तुम्हाला विश्वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?
“हे परमेश्वरा, [यहोवा, NW] मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मुनष्याच्या हाती नाही. हे परमेश्वरा, [यहोवा, NW] मला शिक्षा कर.”—यिर्मया १०:२३, २४.
पवित्र शास्त्र लेखक, यिर्मयाने हे शब्द सुमारे २५ शतकांआधी लिहिले. मानवजातीची खेदजनक परिस्थिती, हजारो वर्षांसाठी मानवी मार्गदर्शनाचा अवलंब केल्यानंतर या विधानाची अखंडनीय सत्यता शाबीत करते. परंतु तुम्ही विचारू शकता, ‘विश्वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?’
वर उद्धृत केलेले शास्त्रवचन, विश्वसनीय मार्गदर्शन व निदेशाच्या उगमाला दर्शविते जो मनुष्याहून अती श्रेष्ठ आहे—मनुष्याचा निर्माणकर्ता, यहोवा देव. मानवाची घडण आणि त्याच्या गरजांबद्दलची सखोल माहिती नक्कीच आमच्या निर्माणकर्त्याशिवाय इतर कोणालाही ठाऊक नाही. तरीसुद्धा, अशा प्रकारचे मार्गदर्शन व निदेश पुरविण्यात देवाला रुची आहे का? तो ते कसे करतो? ते आमच्या काळासाठी व्यावहारिक आहे का?
ईश्वरी मार्गदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी घडण केली
मनुष्याला प्राण्यांपासून वेगळे करण्याचा प्रमुख फरक, मानवी मेंदूची घडण, क्षमता, आणि त्याच्या कार्यावर केंद्रित आहे हे सर्वत्र प्रचलित आहे. प्राण्यांमध्ये मेंदूच्या जवळ जवळ सर्वच कार्याची रचना, ज्याला उपजत बुद्धी म्हटले आहे त्याप्रमाणे केली आहे. परंतु मानवांच्या बाबतीत तसे नाही.—नीतीसूत्रे ३०:२४-२८.
मानवी मेंदू ठराविक प्रक्रिया-योजनेविना काम करतो, तो प्राण्यांच्या मेंदूपेक्षा वेगळा आहे. देवाने मानवांना इच्छा स्वातंत्र्याची शक्ती बहाल केली जेणेकरून त्यांना बुद्धिमान निर्णय घेण्यास शक्य झाले, तसेच प्रीती, औदार्य, निस्वार्थता, न्याय आणि बुद्धी अशा प्रकारचे श्रेष्ठ गुण प्रदर्शित करता येतात.
देव, मानवाची निर्मिती, मानसिक योग्यतेचा चांगल्याप्रकारे कसा वापर करावा याबद्दलचे थोडेफार देखील मार्गदर्शन न देता करील असा विचार करणे समंजसपणाचे आहे का? देवाने पहिल्या मानवांना थेट मार्गदर्शन दिले. (उत्पत्ती २:१५-१७, १९; ३:८, ९) मनुष्य पापात पडल्यानंतरही, यहोवाने, उल्लेखनीयरीत्या त्याच्या स्वत:चे प्रेरित वचन, पवित्र शास्त्र यातून विश्वासू पुरूष आणि स्त्रियांना मार्गदर्शन पुरवले. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) यामुळे मानवांना, त्यांच्या इच्छा स्वातंत्र्याचा सूज्ञपणे वापर करून जीवनाच्या दररोजच्या समस्यांना यशस्वीरीत्या तोंड देण्याची मुभा मिळाली.
पवित्र शास्त्राचे ईश्वरी लेखकत्व
पवित्र शास्त्राला मार्गदर्शनाचा विश्वसनीय स्त्रोत काय बनवते? पहिली गोष्ट म्हणजे, निमार्णकर्ता पुरवू शकेल अशाचप्रकारची माहिती ते सादर करते. ते, मानवी जीवनाची सुरवात होण्याच्या पूर्वी घडलेल्या घटनांच्या इतिहासाची रूपरेषा देते. उदाहरणार्थ, ते पृथ्वीला, मानवी जीवनाला कायम टिकवून ठेवण्याच्या योग्यतेचे होईपर्यंत यशस्वी टप्प्यांनी कसे तयार केले त्याचा इतिहास सांगते. (उत्पत्ती, अध्याय १, २) ही गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये ३,००० पेक्षा अधिक वर्षांच्या आधी अभिलिखित करण्यात आली असली तरी, ती आधुनिक विज्ञानाच्या कल्पनेशी सुसंगत आहे.
पृथ्वी गोल आहे हे मानवांनी सर्वसामान्यपणे स्वीकारण्याआधी, पवित्र शास्त्राने जाहीर केले: “[देवाने] उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिले आहे, त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.” (ईयोब २६:७) पुढे, पवित्र शास्त्र प्रकट करते की, “तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे, तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत.” (यशया ४०:२२) केवळ देव, जो निर्माणकर्ता आहे तोच ही सविस्तर माहिती देऊ शकतो.
पुढे कोणत्या गोष्टी होणार आहेत याचे भविष्य पाहण्याच्या क्षमतेचे वरदान मानवांना देण्यात आलेले नाही. उलटपक्षी, निर्माणकर्ता पवित्र शास्त्रातून भविष्यातील गोष्टी भाकीत करतो. देवाने स्वतःबद्दल लिहिण्यासाठी संदेष्टा यशयाला प्रेरित केले: ‘मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, मजसमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगतो.’—यशया ४६:९, १०.
पवित्र शास्त्राने हे प्रकट करून दाखवले आहे की ते आश्चर्यकारक तंतोतंपणे आरंभीच शेवट भाकीत करू शकते. उदाहरणार्थ, त्याने मानवी इतिहासाच्या हजारो वर्षांदरम्यान प्रमुख जागतिक सत्तांचा उदय, पाडाव आणि वैशिष्ट्ये याच्याबद्दल भाकीत केले होते. हे उल्लेखनीय भविष्यवाद त्यांच्या पूर्णतेच्या शतकांआधी, काही बाबतीत तर हजारो वर्षांआधी लिहिण्यात आले होते. अशाप्रकारे, पवित्र शास्त्र अगदी अचूकतेने आधुनिक घटना, तसेच त्यांचा अंतिम परिणाम याबद्दल भाकीत करते. पवित्र शास्त्र अतुलनीय आहे कारण ते, अपूर्ण मानव निर्मित सरकारांचा हर्मगिद्दोनात, म्हणजेच ‘सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ होणाऱ्या नाशाच्या दरम्यान त्यातून बचाव मिळण्याचा मार्ग दर्शविते. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, याच्या वर्चस्वाखाली असणारे देवाचे राज्य, हे महत्कृत्य पूर्ण करील.—प्रकटीकरण १६:१४, १६; १७:९-१८; दानीएल, अध्याय २, ८.
सदैव लाभप्रद—कधीच घातक नाही
निव्वळ मानवी बुद्धी अपूर्ण आहे; यास्तव, मानवी सल्ला चांगल्या हेतुंनी दिला गेला असला तरी तो नेहमीच लाभप्रद नसतो. परंतु पवित्र शास्त्राच्या सल्ल्याच्या बाबतीत असे नाही. देव स्वत: असे म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर [यहोवा, NW] तुझा देव तुला शिकवतो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते! मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.
ईश्वरी मार्गदर्शन आम्हाला जीवनातील श्रेष्ठ मूल्यांना प्रथम मांडून त्याला जडून राहण्यासाठी मदत करते. आधुनिक समाज, आर्थिक गुणसंपन्नता व ध्येयांवर जोर देतो. परंतु, ‘दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावा, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत’ ही गोष्ट आमच्यासाठी किती मूल्यवान आहे यावर पवित्र शास्त्र जोर देते. (२ करिंथकर ४:१८) अशारीतीने आम्हाला जीवनात सर्वोत्तम ध्येये, विशेषत:, देवाची इच्छा करण्याच्या संबंधात आध्यात्मिक ध्येये, नवीन व्यवस्थेत सार्वकालिक जीवन मिळवण्याचे अखेरचे ध्येय ठेवण्याचे उत्तेजन दिले आहे.
एखादा ख्रिस्ती जसजसे अशाप्रकारच्या उदात्त ध्येयांचा पाठलाग करण्यासाठी स्वतः परिश्रम घेतो तसे, पवित्र शास्त्राचा सल्ला त्याला, ह्या दुष्ट व्यवस्थीकरणात शक्य असलेल्या उत्तम प्रकारचे जीवन जगण्यासाठी मदत करते. आधुनिक मानवी ज्ञानाचा कल, काम कमी, पगार जास्त ह्या तत्त्वज्ञानाला उत्तेजन देण्याकडे झुकलेला आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, “सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.” प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना असे लिहिले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.”—नीतीसूत्रे १०:४; इब्रीयास १३:१८.
पवित्र शास्त्र, कौटुंबिक व्यवस्थेबद्दल देखील व्यावहारिक सल्ला देते. वैवाहिक व्यवस्थेतील पती आणि पत्नी दोघांच्या भूमिका तसेच मुलांचे संगोपन व शिक्षण देण्याचा योग्य मार्ग याबद्दलच्या सूचना प्रस्थापित करते. ते म्हणते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. . . . आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. मुलांनो, . . . तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत रहा. . . . बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या [यहोवा, NW] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” निर्माणकर्त्याच्या अतिउच्च मार्गदर्शनाला अनुसरल्याने कुटुंबाची स्थिरता आणि आनंद यात भर पडते.—इफिसकर ५:२१–६:४.
देवाचे मार्गदर्शन अनुसरणाऱ्यांसाठी सुरक्षित भवितव्य
देवाचे लिखित वचन, मानवजातीच्या सर्व समस्यांसाठी देवाकडे असलेला उपाय दर्शविते. लवकरच यहोवा देव, सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण तसेच, त्यातील दुःख, अन्याय आणि पीडांना काढून टाकील, व त्याऐवजी त्याचे धार्मिक नवे व्यवस्थीकरण आणील. पवित्र शास्त्र याविषयी २ पेत्र ३:७-१० मध्ये वर्णन करते, आणि त्यात आणखी भर घालून १३ वे वचन म्हणते: “ज्यामध्ये नीतीमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” हे, फार मोठ्या प्रमाणावर मानवजातीला दिल्या जाऊ शकणाऱ्या सर्वात उत्तम सुवार्तेला प्रस्थापित करते. हा अगदी तोच संदेश आहे जो पवित्र शास्त्र सादर करतो, व २०० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये व समुद्रातील बेटांवर यहोवाचे साक्षीदार प्रचार करीत आहेत.
देवाची इच्छा सर्व पृथ्वीवर आचरली जाईल तेव्हा, संपूर्ण मानवी कुटुंबाला, त्याच्या निर्माणकर्त्या यहोवाचे सर्वोत्तम मार्गदर्शन अनुसरल्यामुळे फायदा होईल. ह्यापुढे दारिद्य्र, गुन्हे, व मादक पदार्थांच्या सेवनाची समस्या राहणार नाही. ह्यापुढे मानवजात कधीही आजार, वृद्धापकाळ, व मृत्युमुळे पिडित होणार नाही. आमच्या पहिल्या पालकांची देवाच्या मार्गदर्शनाविरूद्ध बंडाळी करण्याआधी जी पूर्णतेची अवस्था होती त्याच परिपूर्णतेच्या अवस्थेप्रत मानवी कुटुंबाला उन्नत केले जाईल.
पवित्र शास्त्राचे शेवटले पुस्तक, ईश्वरी मार्गदर्शनावर भाव ठेवणाऱ्यांच्या आल्हाददायक परिस्थितीबद्दल किती सुंदर वर्णन करते! प्रकटीकरण २१:४, ५ म्हणते: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” आमच्या निर्माणकर्त्याने असे म्हणून त्याची हमी दिली आहे की, “पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करितो.” शिवाय तो पुढे म्हणतो, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”
आम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करावयाचे आहेत तर, देव आमच्याकडून कशाची अपेक्षा करतो? “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोंहचावे,” अशी देवाची इच्छा असल्याचे प्रेषित पौल स्पष्टीकरण देतो. (१ तीमथ्य २:४) यहोवाचे साक्षीदार तुम्हाला, पवित्र शास्त्राच्या पूर्ण अभ्यासाद्वारे सत्याचे अचूक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हार्दिक निमंत्रण देतात. ईश्वरी इच्छेबद्दल तत्परतेने शिकून घेतल्यावर, ह्या संकटमय काळामध्ये ईश्वरी ज्ञान, विश्वसनीय मार्गदर्शन आहे हेच तुम्हाला तुमच्या अनुभवातून आढळून येईल. काळाची निकड त्याचे अनुकरण पूर्वीपेक्षा अधिक करण्यासाठी अत्यावश्यक बनवते!