वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१३ पृ. १
  • ऐका आणि शिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऐका आणि शिका
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घेण्यास तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२००९
  • ‘ऐकून ज्ञान वाढवा’
    आमची राज्य सेवा—२००१
  • आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेण्याची एक आनंददायक संधी
    आमची राज्य सेवा—२००८
  • “लोकांना माझ्याजवळ जमव”
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ७/१३ पृ. १

ऐका आणि शिका

१. अधिवेशनात ऐकण्यास आणि शिकण्यास जास्त प्रयत्न का करावे लागतात?

१ लवकरच आपण येणाऱ्‍या २०१३ च्या प्रांतीय अधिवेशनाचा आनंद घेणार आहोत. जगभरातील लोकांच्या सध्याच्या गरजांनुरूप अधिवेशन कार्यक्रम बनवण्यात बरीच मेहनत घेण्यात आली आहे. तुम्ही या अधिवेशनाला तिन्ही दिवस उपस्थित राहण्याची तयारी केली आहे का? मोठ्या अधिवेशनांमध्ये मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावा लागेल. अधिवेशन कार्यक्रम हा नेहमीच्या सभेच्या मानाने मोठा असल्याने आपल्याला आपले लक्ष जास्त वेळ एकाग्र करावे लागेल. तसेच प्रवासामुळे आणि इतर गोष्टींमुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. तर मग, कोणती गोष्ट आपल्याला सतर्क राहण्यास मदत करेल ज्यामुळे आपण ऐकू आणि शिकू शकतो?—अनु. ३१:१२.

२. अधिवेशनासाठी आपण आपले मन कसे तयार करू शकतो?

२ अधिवेशनाला जाण्यापूर्वी: www.jw.org या आपल्या अधिकृत वेबसाईटवर अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका उपलब्ध आहे. यामध्ये सगळ्या भाषणांचे विषय आणि प्रत्येक भाषणाशी निगडित एक किंवा दोन मुख्य वचने दिलेली आहेत. जर आपण इंटरनेटचा वापर करत असू तर ही माहिती आधीच पाहिल्यामुळे अधिवेशनामध्ये जे सादर करण्यात येईल त्यासाठी आपले मन तयार करण्यास आपल्याला मदत मिळेल. (एज्रा ७:१०) तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी अधिवेशन कार्यक्रमाची चर्चा करू शकता का ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला अधिवेशनाची उत्सुकता लागेल?

३. कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

३ अधिवेशनादरम्यान: कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच तुम्ही स्वच्छतागृहाचा वापर करू शकता. तुमचे मोबाईल बंद करा जेणेकरून कॉल किंवा मेसेजमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही किंवा कार्यक्रमादरम्यान दुसऱ्‍यांना मेसेज पाठवण्याचा तुम्हाला मोह होणार नाही. जर तुम्हाला तुमचा मोबाईल चालू ठेवायचाच असेल तर त्यामुळे दुसऱ्‍यांना त्रास होणार नाही याची खातरी करा. जर तुम्ही कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रॉनिक टॅबलेट वापरणार असाल तर दुसऱ्‍यांचे लक्ष विचलित होणार नाही अशा प्रकारे वापरा. कार्यक्रमादरम्यान खाणे-पिणे टाळा. (उप. ३:१) तुमचे लक्ष वक्त्यावर केंद्रित करा, वचने वाचली जातात तेव्हा तुमच्या बायबलमध्ये पाहा व थोडक्यात नोट्‌स घ्या.

४. पालक मुलांना ऐकण्यास आणि शिकण्यास कशी मदत करू शकतात?

४ आपल्या मुलांनी देखील ऐकून शिकावे असे आपल्याला वाटते. नीतिसूत्रे २९:१५ म्हणते: “मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसणे चांगले आहे. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान मुलांचे बोलणे, मेसेज करणे, किंवा इकडे-तिकडे फिरणे चालू आहे की त्यांचे कार्यक्रमाकडे लक्ष आहे हे पालक पाहू शकतात. चाललेला कार्यक्रम मुलांना समजत नसला तरी पालक त्यांना जागे राहण्यास आणि शांत बसण्यास शिकवू शकतात.

५. कार्यक्रमाची उजळणी करणे फायदेकारक का ठरू शकते, आणि ती आपण कशी करू शकतो?

५ अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसानंतर: रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू नका. लवकर झोपून पुरेशी विश्रांती घ्या. ऐकलेल्या गोष्टींची उजळणी केल्याने त्या गोष्टी चांगल्या लक्षात राहू शकतात. त्यामुळे अधिवेशनाच्या प्रत्येक संध्याकाळी संपूर्ण कुटुंब मिळून थोडा वेळ कार्यक्रमावर चर्चा करा. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये तुमच्या मित्रांसोबत जाणार असाल तर तुमच्या सोबत तुमच्या नोट्‌स घेऊ शकता आणि तुम्हाला आवडलेल्या एक किंवा दोन मुद्द्‌यांवर त्यांच्यासोबत चर्चा करू शकता. जेव्हा तुम्ही अधिवेशनावरून घरी याल तेव्हा तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी, शिकलेल्या गोष्टी कुटुंब या नात्याने तुम्ही कशा लागू करू शकता यावर चर्चा करा. नवीन प्रकाशने प्रत्येक आठवडी वाचण्यासाठी तुम्ही ठराविक वेळ बाजूला काढून ठेवू शकता.

६. आपण अधिवेशनाला फक्‍त उपस्थित राहणेच पुरेसे आहे का? स्पष्ट करा.

६ मेजवानीत आलेल्या एखाद्या व्यक्‍तीने जर जेवणाचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला नाही तर मेजवानीचा हेतू साध्य होणार नाही. प्रांतीय अधिवेशनात सादर केल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक मेजवानीच्या बाबतीतही आपण असेच म्हणू शकतो. तर मग, संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याद्वारे, ते काळजीपूर्वक ऐकण्याद्वारे आणि शिकलेल्या गोष्टींचा जीवनात अवलंब करण्याद्वारे आपण या मेजवानीचा पुरेपूर फायदा घेऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा