वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ६/१ पृ. २४
  • देव पक्षपाती नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव पक्षपाती नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कर्नेल्यला पवित्र आत्मा मिळतो
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवा “पक्षपाती नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ६/१ पृ. २४

राज्य घोषकांचा वृत्तांत

देव पक्षपाती नाही

प्रेषित पेत्राने १९०० वर्षांआधी, लष्करी अधिकारी कर्नेल्य याला साक्ष देताना म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) कर्नेल्याने देवाची भीती आणि धार्मिकतेसाठी प्रीती प्रदर्शित केली. पेत्राने दिलेल्या साक्षीचा त्याने स्वीकार केला आणि एक ख्रिस्ती झाला.

तेच तत्त्व—देव पक्षपाती नाही, हे आज देखील खरे ठरते. हे आम्हाला जर्मनीतील एका अनुभवाद्वारे दिसून येते. अहवाल सांगतो:

“आमच्या मंडळीच्या क्षेत्रात, रशियन सैनिकांना राहण्यासाठी असलेल्या मोठ्या इमारती आहेत. १९८९ मध्ये बर्लिन येथील भिंत पडल्यावर लगेच, वडिलांनी कोणा प्रचारकाला रशियन भाषा येते का याविषयी विचारणा केली. आमच्यापैकी काहींना येत असल्यामुळे, आम्ही त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी गेलो. यामुळे खरा आनंद मिळाला. अनेक अनुभवांपैकी खाली एक दिला आहे.

“सेनापतीला बोललो तेव्हा, मी बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकासोबत (आता त्याचा बाप्तिस्मा झाला आहे) होतो. आम्हाला काय सांगायचे ते सेनापतीने लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर सैनिकांबरोबर बोलण्यासाठी त्याने आम्हाला आमंत्रण दिले. त्यांनी देव आणि पवित्र शास्त्राविषयी ऐकलेच पाहिजे, असे त्याने म्हटले. यामुळे आम्ही परत येऊ असे त्यांना सांगितले.

“रशियन भाषा अस्खलित बोलता येत असलेल्या बहिणीने अनुवाद करावा म्हणून तिला आम्ही सोबत घेतले. सैनिकांना राहण्यासाठी असलेल्या इमारतीमधील क्लबरुममध्ये आम्ही साहित्यासाठी टेबल मांडला, आणि ६८ सैनिकांसोबत आम्हाला बोलता आले व त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली. नंतर, त्यांनी ३५ पुस्तके तसेच जवळपास १०० मासिके आनंदाने स्वीकारली. क्लबरुम सोडत असताना साहित्यावर चर्चा करत असलेल्या लहान लहान गटांना आम्ही पाहिले.

“जुलै ४, १९९२ मध्ये परत भेट घेण्याची वेळ आम्ही ठरवली. सकाळी १०:५०  वाजता आम्ही तेथे पोहोचल्यावर, सैनिकांच्या राहण्यासाठी असलेल्या इमारतीच्या चौकीदाराने, सैनिक आमची वाट पाहात असल्याचे सांगितले. सेनाधिकाऱ्‍याने आम्हाला क्लबरुममध्ये नेले आणि पूर्वी ग्रंथालयासाठी आमच्याकडून साहित्य स्वीकारणाऱ्‍या स्त्रीला इमारतीत घोषणाफलक लावून आमच्या आगमनाची घोषणा करीत असल्याचे आम्ही पाहिले. आमच्या जगभरातील कार्याविषयी व आम्ही पवित्र शास्त्रावर भरवसा का ठेऊ शकतो यावर, तीन बांधवांनी लहान भाषणे दिली. त्यानंतर आम्ही श्रोत्यांच्या प्रश्‍नांना पवित्र शास्त्रातून उत्तरे दिली. त्या प्रश्‍नांपैकी काही असे होते, लष्करी सेवेबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे काय स्थान आहे, आणि त्यांच्यापैकी कोणी सैनिक आहेत का? यामुळे, आधी माझ्यासोबत असलेल्या, बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाला पूर्व जर्मनीच्या लष्करातील त्याची २५ वर्षाची सेवा, तसेच उरलेल्या वर्षातील वायुसेनेचा नायक, याचे वर्णन करण्यास सुसंधी मिळाली. तो, देव तसेच पवित्र शास्त्राविषयी कशाप्रकारे शिकला व आता एक यहोवाचा साक्षीदार होण्याची त्याची इच्छा आहे हे त्याने सांगितले. सैनिकांनी हे ऐकल्यामुळे त्यांना अतिशय आश्‍चर्य वाटले. आम्ही आणलेले सर्व साहित्य अवघ्या सात मिनिटातच सैनिकांच्या हातात पडले, तसेच अनेकांना पवित्र शास्त्र हवे होते. आम्ही पुस्तकाच्या दुकानातून रशियन भाषेतील सात पवित्र शास्त्र प्राप्त करु शकलो, व ते मिळाल्यामुळे त्यांनी गुणग्राहकता बाळगली. आध्यात्मिक भुकेले असणाऱ्‍या या लोकांना पवित्र शास्त्राची माहिती देणे खरेच आनंदाचे होते, व ते यावर कार्य करतील अशी आम्ही आशा करतो.”

खरेच, देव पक्षपाती नाही. कोणीही व कोठेही प्रामाणिक असले तरी, त्याच्या वचनाद्वारे तो त्यांना अपील करतो. तो त्यांना त्याच्याविषयी व त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताविषयी शिकण्याचे आमंत्रण देतो, आणि हेच जीवनातील सर्व प्रकारातील लोक करत आहेत.—योहान १७:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा