सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला साक्ष देणं
हे का महत्त्वाचं: यहोवाची इच्छा आहे की “प्रत्येक राष्ट्रात” राहणाऱ्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण व्हाव्यात. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) म्हणून येशूनं सूचित केलं की “सर्व राष्ट्रांस” आणि “सर्व जगात” राहणाऱ्या लोकांना सुवार्तेचा प्रचार केला जाईल. (मत्त. २४:१४) जखऱ्यानं भविष्यवाणी केली की “सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी” बरेच लोक सुवार्ता स्वीकारतील. (जख. ८:२३) प्रेषित योहानाच्या दृष्टांतानुसार, मोठ्या संकटातून जे वाचतील ते “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी” असतील. (प्रकटी. ७:९, १३, १४) त्यामुळं, सेवाकार्य करताना दुसरी भाषा बोलणारी व्यक्ती आपल्याला भेटली तर वरील गोष्टी लक्षात ठेवून आपण तिला साक्ष दिली पाहिजे.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
तुमच्या कौटुंबिक उपासनेत दुसरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला साक्ष देण्याचा सराव करा.