वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. ३ पृ. ६-७
  • बायबल काय म्हणतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल काय म्हणतं?
  • सावध राहा!—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • या सर्वांचा काय अर्थ होतो?
    जागृत राहा!
  • जग अंताच्या उंबरठ्यावर?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • नवे जग अगदी जवळ आले आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१७
g17 क्र. ३ पृ. ६-७
एक माणूस देवाने वचन दिलेल्या नवीन जगात

डूम्सडे क्लॉक याचा वापर करून जे अंदाज बांधले जातात ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण देवाने मानवांसाठी आणि पृथ्वीसाठी एका चांगल्या भविष्याचं वचन दिलं आहे

मुख्य विषय | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?

बायबल काय म्हणतं?

जगात असलेल्या आजच्या वाईट परिस्थितीबद्दल बायबलमध्ये अनेक शतकांआधीच भविष्यवाणी करण्यात आली होती. पण, बायबलमध्ये विशेषकरून मानवजातीसाठी असलेल्या चांगल्या भविष्याबद्दल सांगितलं आहे. बायबलमधल्या गोष्टींकडे आपण सहजासहजी दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यात लिहिलेल्या अनेक भविष्यवाण्या अगदी अद्‌भुत रीत्या तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत.

उदाहरणार्थ, बायबलच्या काही भविष्यवाण्यांकडे लक्ष द्या:

  • “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल, आणि ठिकठिकाणी दुष्काळ पडतील व भूकंप होतील.”—मत्तय २४:७.

  • “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल हे लक्षात ठेव. कारण, लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचे न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले,” असे असतील.—२ तीमथ्य ३:१-४.

या भविष्यवाण्यांमध्ये जगाच्या परिस्थितीचं जे वर्णन केलं आहे, त्याबद्दल काही लोक म्हणतील की या जगाची परिस्थिती इतक्या झपाट्याने खराब होत चालली आहे, की त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही. आणि खरंतर हीच आजची वस्तुस्थिती आहे. कारण जग खरंच मानवांच्या नियंत्रणाबाहेर आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे एक कायमचा तोडगा काढण्यासाठी लागणारी बुद्धी आणि शक्‍ती मानवांमध्ये नाही. ही गोष्ट पुढच्या वचनांमधून दिसून येते:

  • “मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.”—नीतिसूत्रे १४:१२.

  • “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.

  • “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

मानव वाटेल ते करत राहिले, तर एक जागतिक विनाश येईल असं वाटू शकतं. पण, असं कधीच होणार नाही. असं का म्हणता येईल? कारण बायबल असं म्हणतं:

  • देवा “तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही.”—स्तोत्र १०४:५.

  • “एक पिढी जाते व दुसरी येते; पृथ्वीच काय ती सदा कायम राहते.”—उपदेशक १:४.

  • “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.

  • “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.”—स्तोत्र ७२:१६.

बायबलच्या या वचनांतून आपल्याला स्पष्ट समज मिळते, की प्रदूषणामुळे, अन्‍नधान्याच्या किंवा पाण्याच्या टंचाईमुळे किंवा मग एखाद्या जागतिक महामारीमुळे मानवजातीचा अंत होणार नाही. तसंच, आण्विक शस्त्रांमुळे या पृथ्वीचाही विनाश होणार नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण जगाच्या भविष्यावर देवाचं पूर्णपणे नियंत्रण आहे. हे खरं आहे, की देवाने मानवांना आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. पण त्यांना त्यांच्या निर्णयांचे परिणाम भोगावे लागतील. (गलतीकर ६:७) हे जग सुसाट वेगाने विनाशाकडे जाणाऱ्‍या एखाद्या अनियंत्रित ट्रेनसारखं नाही. कारण, मानव कितपत हानी करू शकतात याची एक सीमा किंवा मर्यादा देवाने ठरवली आहे.—स्तोत्र ८३:१८; इब्री लोकांना ४:१३.

पण, यासोबतच देव आणखी चांगल्या गोष्टी करणार आहे. तो या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर शांती आणणार आहे. (स्तोत्र ३७:११) या लेखामध्ये ज्या सकारात्मक गोष्टींबद्दल सांगितलं आहे, त्या गोष्टी चांगल्या भविष्याची फक्‍त एक झलक आहे. लाखो यहोवाच्या साक्षीदारांनी बायबलचा अभ्यास करून याबद्दल शिकून घेतलं आहे.

यहोवाच्या साक्षीदारांचा एक जागतिक समाज आहे. तो सर्व वयोगटांतल्या, राष्ट्रांतल्या आणि पार्श्‍वभूमीतल्या स्त्री-पुरुषांनी मिळून बनलेला आहे. बायबलमध्ये ज्याचं नाव यहोवा असं दिलं आहे, त्या खऱ्‍या देवाची ते उपासना करतात. यहोवाच्या साक्षीदारांना भविष्याची भीती वाटत नाही. कारण, बायबल असं म्हणतं: “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली; हा परमेश्‍वर म्हणतो, मीच परमेश्‍वर आहे; अन्य कोणी नव्हे.”—यशया ४५:१८. ◼

पृथ्वीच्या आणि मानवांच्या भविष्याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलं आहे, त्यातल्या फक्‍त थोड्याच गोष्टींवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. आणखी माहिती मिळवण्यासाठी देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाचा पाठ ५ पाहा. हे माहितीपत्रक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं आहे आणि ते www.jw.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

तसंच, तुम्ही www.jw.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेला देवाने पृथ्वी का बनवली? हा व्हिडिओदेखील पाहू शकता. (प्रकाशने > व्हिडिओ इथे पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा