सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
“न्याय—न्यायाची कास धर, म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव यहोवा तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.”—अनुवाद १६:२०.
१. देवाच्या मानवासाठी मूळ उद्देश कोणता होता, व तो कसा पूर्ण होणार होता?
ही पथ्वी परिपूर्ण प्राणीमात्रांनी भरून जावी हा पुरुष व स्त्री घडण्यामागील यहोवा देवाचा उद्देश होता. ते सर्वजण त्याची स्तुती करणार होते व या पृथ्वीला सत्तेखाली आणण्यासाठी आपला कार्यभाग पूर्ण करणार होते. (उत्पत्ती १:२६-२८) मानवाची निर्मिती देवाशी सदृश्य व त्याच्या प्रतिमेप्रमाणे झालेली असल्यामुळे त्याला सूज्ञान, न्याय, प्रीती व सामर्थ्य हे गुण प्राप्त झाले. या सर्व गुणांचे समतोलपणे आचरण राखल्यामुळे मानवाला आपल्या निर्मात्याच्या, त्याच्यासाठी असणारा उद्देश पुरा करता येऊ शकत होता.
२. इस्राएल लोकांनी न्यायाची कास धरणे हे केवढे महत्त्वाचे होते?
२ मागील अंकात आपण परिक्षिले, त्यानुसार हे पाहिले की, देवाच्या हाताळणीविरुद्ध मानवाने बंड केले व त्यामुळे त्याला मरणाची शिक्षा मिळाली. आता तो अपूर्ण बनल्यामुळे त्याला देवाने मानवजातीविषयी राखलेला मूळ उद्देश पुरा करता येत नव्हता. या अपयशात, परिपूर्ण न्यायाचे प्रदर्शन करण्याची त्याची अक्षमता प्रकर्षाने दिसून आली. तेव्हा, मोशाने इस्राएल लोकांना, “न्याय—न्यायाची कास धर,” असे जे स्मरण दिले ते तितके आश्चर्याचे नव्हते. त्यांनी न्यायाचा अवलंब करण्यावर वचनयुक्त देशाची ताबा मिळविण्याची क्षमता तसेच त्यांचे जीवन अवलंबून होते.—अनुवाद १६:२०.
चांगल्या भावी गोष्टींची पडछाया
३. यहोवाने इस्रएलांसोबत जे दळणवळण राखले होते त्याचे परिक्षण करणे आज आम्हासाठी का महत्त्वपूर्ण आहे?
३ यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत राखलेले दळणवळण आमचा आत्मविश्वास वाढविते की, तो आपला निवडलेला सेवक येशू ख्रिस्त याजमार्फत सर्व राष्ट्रांना न्याय प्रदान करणार. या गोष्टीचे विवेचन प्रषित पौल असे करतो: “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले आहेत सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरता लिहिले, यासाठी की, शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोमकर १५:४) देवाला “नीती व न्याय ही प्रिय आहेत,” त्यामुळे त्याने इस्राएलांच्या बाबतीत हे अपेक्षिले की, त्यांनीही एकमेकांसोबतच्या आपल्या दळणवळणात त्याचे अनुकरण करावे. (स्तोत्रसंहिता ३३:५) हे देवाने इस्राएलांना जे ६०० नियम दिले होते त्यापैकीच्या काहींचे परिक्षण केल्यास स्पष्ट होऊ शकेल.
४. मुलकी हक्काविषयीच्या समस्या मोशाच्या नियमशास्त्राखाली कशा हाताळल्या जात होत्या?
४ इस्राएलात मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केले गेले त्यावेळी त्यांच्यामध्ये मुलकी हक्काविषयीच्या समस्या नव्हत्या. कोणी यहुद्देत्तर त्या देशात रहावयास आला तर त्याविषयी लेवीय १९:३४ म्हणते: “तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा आणि त्याजवर आपल्यासारखीच प्रीती करा.” केवढी ही न्याय्य व प्रेमळ व्यवस्था! याचप्रमाणे न्यायधिशांना व साक्षीदारांना हे बजावून सांगण्यात आले होते: “बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय व्हावयासाठी साक्षी देऊ नको. गरीबाचा दावा असला तर त्याचा पक्ष घेऊ नको.” (निर्गम २३:२, ३) जरा विचार करा—न्याय हा गरीब व श्रीमंताना सारखेपणानेच लागू केला जात होता!
५. आजच्या काळातील गुन्हेगारीच्या नियमांची मोशेच्या काळातील नियमशास्त्रात देण्यात आलेल्या नियमांशी तुलना करून दाखवा.
५ आज राष्ट्रांमध्ये जी गुन्हाविषयक कायदा-पुस्तके उपलब्ध आहेत त्यातील कायद्यांपेक्षा श्रेष्ठ प्रतींचा कायदा मोशेच्या नियमशास्त्रात होता. उदाहरणार्थ, चोराला कैदेत टाकण्यात येत नव्हते, कारण त्यामुळे कायदापालन करणाऱ्या कष्टाळू माणसांवर कराचा अधिक बोजा पडणार होता. उलटपक्षी, या चोराला काम करावे लागे व जे चोरले त्याच्या दुपटीने किंवा अधिक त्याला परत द्यावे लागे. यामुळे ज्याचे नुकसान झाले आहे त्याला काहीच नुकसान होत नव्हते. पण समजा, या चोराने काम करून मोबदला परत करण्याचे नाकारले तर काय? अशावेळी, त्याला गुलाम म्हणून विकले जाई व तो भरपाई करीपर्यंत गुलाम म्हणूनच राही. या खेपेलाही जर त्याने उद्दामपणाप्रदर्शित केला तर त्याला जिवे मारण्यात येत असे. अशाप्रकारे नुकसान झालेल्या माणसाला न्याय मिळत होता व यामुळे चोरी करण्याच्या इच्छेला जबर प्रतिबंध बसत होते. (निर्गम २२:१, ३, ४, ७; अनुवाद १७:१२) याचप्रमाणे जीवन हे देवाच्या दृष्टीने पवित्र होते म्हणून खून करणाऱ्यास ठार मारले जाई. यामुळे त्या राष्ट्रात दुष्ट व घातकी माणसाला थारा राहिला नाही. तरीपण, कोणाच्या हातून अजाणपणे हत्या घडली गेली तर त्याला दया दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.—गणना ३५:९-१५, २२-२९, ३३.
६. इस्राएलाच्या नियमांचे परिक्षण आपल्याला कोणत्या निर्णयाप्रत पोहंचविते?
६ यास्तव, देवाने इस्राएल राष्ट्राशी राखलेल्या सर्व न्यायालयीन दळणवळणात न्याय दिसून येत होता हे कोण नाकारू शकेल बरे? हाच देव जेव्हा यशया ४२:१ मध्ये देण्यात आलेले त्याचे अभिवचन येशू ख्रिस्तामार्फत कार्यवाहित करीत असल्याचे आपल्याला बघायला मिळेल तेव्हा आमच्या मनास केवढे समाधान, केवढी आशा मिळेल बरे! ते अभिवचन असे आहे: “तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करून देईल.”
दयेशी समतोल असणारा न्याय
७. यहोवाने इस्राएलांशी जे दयाळू व्यवहार राखले त्याचे वर्णन करा.
७ देवाचा न्याय त्याच्या दयेशी समतोल आहे. हे इस्राएली लोक जेव्हा देवाशी बंड करू लागले तेव्हा स्पष्टपणे दिसले. ते अरण्यात ४० वर्षे असता यहोवाने दयाळूपणे जी त्यांची काळजी वाहिली, त्याविषयी मोशाने केलेले वर्णन ऐका: “तो त्यांस अरण्यात शून्य व घोर अशा मरुभूमीत आढळला. त्याने त्याच्या आसपास राहून त्याची निगा केली. डोळ्यांच्या बाहूलीप्रमाणे त्याचे रक्षण केले. गरुड पक्षीण आपले कोटे हलविते, आपल्या पिलांवर तळपत असते, त्याप्रमाणे त्याने आपले पंख पसरून त्यास घेतले, आपल्या परांवर वाहिले.” (अनुवाद ३२:१०-१२) नंतर, ते राष्ट्र धर्मत्यागी बनले तेव्हा यहोवाने त्यांना विनविले: “आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा.”—जखर्या १:४अ.
८, ९. (अ) देवाने यहुद्यांना कितपत आपला न्याययुक्त दयाळूपणा दाखविला? (ब) त्यांच्यावर कोणती शेवटली आपत्ती आली, पण देवाने त्यांच्याशी राखलेल्या दळणवळणाविषयी काय म्हणता येऊ शकेल?
८ यहोवाने दाखविलेल्या दयाळू वृत्तीची तमा बाळगली गेली नाही. आपल्या जखर्या संदेष्ट्यामार्फत देव म्हणाला: “त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही.” (जखर्या १:४ब) तेव्हा देवाच्या दयाळू न्यायाने त्याला आपला एकुलता एक पुत्र पाठविण्यास व त्याच्याद्वारे त्यांना त्याच्याकडे परतण्याची मदत देण्याची आयोजना करण्याचे प्रवृत्त केले. देवाच्या या पुत्राची ओळख बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने अशी केली: “हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान १:२९) येशूने कित्येक वर्षे अविश्रांतपणे यहुद्यांना देवाच्या न्याय्य मार्गाचे शिक्षण दिले व त्यांच्यामध्ये अगणित चमत्कार केले व त्याद्वारे तो भाकित करण्यात आलेला मुक्तिदाता आहे असे सिद्ध करून दिले. (लूक २४:२७; योहान ५:३६) पण लोकांनी त्याचेही ऐकले नाही व विश्वास ठेवला नाही. या कारणास्तव येशूने कळवळून असे म्हटले: “यरुशलेमा; संदेष्टांचा घात करणाऱ्या व तुजकडे पाठविलेल्यांवर दगडमार करणाऱ्या. जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते त्याप्रकारे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीतरी माझी इच्छा होती, पण तुमची नव्हती. पाहा, तुमचे घर तुम्हालाच ओसाड सोडले आहे!”—मत्तय २३:३७, ३८.
९ देवाने या लोकांवरील आपला प्रतिकूल न्यायदंड पुढील ३७ वर्षे, इ.स. ७० पर्यंत रोखून धरला. मग त्याने रोमी लोकांना यरुशलेमाचा नाश करण्याची व हजारो यहुद्यांना बंदिवान म्हणून नेण्याची मुभा दिली. जेव्हा आपण, यहोवाने कित्येक शतके सहनशीलता व धीर व्यक्त केला हे बघतो तेव्हा इस्राएल घराण्यासोबत केलेल्या दळणवळणात देवाचा न्याय दिसून येतो हे कोण अमान्य करील?
सर्व राष्ट्रांसाठी न्याय
१०. देवाचा न्याय सर्व राष्ट्रांप्रत कसा पोहंचला?
१० इस्राएलाने येशूचा धिक्कार केल्यानंतर, याकोब म्हणाला: “विदेशी लोकातून आपल्या नामाकरता लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट . . . घेतली.” (प्रे. कृत्ये १५:१४) या “लोका”त थोडे यहुदी होते, ज्यांनी येशूचा स्वीकार केला; पण त्या सर्वांचा मिळून, सामूहिकपणे, “देवाचा [आध्यात्मिक] इस्राएल” तयार होतो. तो १,४४,००० चा गट आत्म्याने जन्मलेल्या ख्रिस्त येशूच्या अनुयायांचा बनलेला आहे. (गलतीर ६:१६; प्रकटीकरण ७:१-८; १४:१-५) यामध्ये विश्वास धरणारा पहिला बेसुंती विदेशी कर्नेल्य हा होता. कर्नेल्य व त्याच्या घरातील सदस्यांनी देवाकडील तारणाच्या मार्गाचा स्वीकार केला तेव्हा पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते. तर सर्व राष्ट्रांपैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये धर्मशील आहेत, तो त्याला मान्य आहे.”(प्रे. कृत्ये १०:३५) पौल देखील देवाच्या निपक्षपातीपणाविषयी अधिक पुष्टी देऊन असे म्हणतो: “तुम्हांमध्ये यहुदी व हेल्लेणी, दास व स्वतंत्र पुरुष व स्त्री हा भेद नाही. कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहा. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहा, तर अब्राहामाचे संतान आणि वचनद्वारा वारीस आहा.”—गलतीकर ३:२८, २९.
११. अब्राहामाला कोणते अभिवचन देण्यात आले, व त्याची कशी पूर्णता होणार आहे?
११ येथे आपल्याला, यहोवाने अब्राहामाला जे आश्चर्यकारक अभिवचन दिले होते त्याचे स्मरण घडते. या कुलपित्याने आपला प्रिय पुत्र इसहाक याचे स्वेच्छेने अर्पण करण्याची जी तयारी दाखलली, तिजसंबंधाने बोलताना देव त्याला म्हणला: “तू हे कृत्य केले, आपल्या पुत्राला, आपल्या एकुलत्या पुत्राला मला अर्पिण्यास तू मागेपुढे पाहिले नाहीस, यास्तव मी तुझे कल्याण करीनच करीन . . . पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे अभीष्ट पावतील.” (उत्पत्ती २२:१६-१८) या अभिवचनाची पूर्णता कशी होणार? “अब्राहामाचे संतान” हे येशू ख्रिस्त व मरणापर्यंत विश्वासू राहिलेल्या १,४४,००० अभिषिक्त अनुयायांचे मिळून बनलेले आहे व ते मानवजातीवर एक हजार वर्षांसाठी स्वर्गातून राज्य करणार आहे. (प्रकटीकरण २:१०, २६; २०:६) त्या आशीर्वादित काळाविषयी यहोवा अशी हमी देतो: “त्याच्या राजवंशीय सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” ते का? कारण मशीही राज्याची ती “राजवंशीय सत्ता” ही “सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ स्थिर” राहणार आहे.—यशया ९:७.
१२. अब्राहामाच्या कराराचे आशीर्वाद आज केवढ्या प्रमाणात आधीच उपभोगले जात आहेत?
१२ पण त्या अब्राहामी कराराचा आशीर्वाद उपभोगण्यासाठी येशू ख्रिस्ताची हजार वर्षीय राज्याची कारकीर्द येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. ते आशीर्वाद सध्या “सर्व राष्ट्रे, वंश, भाषा व लोक” याच्या “एक मोठा लोकसमुदाय” याला अनुभवास येत आहेत. यांनी लाक्षणिकरित्या “आपले झगे कोकऱ्याच्या [येशू ख्रिस्त] रक्तात धुऊन शुभ्र केले” असल्यामुळे त्यांना यहोवासमोर नीतीमान भूमिका मिळाली आहे. अब्राहामाप्रमाणेच तेही यहोवाचे मित्र बनले आहेत! होय, सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांचे तारण साध्य करण्याच्या यहोवाच्या मार्गात न्याय खराच दिसून येतो.—प्रकटीकरण ७:९, १४.
तुम्ही देवाच्या न्याय्य मार्गास प्रतिसाद देत आहात का?
१३, १४. (अ) आम्ही आमच्या अंतःकरणाचे कोणते व्यक्तीगत परिक्षण करण्यास हवे? (ब) आपल्याला यहोवाला आपली कृतज्ञता कशी प्रदर्शित करता येईल?
१३ देवाने आपला एकुलता एक पुत्र खंडणी म्हणून तुम्हासाठी देताना जो न्याय व जी प्रीती दाखविली आहे ते पाहून तुमचे अंतःकरण उचंबळून येते का? यहोवाने अब्राहामाला आपला अत्यंत प्रिय पुत्र यज्ञ म्हणून अर्पिण्याचे सांगितले तेव्हा अब्राहामाला कसे वाटले असावे त्याचा जरा विचार करा! पण देवाच्या भावना यापेक्षाही खोलवर जातात. त्याचा पुत्र जेव्हा वधस्तंभावर असता त्याला जो त्रास होत होता, जवळ येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जी तुच्छतेची व निंदात्मक बोलणी ऐकावी लागत होती ते बघून देवाला कसे वाटले असावे हे विचारात घ्या. जेव्हा येशू ओरडला: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा का त्याग केलास?” तेव्हा यहोवाची प्रतिक्रिया कशी झाली असावी? (मत्तय २७:३९, ४६) तरीपण न्यायाची ही मागणी होती की, यहोवा देवाने आपल्या या पुत्राला अशाप्रकारचे मरण लाभू द्यावे की, ज्याकरवी देवाच्या नीतीमत्तेची सार्थकता उंचावून धरण्यामध्ये त्याला आपल्या सचोटीचे प्रदर्शन करता येईल. याखेरीज, आपल्या पुत्रावर मरण येऊ दिल्यामुळे यहोवाला आमच्यासाठी तारणाचा मार्ग उघडता आला.
१४ यामुळेच, आपण यहोवा व त्याच्या पुत्राची कृतज्ञता व्यक्त केली पाहीजे व हे जाहीरपणे कबूल करावे: “आमच्या देवाचा व कोकऱ्याचा तारणाबद्दल महिमा होवो.” (प्रकटीकरण ७:१०) अशाप्रकारे सरळपणे आपला प्रतिसाद व्यक्त केल्यामुळे “यहोवाचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत” या मोशाने लिहिलेल्या शब्दांवर आपला विश्वास आहे हे आपण दाखवितो. (अनुवाद ३२:४) या कबूलीद्वारे तसेच देवाने मानवाच्या तारणासाठी सिद्ध केलेल्या न्यायी मार्गाची जोपासना करीत राहिल्यामुळे यहोवा देव व त्याचा पुत्र यांची अंतःकरणे किती आनंदीत होत असतील!
१५. येशूने निकदेमास केलेले कोणते बोलणे आम्हाला अभूतपूर्व वाटते?
१५ आमच्या समविश्वासू बांधवांनी मागे १८७०री च्या काळात खंडणी यज्ञार्पणाविषयी खंबीर भूमिका घेतली होती याची आपल्याला धन्यता वाटत नाही का? आज आम्ही, मानवाच्या तारणाच्या बाबतीत देवाचे न्याय्य व प्रेमळ मार्ग उंचावून धरणाऱ्या संस्थेसोबत निगडीत आहोत याचा आम्हाला आनंद वाटत नाही का? जर होय, तर येशूने निकदेम याला जे म्हटले होते त्याकडे आपले खास लक्ष दिले पाहिजे. तो म्हणाला: “देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले, जो त्याजवर विश्वास ठेवतो त्याजवर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही . . . जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या सहमतात आहेत अशी ती उघड व्हावी.” देवाकडील प्रतिकूल न्याय चुकविण्यासाठी आम्ही, आमचा विश्वास त्याच्या पुत्रावर आहे हे “आपली कर्मे देवाच्या सहमतात आहेत” असे सिद्ध करून दाखविण्यास हवे.—योहान ३:१७, १८, २१.
१६. येशूच्या शिष्यांना स्वर्गीय पित्याचे गौरव कसे करता येईल?
१६ येशूने म्हटले: “तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:८, १०) तर या आज्ञा काही कोणत्या आहेत? यापैकीची एक योहान १३:३४, ३५ मध्ये आहे जेथे येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होते: “मी तुम्हीस नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी . . . तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” प्रीतीचे हे फळ आज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दृश्यपणे दिसत आहे. येशूने आणखी ही आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्वकाही मी तुम्हास शिकवले ते त्यांना पाळावयास सांगा.” (मत्तय २८:१९,२०) तुम्ही स्वतः ‘देवाच्या सहमतात असणारी ही कामे’ करीत आहात का?
१७. प्रचार करण्याचे व शिक्षण देण्याचे काम हे यहोवाच्या न्यायी मार्गाचा पुरावा आहे हे कोणत्या परिणामाकरवी कळते?
१७ हे प्रचाराचे व शिक्षण देण्याचे काम येशूच्या अनुयायांना करू देण्यातील यहोवाच्या न्याय्य मार्गाचे प्रदर्शन, यहोवाच्या साक्षीदारांनी एकाच वर्षांत जे काम पूर्ण केले त्यामध्ये दिसून येते. गेल्या १९८९ च्या वर्षात २,६३,८५५ नव्या शिष्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला! यामुळे तुमचे अंतःकरण आनंदित होत नाही का?
न्यायी देव त्वेरेने हालचाल करील
१८. यहोवाच्या लोकांवर जो छळ गुदरत आहे त्याच्या दृष्टीकोणातून कोणते प्रश्न सामोरे येतात?
१८ साक्षीकार्याचे हे काम बिनविरोधाने होत नाही. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेच होते: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) या विधानाची सत्यता यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक काळच्या इतिहासाने सिद्ध होते. साक्षीदार एकामागून दुसऱ्या देशात बंदी, तरुंगवास, मारहाण व शिवाय पीडा यांचा अनुभव घेत आहेत. यामुळे हबक्कुकचे भविष्यवादित शब्द आपल्या लक्षात चटकन् येतात: “कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही.” यामुळे कधीकधी यहोवाच्या लोकांनाही असे विचारावेसे वाटत असते: ‘हे यहोवा, या बेईमानी करणाऱ्यांकडे तू का पहात असतो? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतो?’—हबक्कुक १:४, १३.
१९. याविषयी देवाचा दृष्टीकोण कसा आहे हे आपल्याला समजावे म्हणून येशूने कोणता दाखला दिला?
१९ या प्रश्नांची उत्तरे मिळण्यात मदत व्हावी तसेच याविषयीचा देवाचा दृष्टीकोण काय आहे ते समजावे यासाठी येशूने एक दाखला सांगितला. लूक १७:२२-३७ मध्ये त्याने अशा हिंसक परिस्थितीचे वर्णन दिले जी आजच्या व्यवस्थीकरणाच्या अंताशी सदृश्य आहे. त्याने म्हटले की ही परिस्थिती नोहाच्या काळात घडलेल्या जलप्रलयाआधी तसेच लोटच्या काळी सदोम व गमोरा या शहरांचा नाश होण्याआधी तेथे जी परिस्थिती होती त्याच्यासारखी असेल. मग, लूक १८:१-५ मध्ये वर्णिण्यात आले त्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांकडे वळून, “त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यांस एक दाखला सांगितला.” येथे येशूने एका गरजवंत विधवेची व ती पुरी करणाऱ्या ‘एका न्यायधीशा’विषयी माहिती सांगितली. ही विधवा त्याच्याकडे सारखे येऊन असे म्हणे: “माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा.” ती वारंवार त्याच्याकडे येत राहिल्यामुळे त्या न्यायाधीशाने ‘तिला न्याय मिळवून दिला.’
२०. येशूच्या दाखल्यामध्ये आम्हासाठी कोणता धडा आहे?
२० आज आम्हासाठी येथे कोणता धडा आहे? “अन्यायी न्यायधीश काय म्हणतो ते ऐका” असे त्या अनीतीमान न्यायधिशाचे उदाहरण सांगून येशूने यहोवाविषयी सांगितले: “तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांजविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील.”—लूक १८:६-८अ.
२१. आमच्या व्यक्तीगत समस्यांविषयी आपण कोणता दृष्टीकोण धरावा व त्या कशा हाताळाव्या?
२१ आमच्या व्यक्तीगत समस्यांसंबंधाने आम्ही देवाला जी विनवणी करतो, तिजविषयी, देव नाखुष आहे म्हणून तिचे उत्तर मिळण्यास विलंब लागत आहे असे नाही हे लक्षात असू द्या. (२ पेत्र ३:९) त्या विधवेप्रमाणे आपल्याला काही छळ किंवा अन्यायाचा त्रास होत आहे तर हा अन्याय ओघाओघाने दूर होईल याकडे देवाचे लक्ष आहे हा आत्मविश्वास आपण बाळगू शकतो. असा हा विश्वास आपल्याला कसा दाखवता येईल? निरंतर प्रार्थना करून आणि या प्रार्थनांना आमच्या विश्वासू मार्गाक्रमणाची साथ देऊन. (मत्तय १०:२२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) आपल्या विश्वासूपणामुळे आपण हे सिद्ध करू शकू की, जगात विश्वास आहे, न्यायावर खरी प्रीती करणारे आहेत व आम्ही त्यापैकीचे एक आहोत.—लूक १८:८ब.
“राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेसोबत जयजयकार करा”
२२. मोशाने आपल्या विजयोत्सवाच्या गायनाचा शेवट कसा केला?
२२ बऱ्याच शतकांआधी मोशेने एक विजयोत्सवाचे गायन केले होते. त्याचा शेवट त्याने या पद्धतीने केला: “राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेसोबत जयजयकार करा. कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल. तो आपल्या वैऱ्यांचा सूड घेईल. तो आपला देश व आपली प्रजा यांच्या पातकांचे क्षालन करील.” (अनुवाद ३२:४३) यहोवाचा सूड घेण्याचा दिवस अधिक जवळ येत आहे. पण तो अद्याप न्यायासोबत सहनशीलता बाळगीत आहे याची आपल्याला किती कृतज्ञता वाटली पाहीजे!
२३. देवाच्या लोकांच्या आनंदात सहभागी होणाऱ्यांसाठी कोणता आनंदमय परिणाम वाट पाहून आहे?
२३ सर्व राष्ट्रातील लोकांनी “पश्चात्ताप करावा” म्हणून अद्याप वेळ आहे, पण तो वाया जाऊ देऊ नये. पेत्राने इशारा दिला की, “यहोवाचा दिवस चोरासारखा येईल.” (२ पेत्र ३:९, १०) देवाचा न्याय या दुष्ट व्यवस्थीकरणाचा लवकर नाश व्हावा ही मागणी करीत आहे. ते नष्ट होईल तेव्हा आपण त्या लोकांच्या समूहात असलेले आढळावे, ज्यांनी या आनंदी आव्हानाला प्रतिसाद दिलेला असेल: “राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेसोबत आनंद करा.” होय, आपण त्या लोकांमध्ये राहू शकू ज्यांनी देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो हे बघितले असेल!
तुमचे उत्तर काय असेल?
◻ मोशाच्या नियमशास्त्राने देवाच्या न्यायाविषयी आमचा विश्वास का अधिक दृढ केला पाहिजे?
◻ देवाच्या न्यायी मार्गास प्रतिसाद देण्यास कशाने आम्हाला प्रवृत्त केले पाहिजे?
◻ यहोवाचे गौरव कसे करता येईल?
◻ आज केवळ कोठे खरा आनंद मिळू शकेल?
[११ पानांवरील चित्रं]
“देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते. तर सर्व राष्ट्रांपैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये धर्मशील आहेत, तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३५
[१४ पानांवरील चित्रं]
देवाचे निवडलेले त्याचा जो धावा करतात त्याविषयी तो त्यांचा न्याय करील