वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. ३-४
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • घरमालक वेगळी भाषा बोलत असल्यास
    आमची राज्य सेवा—२००८
  • आमच्या सेवेत निःपक्षपातीपणा प्रदर्शित करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला साक्ष देणं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. ३-४

वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे

१. आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्रात प्रचार कार्य करताना कोणती संधी मिळते?

१ आपण ज्या भाषेतील सभांना उपस्थित राहतो, शक्यतो त्याच भाषेचे लोक आपल्या क्षेत्रात आपण शोधत असतो. पण आपल्या क्षेत्रातील सर्वच लोकांना यहोवाच्या प्रेमाबद्दल निःपक्षपणे सांगण्यासाठी, वेगळी भाषा बोलणाऱ्‍या लोकांच्या गरजांकडे आपण काळजीपूर्वक ध्यान दिले पाहिजे व त्यांना देवाच्या राज्याचा संदेश सांगण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजे. (स्तो. ८३:१८; प्रे. कृत्ये. १०:३४, ३५) अशा लोकांना आपण कशी मदत करू शकतो?

२. आपल्यासाठी कोणती प्रभावी पुस्तिका पुरवण्यात आली आहे व तिचा वापर करण्यासाठी आपण कशी तयारी करू शकतो?

२ सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा वापर करा: ही पुस्तिका नेहमी जवळ ठेवा. तिच्यातील माहितीशी परिचित व्हा व तिचा उपयोग करण्यासाठी तयारी करा. तुमच्या क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्‍या वेगळ्या भाषेचे साहित्य उपलब्ध असल्यास त्यांचा उपयोग तुम्ही या पुस्तिकेतील संदेश दाखवल्यावर करू शकता. पुनर्भेटीची पक्की व्यवस्था करा.

३. वेगळी भाषा बोलणारी एखादी आस्थेवाईक व्यक्‍ती आपल्याला भेटल्यास आपल्यावर कोणती जबाबदारी येते?

३ पुनर्भेटींची व्यवस्था: एखाद्या व्यक्‍तीला यहोवा व त्याचे वचन बायबल याबद्दल खरोखर आस्था आहे याची तुम्हाला खात्री पटल्यावर तुम्ही लगेचच प्लीज फॉलोअप (S-43) फॉर्म भरून तो मंडळीच्या सचिवाला द्यावा. जेणेकरून सचिव, त्या व्यक्‍तीकडे त्याची भाषा बोलता येणाऱ्‍या एखाद्याला पाठवता यावे म्हणून तो फॉर्म शाखा कार्यालयाला पाठवतील. सचिव त्या फॉर्मची एक प्रत सेवा पर्यवेक्षकांनाही देतील जेणेकरून कोणत्या भाषेच्या गटाने आस्था दाखवली आहे ते त्यांना समजेल. ती भाषा येणारा बांधव जोपर्यत त्या व्यक्‍तीकडे जात नाही तोपर्यत S-43 फॉर्म भरणाऱ्‍या प्रचारकाने त्या व्यक्‍तीकडे जात राहावे. काही बाबतीत या आस्थेवाईक व्यक्‍तिसोबत बायबल अभ्यासही सुरू केला जाऊ शकतो.

४. वेगळी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना आपण भेटतो तेव्हा त्यांच्यासाठी साहित्य मिळवण्याची काय व्यवस्था आहे?

४ वेगळ्या भाषेचे साहित्य: मंडळीने वेगळ्या भाषेचे साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवू नये. पण त्या भाषेच्या गटाचे लोक सत्याबद्दल आस्था दाखवत आहेत असे सेवा पर्यवेक्षकांना वाटले तर ते प्रचारकांना वापरता यावे म्हणून त्या भाषेचे साहित्य मंडळीत पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे ठरवतील. तसेच www.watchtower.org या वेबसाइटवरून शेकडो भाषेत उपलब्ध केलेल्या साहित्याचे प्रिंटआऊटस्‌ घेण्याची व्यवस्था देखील आहे.

५. वेगळी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीची आस्था वाढवण्यात मंडळीची कोणती भूमिका आहे?

५ मंडळीची भूमिका: आस्थेवाईक व्यक्‍तीला शक्य असेल तर तिच्या भाषेत होणाऱ्‍या मंडळीच्या सभांना उपस्थित राहायचे उत्तेजन दिले पाहिजे. पण जर त्या भाषेची सभा ती राहत असलेल्या ठिकाणाजवळ होत नसेल तर तिला तुमच्या मंडळीच्या सभांसाठी आमंत्रित करा. तेथे तिचे केलेले प्रेमळ स्वागत व तिला दाखवलेली वैयक्‍तिक काळजी यांमुळे कदाचित ती सभेला नियमित येऊ लागेल. सुरूवातीला त्या व्यक्‍तीला कदाचित भाषेचा किंवा संस्कृतीचा अडथळा वाटेल. पण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांतील ख्रिस्ती प्रेमात कसलाच अडथळा नाही.—सफ. ३:९; योहा. १३:३५.

६. स्थानिक भाषा शिकून घेणे महत्त्वाचे का आहे?

६ तुम्ही ज्या शहरात किंवा गावात राहता तेथे बोलली जाणारी भाषा तुम्हाला येते का? तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती भाषा शिकू शकता व यामुळे आस्थेवाईकांना तुम्ही चांगली मदत देऊ शकता. स्थानिक भाषा येत असल्याने विरोध करणाऱ्‍यांशीही बोलता येते. लोकांना त्यांच्या भाषेत बोलले तर ते ऐकून घेतात.—प्रे. कृत्ये. २२:१, २.

७. वेगळ्या भाषेचा गट केव्हा तयार केला जाऊ शकतो व असा गट बनवणे गरजेचे आहे हे कशावरून ठरवले जाते?

७ गट तयार करणे: एक ठराविक भाषेचा गट बनवण्यासाठी चार मुख्य गोष्टींची आवश्‍यकता असते. (१)  त्या भाषेतील क्षेत्रात आस्थेवाईक लोकांचे प्रमाण जास्त असायला हवे. (२) प्रचारकांच्या गटाला ती भाषा येत असली पाहिजे किंवा ते ती भाषा शिकत असले पाहिजेत. (३) पुढाकार घेण्यासाठी व आठवड्यातील निदान एक तरी सभा त्या भाषेत चालवण्यासाठी अनुभवी वडील किंवा सेवा सेवक असणे गरजेचे आहे. (४) वडील वर्गाचा या गटाला पाठिंबा असला पाहिजे. या अटी जेव्हा पुरेशा प्रमाणात पूर्ण केल्या जातात तेव्हा वडील वर्ग या गटाविषयीची माहिती शाखा कार्यालयाला कळवतील आणि मंडळीचा साहाय्यक भाषा गट म्हणून त्याविषयी मान्यता मागतील. (संघटीत [इंग्रजी] पृष्ठे १०६-१०७ पाहा.) या गटात पुढाकार घेणाऱ्‍या वडिलांना किंवा सेवा सेवकाला “गट पर्यवेक्षक” किंवा “गट सेवक” म्हटले जाईल व गटाची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

८. आपल्या क्षेत्रातील वेगळी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना मदत करणे हा एक बहुमान का आहे?

८ आपल्या क्षेत्रात वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे, हा आपला आदर्श असणाऱ्‍या येशूने सुरू केलेल्या जगव्याप्त प्रचारकार्य मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. आपण आपली भूमिका आवेशाने पार पाडू या व यहोवा कशा प्रकारे सर्व राष्ट्रांना हालवून त्यांतील निवडक वस्तू आणतो ते पाहू या.—हाग्ग. २:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा