स्वित्झर्लंडमध्ये राज्य सभागृहाला सुस्थितीत ठेवताना
नमुना सादरीकरणं
कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-32 पहिलं पान)
प्रश्न: आपल्या सर्वांनाच वाटतं की आपलं कुटुंब आनंदी असावं. तर तुम्हाला काय वाटतं, “कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?”
वचन: लूक ११:२८
सादरता: कुटुंब आनंदी बनवण्यासाठी देवाच्या वचनातील कोणती तत्त्वं आपल्याला मदत करू शकतील, याबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे.
सत्य शिकवा
प्रश्न: भविष्यात काय होणार आहे, हे जाणून घेणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
वचन: यश ४६:१०
सत्य: भविष्यात काय होईल, हे देव त्याच्या वचनांद्वारे आपल्याला सांगतो.
तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
प्रस्तावना: आम्ही कुटुंबाबद्दल असलेला एक लहान व्हिडिओ लोकांना दाखवत आहोत. [तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हा प्रस्तावना व्हिडिओ दाखवा.]
सादरता: या व्हिडिओमध्ये ज्या माहितीपत्रकाबद्दल सांगितलं आहे ते वाचायला तुम्हाला आवडेल का? जर तुमची इच्छा असेल, तर मी त्याची एक प्रत तुम्हाला विनामूल्य देऊ शकतो किंवा ते वेबसाईटवरून कसं डाऊनलोड करता येईल हे दाखवू शकतो.
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.