इतरांना मदत करण्याचा एक मार्ग कोणता?
अनेक मंडळ्यांत असे प्रचारक आहेत जे शारीरिक रीत्या सुदृढ नसल्यामुळे किंवा वयोवृद्ध असल्यामुळे क्षेत्र सेवेत जास्त भाग घेऊ शकत नाहीत. (२ करिंथ. ४:१६) अशा एखाद्या प्रचारकाला तुम्ही तुमच्या बायबल अभ्यासासाठी सोबत घेऊन जाऊ शकता का? जर प्रचारक घराच्या बाहेर जाऊ शकत नसेल तर त्याच्या किंवा तिच्या घरी तुम्ही बायबल अभ्यास घेऊ शकता. जे प्रचारक आजारी आहेत त्यांना तुम्ही थोड्या वेळाकरता का होईना घरोघरचे साक्षकार्य करण्यासाठी किंवा एकदोन पुनर्भेटी करण्याकरता अधूनमधून घेऊन जाऊ शकता का? बरेच वयस्कर प्रचारक खूप अनुभवी असतात. म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यामुळे फक्त त्यांनाच प्रोत्साहन मिळणार नाही तर तुम्हालाही त्याचा बराच फायदा होईल. (रोम. १:१२) त्याचबरोबर, अशा मार्गांनी इतरांना प्रेम दाखवल्यामुळे यहोवा तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल.—नीति. १९:१७; १ योहा. ३:१७, १८.