वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १०/१ पृ. २४-२८
  • देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • न्यायाची का उणीव आहे
  • देवाने अन्यायास का मुभा दिली?
  • देव मानवाच्या साहाय्यास येतो
  • खंडणीस उंचाविणे
  • सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • यहोवा—खऱ्‍या न्यायाचा आणि धार्मिकतेचा स्रोत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १०/१ पृ. २४-२८

देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो

“तो दुर्ग आहे, त्याची कृति अव्यंग आहे. त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्‍वासू देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही. तो नीतीमान व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४.

१. मोशाने आपल्या मृत्युआधी समोर असलेल्या इस्राएल लोकांपुढे गीत गाताना यहोवाच्या कोणत्या गुणांचे ठळकपणे वक्‍तव्य केले?

सर्वोच्च न्यायाधीश, नियंता व राजा असलेल्या यहोवा देवाला “नीती व न्याय ही प्रिय आहेत.” (स्तोत्रसंहिता ३३:५; यशया ३३:२२) नियमशास्त्राचा मध्यस्त तसेच संदेष्टा असणाऱ्‍या आणि “यहोवापाशी समोरासमोर भाषण करणारा” मोशे याला यहोवाच्या न्यायी मार्गांची चांगली ओळख होती. (अनुवाद ३४:१०; योहान १:१२) आपल्या मृत्युआधी मोशाने यहोवाच्या न्यायाच्या उच्चतम गुणाविषयी ठळक असे वक्‍तव्य केले. इस्राएलांची सर्व मंडळी समोर असताना त्याने त्यांच्यापुढे हे शब्द उद्‌गारलेः “हे आकाशा, कान दे, मी बोलत आहे. पृथ्वी माझ्या तोंडचे शब्द ऐको. . . . मी यहोवाच्या नामाची घोषणा करीन; आमच्या देवाचा महिमा वर्णा. तो दुर्ग आहे, त्याची कृति अव्यंग आहे. त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्‍वासू देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही. तो नीतीमान व सरळ आहे.”—अनुवाद ३२:१, ३, ४.

२. देवाच्या सर्व मार्गात न्याय कसा दिसून येतो, आणि हे का महत्त्वाचे आहे?

२ यहोवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो. हा न्याय त्याचे इतर गुण म्हणजे सूज्ञान, प्रेम व सामर्थ्य यांच्याबरोबर नेहमी समतोल असतो. ईयोब ३७:२३ मध्ये देवाचा सेवक अलीहू याने ईयोबाला स्मरण दिलेः “सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे. तो न्याय व धर्म विपरीत करीत नाही.” याचप्रमाणे दावीद राजानेही लिहिलेः “यहोवाला न्याय प्रिय आहे. तो आपल्या निष्ठावंत भक्‍तांस सोडीत नाही.” (स्तोत्रसंहिता ३७:२८) केवढी ही सांत्वनदायी खात्री! देव आपल्या कोणत्याही हालचालीत आपल्या निष्ठावंतांना कधीच त्यागणार नाही. देवाचा न्याय याची हमी देतो!

न्यायाची का उणीव आहे

३. आज मानवात कशाची उणीव आहे, आणि याचा माणसाच्या देवाबरोबरील नातेसंबंधामध्ये कसा परिणाम झाला आहे?

३ यहोवा हा न्यायाचा देव आहे, त्याला न्याय प्रिय आहे व तो “दिगंत पृथ्वीचा उत्पन्‍नकर्ता” देखील आहे; तर मग आज मानवात न्यायाची इतकी उणीव का जाणवते? (यशया ४०:२८) मोशेने या प्रश्‍नाचे अनुवाद ३२:५ मध्ये उत्तर दिले. तो म्हणालाः “हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत; दोष हा त्यांचा आहे, ही हेकट व कुटिल पिढी आहे.” मानवाच्या विनाशकारी हालचालीमुळे तो आपल्या निर्माणकर्त्यापासून इतका दुरावला आहे की, देवाचे विचार व त्याचे मार्ग याविषयीचे वर्णन देताना ते “आकाश पृथ्वीहून उंच आहे,” तितके भिन्‍न असल्याचे दाखवले आहे.—यशया ५५:८, ९.

४. मानवाने कोणता मार्ग निवडून घेतला, आणि यामुळे त्याला कोठे निरवले गेले?

४ माणसाने निर्माणकर्त्याविना स्वतंत्रपणे आपली हालचाल राखावी यासाठी त्याची निर्मिती झाली नव्हती हे विसरु नका. याविषयीचे योग्य मूल्यमापन यिर्मयाने करुन म्हटलेः “हे यहोवा, मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही; पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) मानवाने देवाचा न्यायी मार्ग व त्याचे आधिपत्य धुडकावून लावल्यामुळे तो एका वेगळ्याच व अदृश्‍य प्रभावाखाली आला. हा प्रभाव म्हणजेच दियाबल सैतान व त्याचे दुरात्मे. प्रेषित योहानाने हे ठासून सांगितलेः “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” मानवजातीत न्याय उंचावला गेला पाहिजे याची या दुरात्म्यांना यत्‌किंचितही आस्था नाही.—१ योहान ५:१९.

५. आज जगात न्यायाची उणीव आहे याविषयीची उदाहरणे द्या.

५ या व्यवस्थीकरणाच्या संपणाऱ्‍या दिवसात न्यायाचा किती अभाव आहे याविषयीची प्रचिती १९८४ मध्ये अमेरिकेच्या सरकारतर्फेच्या मुख्य वकिलांनी दिली. विल्यम फ्रेंच स्मिथ यांनी, १२ अमेरिकन राज्यातील १९७७ ते १९८३ च्या दरम्यान तुरुंगवासातील शिक्षेच्या आढाव्यावरील आपले निरिक्षण मांडताना म्हटलेः “खूनी, बलात्कारी, मादक औषधे विकणारे यांना भरपूर शिक्षा मिळत आहे असे लोकांना वाटते. मंडळाचा अभ्यास दाखवितो की, . . . कट्टर गुन्हेगारांना परत मोकळे झाल्यावर रस्त्यावर येऊन नवनवीन गुन्हे करण्याचे केवढे सहजसोपे वाटते.” याबद्दल, वॉशिंग्टन लिगल फौंऊंडेशनच्या पॉल कॅमनेर यांनी म्हटलेः “न्याय व्यवस्था ही बहुधा ढिली वाटते.”

६. (अ) यहुदास गुलामगिरीत नेण्याआधी त्याची नैतिक स्थिती कशी होती? (ब) हबक्कुकने कोणते प्रश्‍न विचारले, व ते आजच्या स्थितीला लागू होणारे आहेत का?

६ इ. स. पूर्वी ६०७ मध्ये बाबेलोन्यांनी यहुदाचे पतन घडवून आणण्याच्या आधी यहुदी राष्ट्रात न्याय ढिला झाला होता. यासाठीच हबक्कुक या देवाच्या संदेष्ट्याला ईश्‍वरी प्रेरणेने हे सांगण्यास सज्ज करण्यात आलेः “कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही. दुष्ट धार्मिकांस घेरुन सोडतो, म्हणून न्याय विपरीत होतो.” (हबक्कुक १:४) या अन्यायी परिस्थितीमुळे न रहावता संदेष्ट्याने यहोवाला विचारलेः “तू या बेईमानी करणाऱ्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यांस दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?” (हबक्कुक १:१३) आज लोकांना देखील मानवी कारभाराच्या विविध क्षेत्रात जो अन्यायाचा अनुभव येतो त्यामुळे हे विचारावेसे वाटते की, पृथ्वीवर जे अन्याय होत आहेत त्याकडे न्यायाचा देव नुसता का पहात आहे? तो ‘न्यायाचे काहीएक का चालू देत नाही?’ तो का “उगा राहतो”? हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत व याला केवळ देवाचे बहुमोल वचन, पवित्र शास्त्रच खरी व समाधानक उत्तरे देऊ शकेल.

देवाने अन्यायास का मुभा दिली?

७. (अ) देवाने मानवाला जे नंदनवन दिले होते ते त्याने का गमावले? (ब) एदेनात कोणते वादविषय उपस्थित झाले, आणि देवाच्या न्यायाने याविषयी कोणता प्रतिसाद दिला?

७ देवाची कार्ये परिपूर्ण आहेत याविषयी मोशाने साक्ष दिली. हे देवाने एदेनातील नंदनवनात जे पहिले मानवी दांपत्य ठेवले होते त्याच्याबाबतीत दिसून आले होते. (उत्पत्ती १:२६, २७; २:७) तेथील सबंध व्यवस्था मानवजातीच्या कल्याण व सौख्यानंदाच्या दृष्टीने परिपूर्ण होती. ईश्‍वरी अहवाल आम्हाला कळवतोः “आपण निर्माण कलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ती १:३१) पण एदेनमधील ही शांती दीर्घकाळ टिकली नाही. एका बंडखोर आत्मिक प्राण्याच्या वर्चस्वाखाली येऊन हव्वा व तिचा पती आदाम यांना, यहोवा हा त्यांच्यावर कोणत्या पद्धतीचे अधिपत्य करीत आहे त्याविषयी वाद प्रस्तुत करण्यासाठी सामोरे आणले गेले. आता देवाने त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या त्या केवढ्या बरोबर आहे याविषयी प्रश्‍न मांडण्यात आला. (उत्पत्ती ३:१-६) देवाच्या अधिपत्याच्या न्यायाविषयी करण्यात आलेल्या आव्हानाद्वारे अधिक महत्त्वपूर्ण नैतिक वादविषय सामोरे आणले गेले. पवित्र शास्त्रातील विश्‍वासू ईयोबाचा अहवाल सुचवितो की, आता तर देवाच्या सर्व प्राणीमात्रांची सचोटी येथे पणाला लावण्यात आली होती. या कारणास्तव, ह्‍या सार्वत्रिक महत्त्वाच्या वादविषयांचे निरसन होण्यासाठी वेळ दिला जाण्यास हवा अशी न्यायाने मागणी केली.—ईयोब १:६-११; २:१-५; तसेच लूक २२:३१ पहा.

८. (अ) आता मानवाला कोणत्या विनाशकारी परिस्थितीत असल्याचे दिसते? (ब) मोशेच्या गायनात कोणती आशेची किरणे दिसतात?

८ देवाच्या न्यायी मार्गांना धुडकावल्यामुळे मानवाने स्वतःवर जी विनाशकारी परिस्थिती ओढवून घेतली त्याविषयीचा गोषवारा प्रेषित पौलाने रोमकर ८:२२ मध्ये उचितपणे मांडला. तो म्हणतोः “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत व वेदना भोगीत आहे.” हे ‘कण्हणे’ व ‘वेदना’ या गोष्टी मानवात न्यायाचा अभाव असल्यामुळे होत आहे; कारण “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) पण न्यायाची पायमल्ली सतत होत राहणार नाही याविषयी आम्ही सर्वसमर्थ देवाचे उपकार मानतो. याविषयीच, मोशाने आपल्या गायनात नंतर जे म्हटले त्याकडे लक्ष द्या. तो अनुवाद ३२:४०, ४१ मध्ये पुढे म्हणालाः “माझ्या सनातन जीविताची शपथ, मी [यहोवा] आपली चमकणारी तरवार पाजविली, आपला हात न्यायाला घातला, तर मी आपल्या विरोध्यांचा सूड घेईन. माझ्या वैऱ्‍यांचे उसने फेडीन.”

९. मानवाने बंड केल्यावर यहोवाने कसा “आपला हात न्यायाला घातला” ते विवेचीत करा.

९ यहोवाने “आपला हात न्यायाला घातला.” हे मागे एदेनमध्ये घडले. त्याने विलंब न लावता, मानवाने त्याच्या आज्ञांचे हेतुपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे त्याला मृत्युची शिक्षा दिली. तो आदामाला म्हणालाः “तू माती आहेस व मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१९) आदामाच्या पापीष्ठ मार्गाक्रमणामुळे त्याने सबंध मानवी कुटुंबाला जे अनर्थकारी परिणाम लावून दिले त्याचा गोषवारा पौलाने काही शतकानंतर विदीत केला. त्याने लिहिलेः “एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले व पापाच्या द्वारे मरण आले; आणि सर्वांनी पाप केल्यावरुन सर्व मनुष्यांत मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

१०. आदामाच्या बंडखोरीपासून कोणत्या दोन संततीची वाढ झाली, आणि यहोवाने याविषयी कसे दळणवळण राखले?

१० मानवाच्या बंडखोरीनंतर देवाने आणखी असे म्हटलेः “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांजमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टांच फोडशील.” (उत्पत्ती ३:१५, १७-१९) या दोन संततीची वाढ सुमारे ६,००० वर्षे होत आली आहे व त्यांच्यातील “वैर” नेहमीच राहिलेले आहे. पण एवढ्या सर्व काळात जगाचे दृश्‍य जरी बदलत राहिले तरी यहोवाच्या न्यायी मार्गात बदल घडला नाही. आपल्या मलाखी संदेष्ट्याद्वारे देवाने कळविलेः “मी यहोवा बदलणारा नव्हे.” (मलाखी ३:६) यामुळे ही खात्री मिळाली की, देवाने अपूर्ण व बंडखोर मानवजातीसोबत जे दळणवळण राखले ते नेहमीच न्यायाचे होते. यहोवा आपल्या उच्च, नीतीमान तत्त्वांपासून कधीच ढळला नाही. त्याने नेहमीच आपणाठायीच्या सूज्ञान, प्रेम व सामर्थ्य या गुणांसोबत यांचा तोल राखला.

देव मानवाच्या साहाय्यास येतो

११, १२. मानवाच्या दैन्यावस्थेचे स्तोत्रसंहिता ४९ कसे योग्य वर्णन देते?

११ मोठा अष्टपाद प्राणी जसे आपले सचेतन तंतु सर्वत्र पसरवून इतर गोष्टींना आपणाकडे ओढून घेतो, त्याचप्रमाणे सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेने देखील आपले जाळे पसरवून सबंध मानवी कुटुंबाला घेरले आहे. होय, मानवी कुटुंबाची केवळ त्यांच्यावरील मरणाच्या दंडाज्ञेमधूनच नव्हे तर अपूर्ण मानवी अधिपत्याच्या निर्दयी व्यवस्थेतूनही सोडवणूक होणे किती जरुरीचे आहे!

१२ मानवावर जेव्हा मृत्युदंड बजावण्यात आला तेव्हापासून त्याची जी दैन्यावस्था झाली, तिचे योग्य वर्णन कोरहपुत्रांच्या या पुढील स्तोत्रात आहे. ते म्हणतातः “अहो सर्व लोकहो, हे ऐका. जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोकहो, तुम्ही सर्व कान द्या. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्‍त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये म्हणून त्याला देवाला खंडणी भरुन देता येत नाही; (कारण त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की, तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार.) (स्तोत्रसंहिता ४९:१, २, ७-९) हे सर्व देवाने जो न्याय केला त्यामुळे घडले!

१३, १४. (अ) मानवाची सुटका केवळ कोण करू शकतो, आणि यासाठी देवाने ज्याला निवडले आहे तो योग्य का आहे? (ब) देवाच्या अभिवचनांच्या बाबतीत येशू “होय” कसा झाला?

१३ मग, मानवाला मदत कोठून मिळणार? कोण त्याला मरणाच्या पकडीतून सोडवू शकणार? तेच स्तोत्र उत्तर देते. ते म्हणतेः “देव माझा जीव शिओलाच्या [अधोलोक] कबजातून सोडवील.” (स्तोत्रसंहिता ४९:१५) न्यायाच्या सहमतात काम करणारे देवाचे थोर प्रेमच मानवाला “शिओलाच्या कबजातून” सोडवू शकेल. आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांना, येशू व सावधगिरी राखणारा परुशी निकदेम यांजमध्ये जे संभाषण झाले त्यामध्ये उत्तर मिळाले. येशूने त्याला म्हटलेः “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) देवाचा पुत्र या पृथ्वीवर येण्याआधी तो स्वर्गात आपल्या पित्यासोबत राहात होता. तो मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात असताना त्याला “मनुष्यजातीच्या ठायी . . . आनंद” वाटे असे म्हटले गेले आहे. (नीतीसूत्रे ८:३१) तर मग, या विशिष्ठ आत्मिक प्राण्याला, त्याच्या एकुलत्या एका पुत्राला मानवजातीची सुटका करण्यासाठी वापरले जावे हे किती योग्य आहे बरे!

१४ येशूविषयी पौलाने म्हटलेः “देवाची अभिवचने कितीही असोत, त्याच्याठायी होय, हे आहे.” (२ करिंथकर १:२०) यापैकीचे एक अभिवचन संदेष्ट्या यशयाने लिखित केले, ज्याचे अवतरण मत्तय १२:१८, २१ मध्ये घेण्यात आले आहे. तेथे आम्ही येशूविषयी असे वाचतोः “पाहा, हा माझा सेवक, ह्‍याला मी निवडले आहे. तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे! त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रीयांना न्याय स्पष्ट करील. परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”—पहा यशया ४२:१-४.

१५, १६. आदामाच्या संततीसाठी येशूला “सनातन पिता” बनणे कसे शक्य झाले?

१५ येशूने आपल्या उपाध्यपणात हे स्पष्ट केले की, सर्व राष्ट्रातील लोकांना त्याच्या नावावर आशा ठेवून देवाकडील न्यायाचा लाभ मिळवता येईल. येशूने म्हटलेः “मनुष्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे.” (मत्तय २०:२८) देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला त्याचा परिपूर्ण कायदा म्हणतोः “जिवाबद्दल जीव” असा मोबदला घ्यावा. (अनुवाद १९:२१) येशूने आपले परिपूर्ण जीवन मरणात दिले व जेव्हा त्याचे स्वर्गात परत जाण्यासाठी देवाच्या सामर्थ्याने पुनरुत्थान झाले तेव्हा तो यहोवाला आदामाच्या जीवनी हक्काच्या मोबदल्यात आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाची सादरता करण्याच्या स्थितीत होता. यामुळेच येशू “शेवटला [किंवा दुसरा] आदाम झाला.” याद्वारे तो आता आदामाच्या सर्व विश्‍वास ठेवणाऱ्‍या संतानासाठी “सनातन पिता” होऊ शकला.—१ करिंथकर १५:४५; यशया ९:६.

१६ आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या खंडणी यज्ञामार्फतच्या प्रेमळ तरतुदीमुळे देवाकडील तारणाचा मार्ग आता ‘स्पष्ट झाला.’ त्यामध्ये खराच न्याय दिसतो. होय, ‘आमचे जीव शिओलाच्या कबजातून मुक्‍त करावे’ म्हणून देवाने हा जो मार्ग तयार करून दिला आहे त्याविषयी आम्हाला केवढी धन्यता वाटली पाहिजे!

खंडणीस उंचाविणे

१७, १८. १८७०च्या काळात सी. टी. रसेल यांनी कोणती भागीदारी घेतली होती, पण १८७८ मध्ये बार्बर यांनी त्यांना कसे चकविले?

१७ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाच्या साक्षीदारांनी आजच्या काळी येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाच्या शिक्षणास नेहमीच उंचावून धरले आहे. याविषयी वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टेझ रसेल यांनी कोणता पवित्रा घेतला होता हे पाहणे मनोरंजक आहे. ते एकेकाळी द हेरल्ड ऑफ द मॉर्निंग या धार्मिक मासिकाचे सहसंपादक व आर्थिक पाठीराखे होते. ते मूळतः न्यूयॉर्कच्या रोचेस्टर येथील एन. एच. बार्बर या ॲडव्हेंटिस्ट द्वारे प्रकाशित केले जात होते. रसेल आपल्या विशीत तर बार्बर त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते.

१८ या दोघांची भागीदारी १८७८ पर्यंत चांगली चालली. पण नंतर बार्बरने खंडणीचे तत्त्व नाकारणारा एक लेख प्रकाशित करून चकित केले. जे घडले त्याचे वर्णन देताना रसेल म्हणालेः “मि. बार्बर यांनी द हेरल्डमध्ये पश्‍चाताप तत्त्वाचा नकार दर्शविणारा लेख प्रकाशित केला, त्यांनी हे नाकारले की, ख्रिस्ताचा मृत्यु ही आदाम व त्याच्या संततीसाठी असणारी खंडणीची किंमत होती. त्यांनी असेही म्हटले की, जसे एका माशीच्या शरीरात टाचणी घुसवून तिला यातना सहन करावयास मरण्यास भाग पाडले जाते आणि हे आपल्या मुलाच्या दुराचारीपणाविषयी जसे न्याय्य समर्थन समजतात तसेच आमच्या प्रभुचे मरण आहे.”

१९. (अ) बार्बरने खंडणीविषयी जे मत प्रतिपादिले त्याविषयी रसेल यांची काय प्रतिक्रिया होती? (ब) द वॉचटावर मासिकाविषयी रसेल यांनी बाळगलेली आशा पूर्ण झाली का?

१९ आपल्या जुन्या मित्रासोबत रसेल वाहवत जाऊ शकत होते, पण त्यांनी तसे स्वतःच्या बाबतीत होऊ दिले नाही. त्यानंतर कित्येक महिने त्या मासिकाच्या पानात वादविवाद छापला जाऊ लागला, बार्बर खंडणीच्या विरुद्ध पण रसेल खंडणीच्या वतीने आपली मते लिहित. सरतेशेवटी रसेल यांनी बार्बरसोबत असणारे सर्व संबंध तोडले व त्यांनी झायन्स वॉच टावर ॲण्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्टस्‌ प्रेझेन्स या नावाचे मासिक सुरु केले. आपल्या नव्या मासिकाविषयी सी. टी. रसेल यांनी असे मत व्यक्‍त केलेः “अगदी सुरवातीपासून ते खंडणीविषयीचे खास प्रवर्तक होते. आणि देवाच्या दयेने आम्ही असे अपेक्षितो की ते शवेटपर्यंत तसेच राहील.” मग, रसेल या संपादकाची आशा पूर्ण झाली का? होय, निश्‍चितपणे! याच्याच स्पष्टीकरणार्थ, या मासिकाच्या दर अंकाच्या २ऱ्‍या पृष्ठावर असे सांगण्यात आले आहेः हे “सध्या राज्य करीत असलेला राजा येशू ख्रिस्त, ज्याने ओतलेल्या रक्‍ताद्वारे मानवजातीस सार्वकालिक जीवनप्राप्तीचा मार्ग मोकळा होत आहे त्याच्यावर विश्‍वास ठेवण्याचे . . . प्रोत्साहन देते.”

२०. तरी अद्याप कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे मिळावयाची आहेत?

२० आतापर्यंतच्या आमच्या चर्चेत आम्ही हे पाहिले की, मानवी कुटुंबावर जी पाप व मृत्युची दंडाज्ञा आहे तिच्यामधून मानवजातीची सुटका करण्याचे माध्यम पुरविण्यासाठी देवाच्या न्यायाने कोणता मार्ग धरला. तो मार्ग प्रेमामुळे उघडा झाला. तरीपण, हे पुढील प्रश्‍न अजूनही बाकी आहेतः येशूच्या खंडणी यज्ञार्पणापासून कसे लाभ मिळतात? तुम्हाला त्याकडून कसा लाभ मिळू शकेल व किती लवकर? पुढील अंकात याची जी उत्तरे आहेत ती देवाच्या सर्व मार्गात न्याय दिसतो यावरील आमच्या आत्मविश्‍वासाला अधिक उंचावू शकतील.

तुम्ही काय उत्तर देणार?

◻ देव न्यायाला केवढे महत्त्व देतो?

◻ मानवजातीत इतका अन्याय का आहे?

◻ माणसाची मरणापासून सुटका व्हावी यासाठी देवाने कशी तरतूद पुरविली?

◻ द वॉचटावर या मासिकाने खंडणीस कितपत उंचावून धरले आहे?

[२५ पानांवरील चित्रं]

मवाबाच्या तळवटीवर मोशे आपल्या गायनाचे शब्द उच्चारीत आहे

[२८ पानांवरील चित्रं]

देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा