पित होण्याऐवजी आम्ही केवळ कामाला समर्पित असतो.”
“देवाच्या लोकांसोबत मोठा लोकसमुदाय का सहवास ठेवत आहे?” या विषयावर नियमन मंडळाचे सदस्य थिओडोर झरॅक् बोलले. प्रत्येक वर्षी लाखो लोक यहोवाच्या संघटनेत येतात. (जखऱ्या ८:२३) यहोवाचे साक्षीदार, देवाचे लोक आहेत ही ओळख कशामुळे मिळते? प्रथम, ते संपूर्ण पवित्र शास्त्राचा, देवाचे वचन म्हणून स्वीकार करतात. (२ तीमथ्य ३:१६) दुसरे, राजकीय रित्या ते तटस्थ आहेत. (योहान १७:१६) तिसरे, ते देवाच्या नावाची साक्ष देतात. (योहान १७:२६) चवथे, ते स्वार्थत्यागी प्रीतीला प्रदर्शित करतात. (योहान १३:३५; १५:१३) या ओळखचिन्हासहित आम्ही, ‘ज्याने आम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण धैर्याने प्रसिद्ध करावेत.’—१ पेत्र २:९.
या चेतना देणाऱ्या भाषणांनंतर, सर्व ४६ विद्यार्थ्यांना पदवी मिळाली. त्यांना जगभरातील १६ देशात नेमणूक देण्यात आली.
दुपारचा विविध कार्यक्रम
दुपारी, बेथेल समितीचे सदस्य, डॉनाल्ड क्रेब्स् यांनी वॉचटावरचा संक्षिप्त अभ्यास घेतला. त्यानंतर पदवीधरांनी, “ज्ञान [बुद्धी, NW] रस्त्यावर पुकारा करिते” यावर एक कार्यक्रम सादर केला. (नीतीसूत्रे १:२०) त्यांनी व्यापारी क्षेत्रात तसेच रस्त्यावरील साक्षीकार्यात आलेल्या अनुभवाच्या भूमिका पुन्हा सादर केल्या. खरेच, अनौपचारिक प्रचार करण्याचे धैर्य धरणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देतो. एका पदवीधराने म्हटले, “कापणी करणाऱ्या देवदूतांच्या हातातील विळ्याप्रमाणे स्वतःचा विचार करावा, असे मला वाटते. आमची कुशलता जितकी तीक्ष्ण असेल, तितक्या अधिक प्रमाणात ते देवदूत आमचा वापर करतील.” (पडताळा प्रकटीकरण १४:६.) विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात, सरक चित्रांच्या प्रस्तुतीचा देखील समावेश होता, ज्याने श्रोत्यांना या वर्गामधील पदवीधरांना पाठविण्यात आले त्या—बोलिव्हिया, माल्टा, व तैवान या तीन देशात शैक्षणिक यात्रेसाठी नेले.
त्यानंतर, पूर्वी १७ वर्षे मिशनरी सेवेत असलेल्या वॉल्स व जॅन लिव्हरन्स् यांची मुलाखत घेतली. ऑक्टोबर १९९३ मध्ये त्यांना वॉचटावर मळे येथे बोलावण्यात आले होते. बंधू लिव्हरन्स् तेथे आता गिलियड प्रशिक्षक या नात्याने सेवा करीत आहेत.
चार-दृश्यांची सादरता त्यानंतर दाखविण्यात आली. त्याचे शीर्षक, “पात्र जनांचा त्यांच्या उतारवयात सन्मान करणे” हे होते. लोक जसे वयस्कर होतात, तसे निरुपयोगीपणाचे व त्यागले जाण्याचे भय त्यांच्या आत्मविश्वासाला क्षुब्ध करु शकते. (स्तोत्र ७१:९) या हृदयस्पर्शी सादरतेने, मंडळीतील सर्वच जण अशा विश्वासू वयस्करांना कशी मदत करु शकतात ते दाखवले.
समारोपाचे गीत व प्रार्थनेनंतर, जर्सी शहराच्या संमेलन गृहातील तसेच शेजारच्या सभागृहांमधील सर्व ६,२२० उपस्थितांना तजेला मिळाला. पदवीधरांच्या नव्या नेमणूकीत त्यांच्यासह आमच्या प्रार्थना राहतील. देण्याद्वारे मिळणाऱ्या अधिक आनंदाचा ते सतत अनुभव घेत राहोत.
[२६ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
प्रतिनिधीत्व केले गेलेले देश: ९
नेमणूक देण्यात आलेले देश: १६
विद्यार्थी: ४६
सरासरी वय: ३३.८५
सत्यातील सरासरी वर्षे: १६:६
पूर्ण वेळेच्या सेवेतील सरासरी वर्षे: १२:२
[२७ पानांवरील चौकट]
माल्टावर प्रकाशझोत
माल्टावर ख्रिस्ती धर्मराज्याने बायबल सत्याविषयी अनेक वर्षांपासून बंदी आणली होती. १९४७ मध्ये गिलियडच्या आठव्या वर्गामधून पदवीधर झालेले फ्रेडरिक स्मेड्ली व पीटर ब्राइडल हे तेथे पाठविलेले शेवटचे गिलियड मिशनरी होते. परंतु, माल्टात पोहचल्यावर लगेच त्यांना अटक करून तेथून हाकलण्यात आले. यहोवाच्या साक्षीदारांचा १९४८ चा वार्षिक अहवाल (इंग्रजी) सांगतो: “या दोन मिशनऱ्यांनी त्यांचे मिशनरी कार्य करताना, रोमन कॅथोलिक अधिकारश्रेणीच्या विरोधामुळे, न्यायालयात व त्या राष्ट्रातील अधिकाऱ्यांसोबत अधिक काळ खर्च केला. पाळक म्हणतात की, माल्टा कॅथोलिकांचा आहे व इतरांनी तेथून निघून जावे.” आता जवळजवळ ४५ वर्षांनंतर, गिलियडच्या ९६ व्या वर्गामधील चार मिशनऱ्यांना तेथे नेमणूक दिली आहे.
[२६ पानांवरील चित्रं]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधरांचा ९६ वा वर्ग
खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक दिले आहे, व प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे नावांची यादी दिली आहे. (१) एलर्स, पी.; गिझी, एम.; झेलमन, एस.; सस्पेरेगी, जे.; रो, एस.; जॅकसन, के.; स्कॉट, टी. (२) लिऑर, टी.; गॉरसिऑ, आय.; गॉरसिऑ, जे.; फर्नांडिस, ए.; डेविडसन, एल.; लिडमन, पी.; गिबसन, एल.; हॉरेज, सी. (३) फाऊटस्, सी.; पॉस्ट्रॉना, जी.; क्लॉसन, डी.; फर्नांडिस, एल.; वॉल्स्, एम.; सन, एम.; पॉस्ट्रॉना, एफ.; बर्कस्, जे. (४) बर्कस्, डी.; स्कॉट, एस.; जॅकसन, एम.; मॉरी, एच.; हॉरेज, एल.; सस्पेरेगी, ए.; ब्रुरशॉन, सी.; रो, सी. (५) झेलमन, के.; लिडमन, पी.; डेविडसन, सी.; मॉरी, एस.; वॉल्स्, डी.; ड्रेसन, डी.; स्कॉफस्मॉ, जी.; लिअर, एस. (६) क्लेइसन, टी.; गिबसन, टी.; गिझी, सी.; एलर्स, डी.; फाऊटस्, आर.; स्कॉफस्मॉ, एस.; ब्रुरशॉन, एल.