वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ६/१ पृ. २५-२८
  • गिलियड प्रशाला आपला १०० वा वर्ग पाठवते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गिलियड प्रशाला आपला १०० वा वर्ग पाठवते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वडीलधाऱ्‍यांकडून शास्त्रवचनीय सल्ला
  • क्षेत्रातील व्यावहारिक अभिव्यक्‍ती
  • यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • स्वेच्छेने लोक गिलियडला येतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • देव वचनाच्या विद्यार्थ्यांना पदवीदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ६/१ पृ. २५-२८

गिलियड प्रशाला आपला १०० वा वर्ग पाठवते

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेने आधुनिक काळात देव राज्याच्या जगव्याप्त घोषणेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. गिलियड प्रशालेने १९४३ मध्ये मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केल्यापासून, तिच्या पदवीधारकांनी २०० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये सेवा केली आहे. मार्च २, १९९६ रोजी, १०० वा वर्ग स्नातक झाला.

न्यूयॉर्क, पॅटरसन येथील वॉचटावर शिक्षण केंद्राच्या परिसरात दोन मीटरपेक्षा अधिक हिमवर्षाव झाला होता तरी विद्यार्थी प्रशालेस उपस्थित राहिले होते. यात आश्‍चर्य नाही, की त्यांच्या पदवीदानाच्या दिवशी देखील हिमवर्षाव होत होता. तरीसुद्धा, सभागृह तुडुंब भरले होते व पॅटरसन, वॉलकील आणि ब्रुकलिन येथील सभागृहांत खच्चून भरलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाचे श्रवण केले—एकूण २,८७८ लोक उपस्थित होते.

नियमन मंडळाच्या शिक्षण समितीचे सदस्य थिओडोर जेराक, हे अध्यक्ष होते. पुष्कळ देशांतून आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केल्यानंतर त्यांनी सर्वांना उभे राहून गीत क्रमांक ५२ गाण्यास आमंत्रित केले. ते सर्व यहोवाचे गुणगान करा (इंग्रजी) या पुस्तकातून “आपल्या पित्याचे नाव” हे गीत गात असताना, सभागृह यहोवाच्या स्तुतीने निनादले. त्या गीताने व त्याचबरोबर यहोवाची स्तुती करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करण्यावरील अध्यक्षांच्या विवेचनांनी पुढील कार्यक्रमासाठी जोमदारपणा आणला.

वडीलधाऱ्‍यांकडून शास्त्रवचनीय सल्ला

कार्यक्रमाचा पहिला भाग, यहोवाच्या अनेक दीर्घकालीन सेवकांनी पदवीधर होणाऱ्‍या वर्गाला दिलेल्या संक्षिप्त भाषणांनी युक्‍त होता. सन १९४० मध्ये आपली पूर्ण-वेळेची सेवा सुरू केलेल्या मुख्यालयातील कुटुंबाचे सदस्य रिचर्ड एब्रहॅमसन यांनी वर्गाला: “फेरबदल करीत राहा,” असे आर्जवले. त्यांनी त्यांस आठवण करून दिली की, ख्रिस्ती या नात्याने त्यांच्या जीवनामध्ये तसेच गिलियड येथील प्रशालेच्या पाच महिन्यांमध्ये त्यांनी फेरबदलाचे अनेक कालावधी अनुभवले होते. तर मग, त्यांना फेरबदल करत राहण्याची गरज का आहे?

प्रेषित पौलाने २ करिंथकर १३:११ मध्ये वापरलेली अभिव्यक्‍ती, “प्रगतिशील हालचाल, यहोवा एखाद्याला घडवतो किंवा शुद्ध करतो त्या क्रियेच्या नित्य अधीन राहणे, योग्य संवादी करणे जेणेकरून एखादी व्यक्‍ती अधिक अपेक्षा करणाऱ्‍या यहोवाच्या दर्जांना पूर्ण करते यास सूचित करते” असे वक्त्याने स्पष्ट केले. परदेशी नेमणुकींमध्ये, पदवीधर वर्गाला त्यांच्या विश्‍वासाच्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. त्यांना नवीन भाषा शिकावी लागणार, वेगळ्या संस्कृतीनुरूप व राहणीमानाच्या परिस्थितींनुरूप बदल करावे लागणार आणि विविध प्रकारच्या क्षेत्राशी जुळवून घ्यावे लागणार होते. आपल्या मिशनरी गृहांमध्ये व नवीन मंडळ्यांमध्येही त्यांना वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्त्वाच्या लोकांना हाताळावे लागणार होते. या सर्व परिस्थितींमध्ये त्यांनी अगर, फेरबदल करण्याच्या इच्छेने काळजीपूर्वकपणे बायबल तत्त्वांना लागू केल्यास, प्रेषित पौलाने लिहिल्याप्रमाणे, त्यांचे देखील “कल्याण” होऊ शकते.

कार्यक्रमात भाग घेणारे जॉन बार, नियमन मंडळाच्या पाच सदस्यांपैकीचे आहेत, त्यांनी १ करिंथकर ४:९ मधून आपले शीर्षक निवडले. ख्रिस्ती जण, देवदूत व मनुष्यांसमोर प्रदर्शन आहेत याची आठवण त्यांनी ऐकणाऱ्‍यांना करून दिली. ते म्हणाले, “हे जाणल्यामुळे तसेच एखादा ख्रिश्‍चन विशेषतः काय म्हणतो व काय करतो याचा स्पष्ट परिणाम, जे पाहात आहेत अशा अदृश्‍य तसेच दृश्‍य जणांवरही होऊ शकतो हे समजल्यामुळे जीवनातील त्याच्या ख्रिस्ती मार्गक्रमणाचे महत्त्व अधिक वाढवते. गिलियडच्या १०० व्या वर्गातील तुम्ही सर्व प्रिय बंधू व भगिनी पृथ्वीच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्‍यांत जाल तेव्हा ही गोष्ट आठवणीत ठेवण्यास अतिशय चांगली असेल असे मला वाटते.”

मेंढरासमान लोकांना सत्य शिकण्यास मदत करताना, “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो,” हे लक्षात ठेवण्यास बंधू बार यांनी सर्व ४८ विद्यार्थ्यांना आर्जवले. (लूक १५:१०) १ करिंथकर ११:१० वचनाचा संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले, की ईश्‍वरशासित व्यवस्थांबद्दल एखाद्याच्या मनोवृत्तीमुळे केवळ आपल्याला दिसणाऱ्‍या आपल्या बंधुभगिनींवरच नव्हे तर आपल्याला न दिसणाऱ्‍या दूतांवरही त्याचा परिणाम होतो. हा विस्तारित दृष्टिक्षेप लक्षात ठेवणे किती फायदेकारक आहे!

नियमन मंडळाचे आणखी एक सदस्य, गेरट लोश, जे स्वतः गिलियड प्रशालेचे पदवीधर आहेत, त्यांनी यहोवा ‘आपल्या लोकांच्या भोवती असतो’ हे दाखवण्यासाठी स्तोत्र १२५:१, २; जखऱ्‍या २:४, ५ व स्तोत्र ७१:२१ यांसारख्या शास्त्रवचनांची चर्चा केली. प्रत्येक बाजूने तो त्यांना संरक्षण देतो. मात्र मोठ्या संकटातच देव अशाप्रकारचे संरक्षण देऊ करील का? “नाही, कारण आत्ताच यहोवा आपल्या लोकांकरता ‘अग्नीचा कोट,’ संरक्षण असा आहे,” असे वक्त्याने उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, “सन १९१९ च्या युद्धानंतरच्या वर्षात, आध्यात्मिक इस्राएलाचे शेष सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून जगभरात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास उत्कट इच्छा बाळगत होते. स्वर्गातील लाक्षणिक जेरुसलेमचे ते प्रतिनिधी होते. अंताच्या समयी यहोवा या प्रतिनिधींना गट या नात्याने ईश्‍वरी संरक्षण देण्याची हमी देतो. मग कोण यांना प्रभावीपणे रोखू शकेल? कोणीच नाही.” त्यांच्याकरता व ईश्‍वरी इच्छा पूर्ण करण्यात त्यांच्याशी जवळून संबंधित असलेल्यांकरता हे किती धीर देणारे आहे!

प्रशाला शिक्षकांपैकीचे ज्येष्ठ सदस्य, एलीसस ग्लास यांनी, ‘यहोवाच्या जागतिक संघटनेत स्वतःचे स्थान बनवण्यास’ वर्गाला उत्तेजन दिले. स्थान, म्हणजे एखाद्या व्यक्‍तीच्या क्षमता किंवा व्यक्‍तित्वाला खासपणे जुळणारी स्थिती किंवा कार्यहालचाल. त्यांनी सांगितले, “तुम्हा संभाव्य मिशनऱ्‍यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक संघटनेत तुमचे स्थान प्राप्त झाले आहे. पण सध्या हे मूल्याचे असले तरी, ते केवळ तुमच्या मिशनरी जीवनाची सुरवात आहे.” त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग करण्यासाठी व यहोवा आणि त्याची संघटना त्यांना देत असलेल्या खास नेमणुकींच्या लायक होण्यासाठी त्यांनी मेहनती असण्याची गरज लागणार होती.

बोलिव्हिया येथे १७ वर्षांकरता सेवा केलेल्या गिलियड शिक्षकांपैकी एक सदस्य, वॉलस लिवरन्स यांनी या कार्यक्रमातील शेवटले भाषण दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. “तुम्ही देवाची परीक्षा पाहणार का?” हे त्यांनी कसे करावे बरे? इस्राएल राष्ट्राने देवाची चुकीच्या पद्धतीने परीक्षा घेतली. (अनुवाद ६:१६) “अर्थात, तक्रार किंवा कुरकूर करून वा कदाचित बाबी हाताळण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल विश्‍वासाची उणीव दाखवून देवाची परीक्षा घेणे चुकीचे आहे,” असे वक्‍ता म्हणाला. “तुम्ही तुमच्या नवीन नेमणुकीत येता तेव्हा, ती प्रवृत्ती टाळा,” असे त्यांनी आर्जवले. मग, देवाची परीक्षा घेण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? “त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवण्याद्वारे, तो जे काही सांगतो अगदी तंतोतंत तसेच वागण्याद्वारे व त्याच्या हाती निकाल सोपवून देण्याद्वारे त्याची परीक्षा घेतली जाऊ शकते,” असे बंधू लिवरन्स यांनी स्पष्ट केले. मलाखी ३:१० येथे दाखवल्यानुसार, यहोवा आपल्या लोकांना आमंत्रण देतो: “माझी प्रतीति पाहा.” त्यांनी विश्‍वासूपणे त्यांचे दशमांश मंदिरातील कोठारात आणल्यास, तो त्यांना आशीर्वाद देईल असे अभिवचन त्याने दिले होते. वक्त्याने विचारले, “तेव्हा आपल्या मिशनरी नेमणुकीकडे अशाच पद्धतीने का पाहू नये बरे? तुम्ही त्यात यशस्वी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे, म्हणून त्याची प्रतीती पाहा. तुमच्या नेमणुकीत टिकून राहा. तुम्ही जे फेरबदल करावेत अशी त्याची इच्छा आहे ते करा. टिकून राहा. तो तुम्हाला आशीर्वादित करील की नाही ते पाहा.” यहोवाची सेवा करणाऱ्‍या सर्वांसाठी हा किती उत्तम सल्ला आहे!

गीतानंतर भाषणाचा कार्यक्रम संपून सुखद मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झाला.

क्षेत्रातील व्यावहारिक अभिव्यक्‍ती

मार्क नुमर, गिलियड शिक्षकांमधील नवीन सदस्य, यांनी विद्यार्थ्यांना प्रशालेला उपस्थित असताना क्षेत्र सेवेत मिळालेल्या अनुभवांचे कथन करण्याचे आमंत्रण दिले. या अनुभवांनी सेवाकार्यात पुढाकार घेण्याचे महत्त्व दाखवून दिले आणि प्रेक्षकांना उपयोगात आणण्याजोग्या व्यावहारिक कल्पना दिल्या.

या गिलियड वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशालेच्या सत्रादरम्यान ४२ देशांतून खास प्रशिक्षणाकरता पॅटरसन शिक्षण केंद्रामध्ये आलेल्या शाखा समितीच्या सदस्यांशी देखील सहवास राखण्याद्वारे खास लाभ झाला. अनेकजण गिलियडमधून पुष्कळ वर्षांआधी पदवीधर झाले होते. कार्यक्रमादरम्यान, तिसऱ्‍या, पाचव्या, बावन्‍नाव्या आणि एक्याण्णव्या वर्गातील तसेच जर्मनीतील गिलियड विस्तार प्रशालेतील प्रतिनिधींच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांची विवेचने केवढी फायदेकारक होती!

त्यांनी, मिशनऱ्‍यांच्या नेमणुकींच्या ठिकाणी यहोवाच्या स्तुतीकर्त्यांची संख्या हातावर मोजण्याइतकी होती आणि आता तिच्यात हजारोंनी वाढ झालेली पाहून त्यांना कसे वाटले ते सांगितले. ॲन्डीज पर्वतरांगांतील विखुरलेल्या वस्त्यांमध्ये तसेच ॲमेझॉन नदीच्या उगमाजवळील खेड्यांमध्ये सुवार्ता घेऊन जाण्यात त्यांनी जो भाग घेतला त्याच्याविषयी सांगितले. अशिक्षित लोकांना साक्ष देण्याबद्दल त्यांनी चर्चा केली. नवीन भाषा शिकण्यासाठी त्यांची किती धडपड चालली होती तसेच पदवीधर, चिनी सारख्या भाषेमध्ये केवढ्या लवकर साक्ष व भाषणे देऊ शकतील याविषयी ते वास्तविक अपेक्षा कशी करू शकतात ते त्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी स्पॅनिश व चिनी भाषांमधील नमुना प्रस्तुती सादर केल्या. मिशनरी जेव्हा लोकांच्या केवळ भाषाच नव्हे तर विचारसरणी शिकतात तेव्हा सर्वात प्रभावकारी ठरतात यावर त्यांनी जोर दिला. त्यांनी गरीब राष्ट्रांतील बहुधा कठीण राहणीमानाविषयी सांगितले व म्हटले: “अशी परिस्थिती बहुतेकवेळा लोकांच्या पिळवणुकीमुळे असते हे मिशनऱ्‍यांनी ओळखले पाहिजे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे असणाऱ्‍या लोकांची जशी येशूला दया आली त्याप्रमाणे एखाद्या मिशनऱ्‍याला वाटत असल्यास तो सर्वतोपरी प्रयत्न करतो.”

एका गीतानंतर, नियमन मंडळाचे सदस्य, ए. डी. श्रोडर यांच्या भाषणाने कार्यक्रम पुढे चालू राहिला. त्यांना, १९४३ मध्ये गिलियड प्रशालेची सुरवात झाली तेव्हा पहिले प्रशिक्षक होण्याचा सुहक्क मिळाला होता. कार्यक्रमाचा उचित समारोप करण्यासाठी त्यांनी “सार्वभौम प्रभू या नात्याने यहोवाची स्तुती करणे” या विषयाची चर्चा केली. बंधू श्रोडर यांच्या २४ व्या स्तोत्राच्या मग्न करणाऱ्‍या चर्चेने उपस्थित असलेल्या सर्वांवर, सार्वभौम प्रभू या नात्याने यहोवाची स्तुती करणे केवढा भव्य सुहक्क आहे याची छाप पाडली.

पदवीदानाचे वितरण व शेवटल्या गीतानंतर नियमन मंडळाच्या कार्ल लेन यांनी अंतःकरणपूर्वक प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप केला. हा कार्यक्रम किती व्यावहारिक आणि आध्यात्मिकरीत्या ताजेतवाना करणारा होता!

पदवीदानानंतरच्या दिवसांमध्ये, १०० व्या वर्गातील ४८ सदस्य १७ देशांतील आपल्या मिशनरी नेमणुकींना जाऊ लागले. परंतु त्यांनी आत्ताच त्यांच्या सेवेची सुरवात केली नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण वेळेच्या ख्रिस्ती सेवेची भरीव नोंद आधीपासूनच होती. गिलियडमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते सरासरी ३३ वर्षांचे होते आणि स्वतःला सुमारे १२ वर्षांपासून पूर्ण वेळेच्या सेवेला वाहून घेतले होते. त्यांच्यातील काही जण वॉचटावर सोसायटीच्या जगव्याप्त बेथेल कुटुबांतील सदस्य होते. इतरांनी प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने कार्य केले होते. पुष्कळ विद्यार्थ्यांचा आधीच—आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका समुद्रातील बेट आणि आपल्या मायदेशातील विदेशी भाषा बोलणाऱ्‍या गटांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या विदेशी सेवेत भाग होता. पण आता ते इतर मिशनऱ्‍यांना सामील झाले आहेत जे, ‘आमची गरज लागेल त्या जगाच्या कोणत्याही ठिकाणी आम्ही कार्य करण्यास तयार आहोत’ असे आनंदाने म्हणतात. यहोवाची स्तुती करण्यासाठी त्यांच्या जीवनाचा उपयोग करावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे.

[२७ पानांवरील तक्‍ता]

वर्गाची आकडेवारी:

प्रतिनिधीत्व करणारी राष्ट्रे: ८

नेमून दिलेल्या राष्ट्रांची संख्या: १७

विद्यार्थ्यांची संख्या: ४८

सरासरी वय: ३३.७५

सत्यातील सरासरी वर्षे: १७.३१

पूर्ण वेळेच्या सेवेतील सरासरी वर्षे: १२.०६

[२६ पानांवरील चित्रं]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा १०० वा वर्ग

खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक देण्यात आले आहेत आणि प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे नावांची यादी दिली आहे.

(१) शर्ली, एम.; ग्रन्डस्टॉर्म, एम.; जेनरडिनी, डी.; जिआयमो, जे.; शुड, डब्ल्यू.; फेअर, पी.; बुचानन, सी.; रॉबिनसन, डी. (२) पाईन, सी.; क्रॉस, बी.; रॅसीकॉट, टी.; हॅनसन, ए.; बीट्‌स, टी.; बर्ग, जे.; गारसिया, एन.; फ्लेमींग, के. (३) वाईनरी, एल.; वाईनरी, एल.; हार्प्स, सी.; जिआयमो, सी.; बर्ग, टी.; मॅन, सी.; बेरीयॉस, वी.; फेफर, सी. (४) रॅनडल, एल.; जेनरडिनी, एस.; क्रॉस, एच.; फ्लेमींग, आर.; डी’अबाडाय, एस.; शर्ली, टी.; स्टीवनसन, जी.; बुचानन, बी. (५) रॉबिनसन, टी.; गारसिया, जे.; हार्प्स, पी.; रॅसीकॉट, डी.; डी’अबाडाय, एफ.; फेअर, एम.; स्टीवनसन, जी.; शुड, डी. (६) बीट्‌स, एल.; फेफर, ए.; बेरीयॉस, एम.; पाईन, जे.; मॅन, एल.; रॅनडल, पी.; ग्रन्डस्टॉर्म, जी.; हॅनसन, जी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा