काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबल—एक भरवशालायक मार्गदर्शक
आपल्याला कसं वाटतं किंवा इतरांना कसं वाटतं, याच्या आधारावर आपण बरोबर काय आणि चुकीचं काय हे ठरवलं, तर त्याचे परिणाम काय होतील हे माहीत नाही. असं का घडू शकतं हे बायबलमध्ये सांगितलंय. पण बायबलमध्ये फक्त इतकीच माहिती दिलेली नाही, तर बरोबर काय आणि चुकीचं काय हेसुद्धा त्यात सांगितलंय. हे समजून घेतल्यामुळे आपण एक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. कारण आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे
यहोवाa देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला बायबलमधून समजतं. त्याची अशी इच्छा आहे की, माणसांनी स्वतःच्या मनाप्रमाणे वागू नये तर मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे वळावं. (यिर्मया १०:२३) म्हणूनच बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दलचं मार्गदर्शन त्याने बायबलमध्ये दिलंय. त्याचं माणसांवर प्रेम आहे आणि आपण चुकीचे निर्णय घेऊन दुःखी होऊ नये, किंवा स्वतःचं जीवन कठीण बनवू नये असं त्याला वाटतं. (अनुवाद ५:२९; १ योहान ४:८) इतकंच काय तर तो आपला निर्माणकर्ता आहे आणि त्याच्याकडे अफाट बुद्धी आहे. त्यामुळे, बरोबर काय आणि चुकीचं काय हे तोच आपल्याला सांगू शकतो. (स्तोत्र १००:३; १०४:२४) असं असलं तरी, तो लोकांना कधीही त्याच्या स्तरांप्रमाणे जगण्याची जबरदस्ती करत नाही.
यहोवा देवाने पहिल्या स्त्री-पुरुषाला म्हणजे आदाम आणि हव्वाला आनंदी राहण्यासाठी सर्व काही दिलं. (उत्पत्ती १:२८, २९; २:८, १५) त्याने त्यांना खूप सोप्या आज्ञा दिल्या आणि त्याची अशी अपेक्षा होती, की त्यांनी त्या आज्ञा पाळाव्यात. पण त्या आज्ञा पाळायच्या की नाही हे त्याने त्यांच्या हातात सोपवलं. (उत्पत्ती २:९, १६, १७) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम आणि हव्वाने देवाच्या स्तरांप्रमाणे नाही तर स्वतःच्या स्तरांप्रमाणे जीवन जगायचं ठरवलं. (उत्पत्ती ३:६) याचा परिणाम काय झाला? बरोबर काय आणि चुकीचं काय हे स्वतःचं स्वतः ठरवून माणसं आनंदी राहू शकली का? नाही. इतिहास पाहिला तर आपल्याला कळतं की, देवाचे स्तर नाकारल्यामुळे कधीच कायमची शांती आणि आनंद मिळू शकत नाही.—उपदेशक ८:९
आपण कुठेही राहत असलो किंवा आपल्या कुटुंबाची परिस्थिती कशीही असली तरी चांगले निर्णय घेण्यासाठी बायबलमधून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. (२ तीमथ्य ३:१६, १७; “सगळ्या लोकांसाठी असलेलं पुस्तक” ही चौकटसुद्धा पाहा.) बायबल आपल्याला हे मार्गदर्शन कसं देतं ते पुढे पाहा.
बायबलला आपण “देवाचं वचन” का म्हणू शकतो याबद्दल आणखीन जाणून घ्या.—१ थेस्सलनीकाकर २:१३. jw.org वर बायबलचा लेखक कोण आहे? हा व्हिडिओ पाहा.
देवाने आपल्यासाठी कोणतं मार्गदर्शन दिलंय ते आपल्याला बायबलमधून समजतं
यहोवा देवाचं सुरुवतीपासून मानवांशी कसं नातं होतं हे बायबलमधून आपल्याला स्पष्टपणे समजतं. बायबलमधून आपल्याला कळतं, की बरोबर काय आणि चुकीचं काय, फायदेकारक काय आणि धोकादायक काय याबद्दल देवाचे काय विचार आहेत. (स्तोत्रं १९:७, ११) बायबलमधून आपण ज्या गोष्टी शिकतो त्या नेहमीच योग्य असतात आणि त्यांमुळे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल योग्य निर्णय घेता येतात.
उदाहरणार्थ, बायबलमधल्या नीतिवचनांच्या पुस्तकात दिलेल्या या सल्ल्याचा विचार करा. नीतिवचनं १३:२० मध्ये म्हटलंय, “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल पण मूर्खांची संगत धरणाऱ्याचं नुकसान होईल.” हा सल्ला जुन्या काळात जितका योग्य होता तितकाच तो आपल्या आजच्या काळातही आहे. बायबलमध्ये अशाच प्रकारचे व्यावहारिक आणि मोलाचे सल्ले दिलेले आहेत.—“बायबलमधले सल्ले आजच्या काळातही लागू होतात” ही चौकट पाहा.
पण तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘बायबलमध्ये बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल जो सल्ला दिलाय त्यामुळे मला कशी मदत होईल?’ बायबलच्या सल्ल्यामुळे ज्यांना मदत झाली, अशा काही लोकांची उदाहरणं आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.
a बायबलमध्ये देवाचं वैयक्तिक नाव यहोवा असं दिलंय.—स्तोत्र ८३:१८.