ऑक्टोबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा
७ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १७ परि. १-८ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: इफिसकर १-६ (१० मि.)
क्र. १: इफिसकर ४:१-१६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पहिल्याने देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटण्याचा अर्थ काय होतो?—मत्त. ६:३३ (५ मि.)
क्र. ३: एक चांगला आणि एक वाईट मुलगा—बायबल कथा ६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: ऑक्टोबर महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रातील लोकांना ऑक्टोबर – डिसेंबर टेहळणी बुरूज नियतकालिक का आवडेल ते एका मिनिटाच्या आत सांगा. त्यानंतर, मुख्य विषयाचा उपयोग करून, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा व नंतर कोणते शास्त्रवचन वाचू शकतो ते विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: तुमच्यासाठी जे अतोनात श्रम घेतात. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) मंडळीतील दोन वडिलांची मुलाखत घ्या. त्यांना विचारा, ते मंडळीत आणि इतर ईश्वरशासित कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतात? जबाबदाऱ्या सांभाळून ते नोकरी आणि कुटुंब कसे सांभाळतात? ते क्षेत्र सेवेला पहिले स्थान कसे देतात? कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना पाठिंबा कसा मिळतो?
गीत ४२ आणि प्रार्थना