घरमालक वेगळी भाषा बोलत असल्यास
१. क्षेत्रात प्रचार कार्य करताना सहकार्याची अधिक गरज का आहे?
१ संपूर्ण जगभरातील राज्य प्रचारक बऱ्याचदा अशा आस्थेवाईक लोकांना भेटतात जे त्यांच्या मंडळीच्या भाषेऐवजी वेगळी भाषा बोलतात. अशा आस्थेवाईक लोकांना प्रचार करण्याकरता, अनेक शाखा दप्तरांना भाषेचे गट आणि मंडळ्या बनवण्याची गरज भासू लागली आहे. एकाच क्षेत्रात कदाचित अनेक भाषा बोलल्या जात असतील, तर वेगवेगळ्या भाषेच्या अनेक मंडळ्यांना एकाच क्षेत्रात प्रचार कार्य करावे लागत असेल. प्रचार कार्य व्यवस्थित रीतीने पार पाडले जात आहे याची खातरी करण्याकरता या मंडळ्या एकमेकांना सहकार्य कसे देऊ शकतात?—१ करिंथ. १४:३३.
२. घरोघरचे प्रचार कार्य करताना, आपल्या क्षेत्रातील वेगळ्या भाषेच्या गटाला किंवा मंडळीला आपण सहकार्य कसे करू?
२ उत्तम सहकार्य: रस्त्यावरील किंवा अनौपचारिक साक्ष कार्य करताना, एखादा प्रचारक कोणालाही अर्थात वेगळी भाषा बोलत असलेल्या लोकांना निसंकोचपणे साक्ष देऊ शकतो किंवा ज्या भाषेत त्यांना प्रकाशने वाचायला हवीत ती देऊ शकतो. पण, त्याच्या मंडळीचे व दुसऱ्या भाषेच्या गटाचे किंवा मंडळीचे एकच क्षेत्र असल्यास, घरोघरचे कार्य करताना मात्र त्याने त्याच्या मंडळीची भाषा बोलणाऱ्या लोकांच्याच घरी जाण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. वेगवेगळ्या मंडळ्या एकाच क्षेत्रात प्रचार कार्य करत असल्यास, उत्तम रेकॉर्ड ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. सेवा पर्यवेक्षकांनी एकमेकांबरोबर चांगले दळणवळण ठेवले पाहिजे आणि सर्वांना फायदा होईल अशा रीतीने व्यवस्था केली पाहिजे. (नीति. ११:१४) पण घरोघरच्या कार्यात आपण, वेगळी भाषा बोलणाऱ्या कोणाला भेटल्यास आणि त्या भाषेची मंडळी जवळपास नसल्यास, प्रचारकाने अशा व्यक्तीला साक्ष द्यावी व या व्यक्तीने आवड दाखवल्यास त्याला पुढील मदत द्यावी.
३. वेगवेगळ्या भाषेचे गट किंवा मंडळ्या एकाच क्षेत्रात कार्य करत असल्यास क्षेत्र पद्धतशीरपणे कसे नेमले जाऊ शकते?
३ सर्वांचे एकच कार्य: समजा वेगवेगळ्या मंडळ्यांतील प्रचारक, एकाच क्षेत्रात कार्य करत असल्यास काय? क्षेत्रात कोणती भाषा अधिक बोलली जाते त्याच्या आधारावर सेवा पर्यवेक्षक, वेगवेगळ्या भाषेच्या मंडळ्या कोणत्या दिवशी कार्य करणार हे ठरवतील. आणि त्या त्या मंडळ्यांना यांचे टेरिटरी मॅप कार्ड्स दिले जातील. मंडळीकडून एखाद्या टेरिटरीचे मॅप कार्ड मिळाले नसेल तर प्रचारक त्या टेरिटरीमध्ये जाऊन प्रचार करणार नाहीत. ख्रिस्ती प्रेमाला भाषेचे बंधन नसल्यामुळे सर्व प्रचारक, क्षेत्रातील लोकांपर्यंत सत्य पोहंचवण्याचा प्रयत्न करतील. (योहा. १३:३४, ३५) पुढाकार घेणारे बांधव, क्षेत्र कशा रीतीने उरकले जाऊ शकते हे ठरवताना समजूतदारपणा, पद्धतशीरपणा व प्रेम दाखवतील.—याको. ३:१७, १८.
४. आज बायबलमधील कोणत्या भविष्यवाणीची पूर्णता होत आहे?
४ बायबलमध्ये राज्याची सुवार्ता वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना सांगितली जाईल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. (प्रकटी. १४:६, ७) सर्वांनी एकमेकांना चांगले सहकार्य केले तर वेगवेगळ्या भाषेचे गट आणि मंडळ्या त्याच-त्याच घरी जाणार नाहीत. यामुळे अनेक नवीन लोकांना, ज्यामध्ये वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांचाही समावेश होतो, त्यांना सुवार्ता सांगितली जाऊ शकते.—इफिस. ४:१६.