वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ११/१ पृ. १६-१७
  • तुम्हाला माहीत नसणारे यार्देन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत नसणारे यार्देन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • हूला हवाईचे नृत्य
    सावध राहा!—१९९६
  • जॉर्डन नदी ओलांडणं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • क७-ख येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याची सुरुवात
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ११/१ पृ. १६-१७

वचनयुक्‍त देशाचे देखावे

तुम्हाला माहीत नसणारे यार्देन

यार्देन नदीचा उल्लेख करताच तुमच्या मनात ही परिचित दृश्‍ये उभे राहतील: यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएल यरीहोजवळ या नदीचे कोरडे पात्र ओलांडतात; नामान आपले कोड बरे होण्यासाठी येथे सात वेळा स्नान करतो; येथेच पुष्कळ यहुदी व नंतर येशू योहानाद्वारे बाप्तिस्मा घेण्यासाठी येतो.—यहोशवा ३:५-१७; २ राजे ५:१०-१४; मत्तय ३:३-५, १३.

या सर्व प्रसिद्ध घटना यार्देनच्या लांब व चांगल्या परिचित असणाऱ्‍या भागात म्हणजे गालील समुद्राचा दक्षिण भाग ते मृत समुद्रापर्यंत घडल्या. परंतु, देववचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्‍यांचे कदाचित, नदीचा उत्तरेकडील भाग व त्यासभोवतांलचा प्रदेश या यार्देनेच्या आणखी एका भागाकडे लक्ष गेले नसेल. नकाशा पहा.a मध्यभागी असलेला खालील भाग हा भेग पडलेल्या मोठ्या दरीचा एक भाग आहे व तो भूगर्भीय दोष अरामापासून ते आफ्रिकेपर्यंत जातो.

यार्देन नदीचे तीन प्रमुख उगम आहेत. ते ओढे हर्मोन पर्वतावरून विरघळणाऱ्‍या बर्फाद्वारे तयार होऊन खाली येतात. पूर्वेकडील ओढा (येथे दाखविलेला) हा पर्वताच्या पायथ्याला असणाऱ्‍या चुनखडीच्या सुळक्यातून येतो. येथेच फिलिप्पै येथील कैसरिया वसलेले होते; हे आठवा की, येशूचे एका “उंच डोंगरावर” रूपांतराचा दृष्टांत घडण्याआधी त्याने येथे भेट दिली होती. (मत्तय १६:१३–१७:२) दुसऱ्‍या ओढ्याचा उगम, दानचे शहर जेथे वसले होते त्या टेकडीपासून होते; येथे इस्राएलाच्या उत्तरेकडील राज्याने एक सोन्याचे वासरू उभारले होतो. (शास्ते १८:२७-३१; १ राजे १२:२५-३०) तिसऱ्‍या ओढ्याचे पाणी ह्‍या दोन ओढ्यांना येऊन मिळते व येथेच यार्दैन नदीचा उगम होतो. ही नदी ७ मैलाच्या प्रवासात एक हजार फूट खाली कोसळते.

नंतर ही दरी हुला या कुंडात सपाट होते, त्यामुळे यार्देनेचे पाणी पसरते व एकरुंद दलदलीचे क्षेत्र तयार होते. प्राचीन काळी उथळ जागेत जे पाणी एकत्र होत असे त्याला हुला (किंवा हुले) तलाव म्हणत. पण आज हा हुला तलाव नाही, कारण अलिकडच्या काळात यार्देनचा वरील भाग सरळ करण्यात आला; कालवे जोडून दलदलीचा भाग काढण्यात आला व तलावाचे पाणी बाहेर जाण्याची वाट खोल करण्यात आली. यास्तव, तुम्ही या क्षेत्राचा नकाशा पहाल तर गालील समुद्राच्या उत्तरेकडे एक हुला तलाव दिसेल; यावरून हा नकाशा प्राचीन काळातील आहे हे समजेल. आज अशी परिस्थिती दिसणार नाही.

तुम्ही या स्थळाला भेट दिल्यावर तुम्हाला असा नैसर्गिक ठेवा दिसून येईल जो हे दाखवील की, पवित्र शास्त्रीय काळात ते क्षेत्र विशेष अशा वनस्पतींचे घर होते, जेथे लव्हाळी व बोरू यांचे जंगल असे.—ईयोब ८:११.

हे क्षेत्र नेहमी बदलणाऱ्‍या पक्षांचे घर होते. बगळे, करकोचा, पानकोळी, कबुतर व इतर बरेच पक्षी येत. कारण येथील दलदल व तलाव युरोप व आफ्रिकेदरम्यान प्रवसन करणाऱ्‍या पक्षांना चांगले आराम करण्याचे ठिकाण होते. (अनुवाद १४:१८; स्तोत्रसंहिता १०२:६; यिर्मया ८:७) या क्षेत्रास योग्य असणारे इतर प्राणी तुरळकपणे दिसले असते, परंतु हुला कुंडातून पार जाण्यास काही मार्ग नसल्यामुळे ते तेथे दिसून शकले नाहीत. यात सिंह, गेंडा लांडगा व रानडुक्कर यांचा समावेश होऊ शकेल. (ईयोब ४०:१५-२४; यिर्मया ४९:१९; ५०:४४; हबक्कुक १:८) येथे काही काळी डासांद्वारे होणारा विषमज्वर होता व याचा उल्लेख पवित्र शास्त्रात दिसतो.

एकाकी प्रवास करणारे प्रवासी तसेच मोठमोठे काफले हा दलदलीचा प्रदेश का टाळीत हे आता समजण्याजोगे आहे. तर मग, गालील समुद्राच्या उत्तरेकडील दरीत ते यार्देन नदी कोठून ओलांडू शकत होते?

गालील समुद्राजवळ कठीण काळ्या रंगाचे खडक होते. यांची बांधाप्रमाणे रचना होती व यामुळेच पाणी मागे साचून हुला कुंड तयार झाले, या काही चित्राचा भाग पान १६ वर दाखविण्यात आला आहे. यार्देन दक्षिणेकडे (दूरवर दिसत असलेल्या) गालील समुद्राकडे घुसताना ती इतकी जोरात वाहते की, तिचे पाणी पांढरे दिसते. हे खरे की, प्राचीन काळी प्रवाश्‍यांना या खोल खिंडीत उतरण्यास व यार्देनेचे पात्र येथून ओलांडण्यास नक्कीच भीती वाटली असावी.

तरीपण हुला कुंडाचा दलदलीचा भाग व या खिंडीदरम्यान एक लहान व सपाटीचा पल्ला आहे जेथे पाण्याचा प्रवाह शांत होतो. येथूनच प्राचीन काळी प्रवासी नदी ओलांडू शकत होते व हाच वचनयुक्‍त देशात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग बनला. आता येथे एक पूल आहे व आजही यार्देन ओलांडण्याचे हे मुख्य ठिकाण आहे.

हे हुला कुंड आज एक सुपीक शेतकीय क्षेत्र बनले आहे. तसेच येथे माशांचे तलावही आहेत. हे सर्व, यार्देन नदीचे पाणी या ठिकाणी मुबलकपणे वाहत राहिल्यामुळे शक्य झाले आहे.

[तळटीपा]

a यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९० च्या कॅलेंडरमध्ये मोठा नकाशा व छायाचित्र यांचे परिक्षण करा.

[१७ पानावरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

हूला

गलील सागर

[Credit Line]

Based on a map copyrighted by Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel.

[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[Picture Credit Lines on page 17]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

Animal photos: Safari-Zoo of Ramat-Gan, Tel Aviv

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा