वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०१ पृ. ५
  • ‘ऐकून ज्ञान वाढवा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘ऐकून ज्ञान वाढवा’
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या वचनांकडे लक्ष द्या
    आमची राज्य सेवा—२०००
  • ऐका आणि शिका
    आमची राज्य सेवा—२०१३
  • माणसाचे नव्हे—देवाचे वचन
    आमची राज्य सेवा—१९९०
  • यहोवाचे गौरव करण्याकरता एकत्र जमणे
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ७/०१ पृ. ५

‘ऐकून ज्ञान वाढवा’

१ बायबलमधील नीतिसूत्राच्या पुस्तकात, बुद्धी असे बोलत असल्याचे दाखवण्यात आले आहे, की “ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; . . . माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते, आणि त्याला परमेश्‍वराची दया प्राप्त होते.” (नीति. ८:६, १४, ३२, ३५) या शब्दांवरून आपल्याला, “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनात मिळणाऱ्‍या सूचनेचे अगदी चांगल्याप्रकारे वर्णन मिळते.

२ संपूर्ण जगभरातील बंधूभगिनींना कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे हे पाहण्यात आले आणि त्यानुसार मग त्या आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्यात आला. या अधिवेशनात मिळणाऱ्‍या आध्यात्मिक शिक्षणाचा आणि व्यावहारिक सूचनांचा अवलंब केल्यास आपण आनंदी होऊ, यहोवा देवाबरोबर चांगला नातेसंबंध राखू शकू आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या मार्गावर टिकून राहू शकू. तेव्हा, हा कार्यक्रम ‘ऐकून ज्ञान वाढवायला’ आपल्याजवळ चांगले कारण आहे.—नीति. १:५.

३ कार्यक्रमाआधी: कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपण आपल्या जागेवर बसलो आणि सादर केले जाणारे आध्यात्मिक शिक्षण ग्रहण करण्यासाठी आपले मन तयार केले तरच आपल्याला सर्व कार्यक्रमाचा पूर्ण लाभ होईल. यासाठी वैयक्‍तिक सुनियोजनाची आवश्‍यकता आहे. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठायचे आहे तर रात्री लवकर झोपले पाहिजे. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्यासोबत असलेल्या सर्वांना तयार व्हायला व नाश्‍ता करायला पुरेसा वेळ मिळू शकतो. अधिवेशनाच्या ठिकाणी लवकर आल्यावर तुम्हाला जागा शोधता येईल आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी आवश्‍यक ते सर्व उरकता येईल. अधिवेशन सभागृह सकाळी ८ वाजता उघडले जाईल आणि दररोज सकाळी ९:३० वाजता कार्यक्रमाची सुरवात होईल.

४ या मेळाव्याचा मुख्य उद्देश ‘जनसभेत’ यहोवाची स्तुती करणे हा असल्यामुळे, देवाचा महिमा होईल अशा रितीनेच प्रत्येक कार्यक्रमाची सुरवात झाली पाहिजे. (स्तो. २६:१२) त्यामुळे, सुरवातीच्या गीताची घोषणा होण्याआधीच आम्ही सर्वांना आपापल्या जागेवर बसण्याचे उत्तेजन देतो. “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या” या शास्त्रवचनीय सल्ल्याच्या अनुसार हे आहे. (१ करिंथ. १४:४०) या सर्व गोष्टींचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? संगीतादरम्यान अधिवेशन अध्यक्ष स्टेजवर येऊन बसतात तेव्हा तुम्ही देखील लगेच आपापल्या जागेवर बसावे. यामुळे, प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या गीतामध्ये तुम्हाला पूर्ण मनाने भाग घेता येईल आणि यहोवाची स्तुती करता येईल.—स्तो. १४९:१.

५ कार्यक्रमादरम्यान: एज्राने, ‘परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याकरता’ आपले अंतःकरण तयार केले. (एज्रा ७:१०) यहोवा देत असलेल्या सूचना प्राप्त करण्याकरता आपण आपले अंतःकरण कसे तयार करू शकतो? छापील कार्यक्रमावरील विविध भाषणांचे शीर्षक तुम्ही वाचता तेव्हा स्वतःला विचारा: ‘या कार्यक्रमातून यहोवा मला काय सांगू इच्छितो? माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या लाभास्तव मी या माहितीचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो?’ (यश. ३०:२१; इफिस. ५:१७) संपूर्ण अधिवेशनादरम्यान तुम्ही स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकता. तुम्ही ज्या मुद्द्‌यांचा उपयोग करू इच्छिता ते लिहून घ्या. प्रत्येक दिवसाच्या शेवटी मग त्यांची चर्चा करायला वेळ काढा. यामुळे शिकलेल्या गोष्टी तुमच्या लक्षातही राहतील आणि त्या तुम्ही आपल्या जीवनात लागू देखील करू शकाल.

६ कधीकधी आपल्याला तासन्‌तास लक्ष एकाग्र करायला कठीण वाटत असेल. आपले मन इकडे तिकडे भटकू न देण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमच्या डोळ्याच्या शक्‍तीचा उपयोग करा. आपण ज्या गोष्टीकडे एक टक लावून पाहतो त्यावर आपले लक्ष केंद्रित राहते. (मत्त. ६:२२) तेव्हा, कार्यक्रम चालू असताना होणाऱ्‍या प्रत्येक आवाजाकडे किंवा हालचालीकडे वळून पाहण्याचा मोह टाळा. वक्‍त्‌यावर आपली नजर केंद्रित ठेवा. वचन वाचले जाते तेव्हा तुम्हीही आपल्या बायबलमधून ते वाचा आणि त्या वचनाची चर्चा होत असताना बायबल उघडेच ठेवा.

७ ख्रिस्ती प्रेम आपल्याला, कार्यक्रम चालू असताना इतरांचे लक्ष विचलित होईल असे काहीही करण्याचे टाळण्यास मदत करते. (१ करिंथ. १३:५) हा “मौन धरण्याचा” व ऐकण्याचा समय आहे. (उप. ३:७) यास्तव, अनावश्‍यक बोलणे व इकडेतिकडे फिरणे टाळा. चांगल्याप्रकारे योजना केल्यास, एकसारखे शौचालयाला जाण्याचे देखील आपण कमी करू शकतो. कार्यक्रम चालू असताना काही खाऊ-पिऊ नका. आरोग्याच्या गंभीर समस्या असल्या तर गोष्ट वेगळी. खाण्या-पिण्यासाठी वेळ असतो त्यादरम्यान ते करा. इतरांचे लक्ष विचलित होईल अशाप्रकारे सेल्युलर फोन, पेजर, कॅमकॉर्डर्स, कॅमेरा यांचा उपयोग करू नका. पालकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर—आपल्या किशोरवयीन मुलांबरोबर बसण्याची व्यवस्था करावी. यामुळे ते आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकतात.—नीति. २९:१५.

८ अनेक दशके अधिवेशनांना उपस्थित राहणाऱ्‍या एका वडिलांनी गेल्या वर्षाच्या अधिवेशनाविषयी असे म्हटले: “हे अधिवेशन आणखी एका कारणासाठी उल्लेखनीय होतं असं मला वाटतं. श्रोत्यांमधील बहुतेक लोक, लहान मुलंसुद्धा नोट्‌स घेत होते. हे पाहून मला आनंद वाटला. वक्‍ता जेव्हा बायबलचं वचन सांगायचे तेव्हा सर्व जण आपापलं बायबल उघडून पाहायचे.” अशाप्रकारे लक्ष देऊन ऐकणाऱ्‍यांची खरोखर प्रशंसा केली पाहिजे. यामुळे फक्‍त आपल्यालाच नव्हे तर आपल्यासोबत अधिवेशनात बसलेल्या सर्व बंधूभगिनींना लाभ होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला महान शिक्षक यहोवा देव याचे गौरव होते.—यश. ३०:२०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा