ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आपल्या क्षेत्रात सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करा
हे का महत्त्वाचं: राष्ट्रांतले सर्व भाषा बोलणारे लोक आनंदाच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देतील, अशी भविष्यवाणी जखऱ्याने केली होती. (जख ८:२३) पण त्यांना कोण शिकवणार? (रोम १०:१३-१५) आपल्या क्षेत्रात सर्वांना आनंदाचा संदेश सांगण्याचा बहुमान आणि जबाबदारी आपल्याला मिळाली आहे.—संगठित पृ. ८३-८४ परि. १०-११.
हे कसं करावं:
तयारी करा. दुसरी भाषा बोलणारे लोक तुम्हाला भेटतात का? असल्यास, तुम्ही JW लँग्वेज ॲपचा वापर करून एक सोपं सादरीकरण शिकू शकता किंवा jw.org या वेबसाईटवर त्यांना त्यांच्या भाषेत माहिती कशी शोधता येईल हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून दाखवू शकता
निरीक्षक असा. घरोघरचं प्रचारकार्य करताना, जर तुम्हाला येणारे-जाणारे किंवा कारमध्ये वाट पाहत असलेले लोक दिसले, तर त्यांनासुद्धा प्रचार करा. जर तुम्ही सार्वजनिक साक्षकार्य करत असाल, तर साक्ष देण्यावरच आपलं लक्ष केंद्रित असू द्या
मेहनती असा. प्रत्येक घरात एकाला तरी साक्ष देण्याचा प्रयत्न करा. पहिल्या भेटीदरम्यान घरी कोणी भेटलं नाही, तर तिथे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करत राहा. तुम्ही त्यांच्या घरी कदाचित इतर वेळी किंवा आठवड्याच्या इतर दिवशी जाऊ शकता. काही घरमालकांना पत्राद्वारे, फोनद्वारे किंवा रस्त्यावरचं साक्षकार्य करून साक्ष देण्याची गरज असू शकते
पुन्हा जाऊन भेटत राहा. एखाद्याने संदेशाबद्दल आवड दाखवली, तर त्याला लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करा. जर घरमालक दुसरी भाषा बोलत असेल तर त्याला त्याच्या भाषेत मदत करू शकेल, अशा बांधवाशी त्याची भेट घालून द्या. जो पर्यंत त्या व्यक्तीला त्याची भाषा बोलणारा प्रचारक जाऊन भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याची भेट घेत राहा.—संगठित पृ. ९४ परि. ३९-४०
“पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत” प्रचार करणं, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
दूरच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटण्यासाठी बंधूभगिनींनी कोणती तयारी केली? (१कर ९:२२, २३)
त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं?
त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
तुमच्या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांना भेटण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करू शकता?