एक परिणामकारक मोहीम
अधिवेशनाच्या तीन आठवड्यांआधीपासून मंडळ्या पुन्हा एकदा त्यांच्या क्षेत्रातील आस्थेवाईक लोकांना अधिवेशनाचे आमंत्रण देण्याच्या मोहिमेत सहभाग घेतील. ही वार्षिक मोहीम राबवण्याचे चांगले कारण आपल्याजवळ आहे. जे लोक हे आमंत्रण स्वीकारतात व अधिवेशनाला येतात त्यांच्यावर सहसा शास्त्रवचनांवर आधारित भाषणांचा, पूर्णपणे स्वयंसेवकांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या सुसंघटित विभागांचा, आपल्या चांगल्या वागणुकीचा आणि आपल्यातील ऐक्याचा चांगला प्रभाव पडतो. (स्तो. ११०:३; १३३:१; यश. ६५:१३, १४) पण, अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता आस्थेवाईक लोकांना जर दूरचा प्रवास करावा लागत असेल तर अशा वेळीसुद्धा ही मोहीम परिणामकारक ठरते का?
२०११ च्या प्रांतीय अधिवेशनानंतर आपल्या एका शाखा कार्यालयाला एका स्त्रीकडून एक पत्र मिळाले; या स्त्रीला तिच्या दारात अधिवेशनाची एक आमंत्रण पत्रिका मिळाली होती. ही स्त्री सहसा तिच्या घरी येणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना टाळायची. तिने लिहिले: “मला वाटायचं की आनंदी राहण्यासाठी माझ्याजवळ सर्वकाही आहे; चांगलं घर, चांगला नवरा. पण खरं पाहता, सर्वकाही असूनही माझ्या जीवनाला खरा उद्देश नव्हता. म्हणून मी ठरवलं की मी ३२० किलोमीटरचा प्रवास करून शनिवारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन.” या स्त्रीला हे अधिवेशन इतके आवडले की तिने तिच्या पतीला फोन करून कळवले की ती आणखी एक दिवस मुक्काम करून रविवारच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहील. ती पुढे लिहिते, “अधिवेशनात मी सर्व भाषणं ऐकली, अनेक यहोवाच्या साक्षीदारांना भेटले आणि ठरवलं की मी आता एवढ्यावरच थांबणार नाही.” घरी आल्यावर तिने लगेच बायबल अभ्यास सुरू केला आणि चार महिन्यांतच ती बाप्तिस्मारहित प्रचारक बनली. ती लिहिते, “मला माझ्या दारात ती आमंत्रण पत्रिका मिळाली याबद्दल मी कित्ती आभारी आहे! कारण आता माझ्या जीवनाला खरा उद्देश मिळाला आहे.”
ज्यांना ही आमंत्रण पत्रिका मिळेल त्यांपैकी काही जण नक्कीच येतील. म्हणून, या महत्त्वपूर्ण मोहिमेत आवेशाने सहभाग घ्या. उरलेल्या आमंत्रण पत्रिका अधिवेशनाच्या ठिकाणी आणा आणि तेथे अनौपचारिक साक्षकार्य करण्याकरता त्यांचा उपयोग करा.
[२ पानांवरील चित्र]
आमंत्रण पत्रिका कशी सादर कराल?
क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांना आमंत्रण पत्रिका देता यावी म्हणून आपण थोडक्यात बोलले पाहिजे. आपण असे म्हणू शकतो: “नमस्ते, आज जगभरामध्ये सर्व लोकांना एका अधिवेशनाचं आमंत्रण दिलं जात आहे. तेच आमंत्रण आम्ही तुम्हालाही देऊ इच्छितो. त्या अधिवेशनाची आणखी माहिती तुम्हाला यात मिळेल.” उत्साही असा. शनिवारी व रविवारी आमंत्रण पत्रिकेचे वाटप करताना शक्य तेथे नियतकालिकेही सादर करा.