वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ६/१ पृ. १७-१९
  • गिलियड पदवीधर—“वास्तविक मिशनरी!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गिलियड पदवीधर—“वास्तविक मिशनरी!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • देव वचनाच्या विद्यार्थ्यांना पदवीदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • स्वेच्छेने लोक गिलियडला येतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाच्या ठायी आनंद व हर्ष करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ६/१ पृ. १७-१९

गिलियड पदवीधर—“वास्तविक मिशनरी!”

“मिशनरी म्हणजे काय?” हा प्रश्‍न सुमारे चार दशकांआधी एका वृत्तपत्राच्या अग्रलेखाने मांडला होता. वास्तविक मिशनरी, हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणेची साधने होती असा तर्क लेखकाने केला. परंतु मार्च ५, १९९५ रोजी, जर्सी सिटी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन सभागृहात, एका वेगळ्याच प्रकारचे उत्तर जोरदारपणे देण्यात आले. तो कोणता प्रसंग होता? वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ९८ व्या वर्गाचा पदवीदान समारंभ—मिशनऱ्‍यांना संपूर्ण जगभरात पाठवणारी एक प्रशाला!

सुरवातीचे गीत आणि प्रार्थना यानंतर, नियमन मंडळाचे बंधू अल्बर्ट श्रोडर यांनी उपस्थित असलेल्या सर्व ६,४३० जणांचे हार्दिक स्वागत केले. स्वतःला मिशनरी म्हणवून घेणाऱ्‍या इतरांपासून, गिलियड पदवीधर वेगळे का आहेत हे बंधू श्रोडर यांनी त्यांच्या प्रास्ताविक विवेचनांमध्ये स्पष्ट केले. ते म्हणाले: “बायबल, गिलियडचे मुख्य पाठ्यपुस्तक आहे.” गिलियडच्या पदवीधारकांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून नव्हे तर, देवाच्या वचनाचे शिक्षक म्हणून प्रशिक्षित केले जाते! यास्तव परदेशीय क्षेत्रांमधील लोकांच्या आध्यात्मिक गरजेची काळजी घेण्यासाठी ते अद्वितीयपणे पात्र आहेत.

इतर अनेक क्षेत्रांमध्ये गिलियड पदवीधारक “वास्तविक” मिशनरी असल्याचा पुरावा देतात त्याची चर्चा नंतरच्या वक्‍त्‌यांनी केली. चार्ल्स मॉलहन त्यांच्यासोबत, “मिशनरी या नात्याने उत्तम फळे उत्पन्‍न करीत राहा” या विषयावर बोलले. कलस्सैकर १:९, १० मधील पौलाच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करून बंधू मॉलहन यांनी पदवीधारकांना याची आठवण करून दिली, की गिलियड येथे गेल्या पाच महिन्यांसाठी राहिल्याने त्यांना ‘देवाच्या पूर्ण ज्ञानात’ वाढ करण्यासाठी मदत मिळाली होती. हे त्यांना, देवाच्या आत्म्याची फळे विकसित करण्याद्वारे व इतरांना बायबलचे सत्य सांगण्याद्वारे अशा दोन मार्गांनी ही फळे उत्पन्‍न करण्यास मदत करणार होते.

नियमन मंडळाचे डॅनियल सिडलिक यांनी त्यानंतर, “तुमच्या जीवनाचा सौदा करू नका” या विचारप्रवर्तक विषयाचे भाषण सादर केले. त्यांनी येशूच्या प्रश्‍नाचा उल्लेख केला: “मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?” (मत्तय १६:२६) बंधू सिडलिक यांनी निरीक्षिले: “माणसांनी सहज आणि सोपे जीवन जगण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे.” परंतु जिवंत विश्‍वास बाळगणारे परीक्षेला सामोरे जातात तेव्हा हातमिळवणी करू शकत नाहीत. येशूचे शब्द सूचित करतात, की एखाद्याने ‘देण्यासाठी’ म्हणजेच एखाद्याचा जीव किंवा जीवन मिळवण्याखातर त्याग करण्यास तयार असले पाहिजे. नव्या मिशनऱ्‍यांना, त्यांचे सर्वस्व यहोवाच्या सेवेमध्ये सर्वात उत्तम ते त्याला देण्यास आर्जवले!

त्यानंतर, सेवा विभाग समितीचे विल्यम वॅन डी वोल, “प्रेषित पौल—अनुकरणास पात्र उदाहरण” या विषयावर बोलले. बंधू वॅन डी वोल यांनी स्पष्टीकरण दिले: “पौलाने पहिल्या शतकात मिशनरी कार्यात पुढाकार घेतला.” उचितपणे मग, प्रेषित पौलाने आजच्या मिशनऱ्‍यांकरता ज्या चार क्षेत्रांमध्ये उत्तम उदाहरण मांडले ते ठळकपणे दाखवण्यात आले: (१) लोकांसाठी पौलाची खरी काळजी आणि प्रीती; (२) सेवेतील त्याचा परिणामकारकपणा; (३) स्वतःला उंचावून न दाखवण्याची नम्रता; (४) यहोवावरील त्याचा निःसंशयी भरवसा.

“तुमच्या नव्या नेमणूकीत यहोवास तुमची झडती घेऊ द्या” या विषयावर नियमन मंडळाचे लायमन ए. स्विंग्ल यांनी चर्चा केली. स्तोत्र १३९:१६ या दैनिक वचनाचा उपयोग करून बंधू स्विंग्ल यांनी कबूल केले, की नवे मिशनरी या नात्याने, त्यांना त्यांच्या नेमणूकांमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि यहोवाला त्यावरील उपाय माहीत आहेत. त्यांनी आर्जवले, “त्याच्या जवळ जा, तुम्हाला एखादी समस्या असल्यास त्याला ती सांगा. त्याची इच्छा काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

मग, नियमन मंडळाचे जॉन बार, “तुमचा विश्‍वास अतिशय वाढत आहे” या विषयावर बोलले. (२ थेस्सलनीकाकर १:३, प. र. भाषांतर) येशूने काय म्हटले ते आपण लूक १७:१ मध्ये असे वाचतो: “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे.” काही जण सहमिशनऱ्‍यांच्या व्यक्‍तिमत्त्वांमुळे अडखळले. परंतु बंधू बार यांनी, क्षमा करण्यासाठी मिशनऱ्‍यांकडे विश्‍वास हवा म्हणून त्यांना उत्तेजन दिले. होय, याच संदर्भात येशूच्या शिष्यांनी विनंती केली: “आमचा विश्‍वास वाढवा.” (लूक १७:२-५) विविध संघटनात्मक फेरफारांमुळे देखील मिशनऱ्‍यांच्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जाऊ शकते. बंधू बार यांनी विचारले: “हे फेरफार स्वीकारण्यास तुमच्याकडे विश्‍वास आहे का, की ते डोंगरासमान अडखळणे बनतील?”

त्यानंतर दोन गिलियड शिक्षकांनी काही सल्ला दिला. जॅक रेडफर्ड यांनी पदवीधारकांना सकारात्मक मनोवृत्ती कायम ठेवण्यास आर्जवले. त्यांनी एका मिशनरी बहिणीबद्दल सांगितले जिने, काही सहमिशनऱ्‍यांनी तिला चिडवल्यामुळे तिची नेमणूक सोडून दिली. परंतु, शास्त्रवचने आपल्याला विनाकारण रागवण्याविरुद्ध इशारा देतात. (उपदेशक ७:९) “योग्य मनोवृत्ती ठेवा आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून झालेल्या चुका किंवा त्यांच्या अपरिपूर्णतेला क्षमा करा” असे त्यांनी विनवले.

गिलियडचे सचिव, यु. वी. ग्लास यांनी मग असे विचारले: “तुम्ही ‘काळ आणि आकस्मिक घटनेला’ तोंड देण्यास तयार आहात का?” (उपदेशक ९:११, NW) “आपली जीवनपद्धत नेहमीच बदलते आणि काही बदल तर अतिशय दुःखद असू शकतात,” असे बंधू ग्लास यांनी टिपण केले. काही मिशनऱ्‍यांना अनपेक्षितपणे, अशक्‍तपणा, आजारपण व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागले आणि यामुळे काहींना त्यांची नेमणूक सोडून द्यावी लागली. बंधू ग्लास म्हणाले: “कोणतीही आकस्मिक घटना असो, आपल्याला माहीत आहे की यहोवा त्याविषयी जागृत आहे आणि त्याला आपली काळजी आहे. आपण आपला भार पूर्णपणे त्याच्यावर टाकला तर आपण विजयी होऊ ही खात्री आपल्याला आहे!”

“मिशनरी सेवेसाठी राखलेले” असे शीर्षक असलेल्या एका भाषणाने सकाळच्या भाषणांच्या मालिकेची समाप्ती केली. नियमन मंडळाच्या थिअडोर जेरेस यांनी, “मिशनरी म्हणजे काय?” हा लेखाच्या सुरवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचा उल्लेख करून आपले भाषण सादर केले. या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी प्रेषितांच्या कृत्यांतील १३ आणि १४ अध्यायाची चर्चा केली ज्यामध्ये पौल आणि बर्णबा यांच्या मिशनरी कार्याची माहिती दिली आहे. स्पष्टतः, ते कार्य सामाजिक दुखणे बरे करण्यावर नव्हे तर ‘सुवार्ता सांगण्यावर’ केंद्रिभूत होते. (प्रेषितांची कृत्ये १३:३२) बंधू जेरेस यांनी विचारले: “एक वास्तविक मिशनरी कसा असला पाहिजे ते पौल आणि बर्णबाने प्रदर्शित केले याजशी तुम्ही सहमत नाही का?” त्यानंतर, मेक्सिकोचे अनुभवी मिशनरी रॉबर्ट ट्रेसी यांना सुवार्तिक या नात्याने त्यांचे काही हृदयाला उब देणारे अनुभव सांगण्यासाठी बोलवण्यात आले.

बंधू श्रोडर यांनी ४८ पदवीधारकांना पदवीदान दिल्यानंतर सकाळचा कार्यक्रम कळसाच पोहंचला. मिशनऱ्‍यांना ज्या २१ राष्ट्रांमध्ये नेमण्यात आले त्या राष्ट्रांची नावे ऐकून श्रोत्यांना अत्यानंद झाला. ती नावे पुढील प्रमाणे आहेत: इक्वादोर, इक्वेटोरियल गिनी, एस्टोनिया, कोस्टा रिका, कोट डी आयव्हरी, गिनी-बिसू, तायवान, निकाराग्वा, पराग्वे, पेरू, बार्बाडोस, बेनिन, बोलिव्हिया, मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक, मोझांबिक, मॉरिशस, लॅटविया, लीवर्ड बेटे, व्हेनेझुएला, सेनेगल आणि होंडुराज.

जेवणाच्या सुटीनंतर, श्रोतेजण पुन्हा एकत्र आले आणि सेवा विभागाचे बंधू रॉबर्ट पी. जॉनसन यांनी चालवलेल्या टेहळणी बुरूज याच्या उत्साहपूर्वक अभ्यासाचा त्यांनी आनंद लुटला. ९८ व्या वर्गातील सदस्यांनी प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्यानंतर, गिलियड मंडळाच्या सदस्यांनी चालवलेली हर्षदायक मुलाखतींची श्रृंखला होती. या पदवीधारकांनी त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव सांगितले व त्यांच्या परदेशांतील नेमणूकांबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्‍त केल्या तेव्हा श्रोतेजनांना पुष्कळ उत्तेजन मिळाले.

साडेसहा वर्षांपर्यंत गिलियड, वॉलकील न्यूयॉर्क येथील वॉचटावर संस्थेच्या सुविधांमध्येच होते. परंतु, एप्रिल १९९५ मध्ये ही प्रशाला पॅटरसन न्यूयॉर्क येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्र या नव्या ठिकाणी हलविण्यात आली. वॉलकील येथील बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना हा बदल कसा वाटतो? या पदवीदान समारंभात वॉलकीलमधील पुष्कळांची मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या स्पर्शयुक्‍त अभिव्यक्‍तींवरून हेच स्पष्ट झाले, की गिलियड विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर कायमस्वरूपी प्रभाव पाडला आहे. स्पष्टतः, हे इच्छुक पुरुष आणि महिला—नम्र, आत्मत्यागी, इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा असलेले वास्तविक मिशनरी आहेत.

हा पदवीदान समारंभ समाप्त झाल्यावर, गिलियड प्रशाला गेल्या ५० वर्षांपासून जे करत आली आहे ते असेच यशस्वीपणे करत राहील—वास्तविक मिशनरी तयार करील ही खात्री सर्वांना होती!

[१८ पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी:

प्रतिनिधीत्व करणारी राष्ट्रे: ८

नेमून दिलेल्या राष्ट्रांची संख्या: २१

विद्यार्थ्यांची संख्या: ४८

सरासरी वय: ३२.७२

सत्यातील सरासरी वर्षे: १५.४८

पूर्ण वेळेच्या सेवेतील सरासरी वर्षे: १०.९१

[१८ पानांवरील चित्रं]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा ९८ वा वर्ग

खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक देण्यात आले आहेत आणि प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे नावांची यादी दिली आहे.

(१) एसलिंगर, ए.; मॅन, टी.; रिवेरा, जी.; बॉरविरो, एम.; वाझ, एम.; दुर्गा, के.; सिल्वेरक्स एच.; अल्वरॅडो, डी. (२) टॉथ, बी.; सेगॉरॉ, एस.; हार्ट, आर.; रोरॉक, आय.; एस्कोबॉर, पी.; आईस्ट्रप, जे.; स्लाय, एल.; रिवेरा, ई. (३) ऑर्कड, डी.; स्नेथ, एस.; मारसियल, पी.; कोल्यनन, डी.; वॉडल, एस.; ब्लॅकबर्न, एल.; एस्कोबॉर, एम.; ऑर्कड, के. (४) हार्ट, एम.; टॉथ, एस.; कोल्यनन, जे.; बेरीमन, एच.; मॅन, डी.; ब्लॅकबर्न, जे.; पार्क, डी.; वाझ, एफ. (5) सेगॉरॉ, एस.; स्लाय, एल.; लेस्ली, एल.; बेरीमन, बी.; बॉरविरो, डब्ल्यू.; अल्वरॅडो, जे.; लेस्ली, डी.; पार्क, डी. (६) सिल्वेरक्स, के.; एसलिंगर, आर.; वॅडल, जे.; स्नेथ, के.; दुर्गा, ए.; रोरॉक, एफ.; आईस्ट्रप, सी.; मारसियल, डी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा