वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. ३ पृ. १२-१४
  • एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सगळ्यात चांगलं मार्गदर्शन कोण देऊ शकतं
  • बायबल काय म्हणतं?
    सावध राहा!—२०१७
  • देवाला संतुष्ट करणाऱ्‍या खऱ्‍या शिकवणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबल​—एक भरवशालायक मार्गदर्शक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२४
  • तुम्हाला विश्‍वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. ३ पृ. १२-१४
एक माणूस बायबल वाचत आहे.

एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?

आधीच्या लेखांत आपण पाहिलं, की पुढे आपलं भविष्य चांगलं असावं म्हणून लोक नशिबावर, शिक्षणावर, पैशावर आणि सत्कर्मांवर भरवसा ठेवतात. पण हे सगळे पर्याय, एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी अशा लोकांना रस्ता विचारण्यासारखं आहे ज्यांना स्वतःलाच ते ठिकाण माहीत नाही. मग चांगल्या भविष्यासाठी कोणतंही भरवशालायक मार्गदर्शन नाही, असा याचा अर्थ होतो का? नाही!

सगळ्यात चांगलं मार्गदर्शन कोण देऊ शकतं

महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आपण सहसा मोठ्यांचा आणि ज्यांना चांगली समज आहे अशांचा सल्ला घेतो. अगदी तसंच, चांगल्या भविष्यासाठी आपल्याला अशा एका व्यक्‍तीच्या मार्गदर्शनाची गरज आहे जिला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आणि आपल्यापेक्षा कितीतरी जास्त समज आहे. त्या व्यक्‍तीकडून मिळणारं मार्गदर्शन आपल्याला एका पवित्र ग्रंथात वाचायला मिळतं. त्या ग्रंथाचं लिखाण जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. तो पवित्र ग्रंथ म्हणजे बायबल.

बायबलवर तुम्ही भरवसा का ठेवू शकता? कारण या ग्रंथाचा लेखक अख्ख्या विश्‍वात सगळ्यात बुद्धिमान आहे. त्याचं वर्णन, “अति प्राचीन” आणि “अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत” असणारा असं केलं आहे. (दानीएल ७:९; स्तोत्र ९०:२) तोच ‘आकाश निर्माण करणारा आणि पृथ्वी घडवणारा’ खरा देव आहे. (यशया ४५:१८) आणि बायबलमध्ये त्याने आपलं नाव यहोवा असल्याचं सांगितलं आहे.​—स्तोत्र ८३:१८.

बायबल हे सर्व मानवांच्या निर्माणकर्त्याकडून आलेलं पुस्तक असल्यामुळे ते ठराविक एका संस्कृतीला किंवा वंशाला श्रेष्ठ समजत नाही. बायबलचा सल्ला कोणत्याही काळासाठी लागू होण्यासारखा आहे. आणि तो सगळ्यांनाच फायदेकारक आहे, मग ते कोणत्याही देशातले असोत. बायबल हे एकच असं पुस्तक आहे जे सगळ्यात जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ज्याचं सगळ्यात जास्त प्रमाणात वितरण करण्यात आलं आहे.a याचा अर्थ, जगातले सगळेच लोक ते समजू शकतात आणि त्यापासून त्यांना फायदा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींवरून कळतं, की बायबलमध्ये जे म्हटलं आहे ते अगदी खरं आहे:

“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”​—प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.

आईवडील जसं आपल्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात, अगदी तसंच यहोवा देवसुद्धा एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, म्हणजेच बायबलद्वारे मार्गदर्शन पुरवतो. (२ तीमथ्य ३:१६) देवानेच आपल्याला बनवलं आहे आणि आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय हे आपल्यापेक्षा जास्त त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या वचनावर आपण नक्कीच भरवसा ठेवू शकतो.

भरवशालायक मार्गदर्शन

चित्रं: १. एक मुलगा ट्रेनने प्रवास करत असताना मोबाईलवर वाचत आहे. २. त्याच्या मोबाईलमध्ये बायबल दिसत आहे.

भविष्याबद्दल बायबल जे काही सांगतं त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो. कारण आपल्या काळात कोणत्या घटना  घडतील आणि लोकांचं वागणं  कसं असेल हे बायबलमध्ये जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी अगदी अचूकपणे सांगितलं होतं.

घटना

“एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील.”​—लूक २१:१०, ११.

लोकांचं वागणं

‘शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचं न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले असे असतील.’​—२ तीमथ्य ३:१-४.

बायबलमध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज पूर्ण होताना दिसत आहेत. तर मग तुम्ही काय म्हणाल? तुम्ही साहजिकच हाँगकाँगमध्ये राहणाऱ्‍या लीयाँगने जे म्हटलं त्याच्याशी सहमत असाल. त्याने म्हटलं: “बायबलमधल्या भविष्यवाण्या खूप पूर्वी लिहिल्या होत्या. पुढे होणाऱ्‍या गोष्टींबद्दल इतक्या अचूकपणे सांगणं कोणत्याही मानवाला शक्य नाही. त्यामुळे स्पष्टचए, की बायबल हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि अतिशय बुद्धिमान अशा व्यक्‍तीकडून आहे.”

बायबलमधल्या शेकडो भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत.b त्यांवरून हे सिद्ध होतं, की बायबल हे खरंच देवाचं वचन आहे. यहोवा म्हणतो: “मीच देव आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी सुरुवातीलाच, शेवट काय असेल हे सांगतो.” (यशया ४६:९, १०) त्यामुळे भविष्याबद्दल बायबलमध्ये जे काही सांगितलं आहे, त्यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता.

आत्ता आणि पुढेही उपयोगी पडणारं मार्गदर्शन

पालक आपल्या दोन्ही मुलांचा हात धरून मैदानात चालत आहेत.

पवित्र शास्त्रात मिळणारं मार्गदर्शन पाळल्यामुळे आपल्याला फायदा होतो. त्यात दिलेल्या काही सल्ल्यांचा विचार करा:

पैशाबद्दल आणि कामाबद्दल योग्य दृष्टिकोन

“वाऱ्‍यामागे धावण्यापेक्षा आणि कष्टाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा, विश्रांतीची एक मूठ चांगली.”​—उपदेशक ४:६.

कौटुंबिक जीवन

“तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.”​—इफिसकर ५:३३.

नातेसंबंध

“राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक; संतापाच्या भरात वाईट गोष्टी करू नकोस.”​—स्तोत्र ३७:८.

बायबलमधला सल्ला पाळल्यामुळे आपल्याला आत्ता तर फायदा होतोच, शिवाय एका उज्ज्वल भविष्याची आशाही आपल्याला मिळते. देवाने बायबलमध्ये आपल्याला एक सुंदर भविष्याचं वचन दिलं आहे. त्यात कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला मिळतील त्यांचा विचार करा:

शांती आणि सुरक्षितता

“भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.”​—स्तोत्र ३७:११.

स्वतःचं घर आणि भरपूर अन्‍न

“ते घरं बांधतील आणि त्यांत राहतील, ते द्राक्षांचे मळे लावतील आणि त्यांचं फळ खातील.”​—यशया ६५:२१.

आजार आणि मरण नसेल

“यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”​—प्रकटीकरण २१:४.

अशा प्रकारचं भविष्य मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? ते जाणून घेण्यासाठी पुढचा लेख वाचा.

a बायबलच्या भाषांतराबद्दल आणि वितरणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या आणि बायबलच्या शिकवणी > इतिहास आणि बायबल, या टॅबखाली पाहा.

b अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, १ जानेवारी २००८ च्या टेहळणी बुरूज  अंकातला पृष्ठ २२-२४ वर दिलेला, “यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते,” हा लेख वाचा. हे नियतकालिक jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासाठी लायब्ररी > नियतकालिके या टॅबखाली पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा