ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जून ३०, २००८ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे ५ ते जून ३० पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. आपण जे दृष्टांत वापरतो ते इतरांना समजत असल्याची खातरी कशी करू शकतो? [be पृ. २४२ परि. ३-पृ. २४३ परि. १]
२. लोकांच्या परिचयाचे दैनंदिन जीवनातील सोपे दृष्टांत अधिक प्रभावकारी का ठरतात? [be पृ. २४५ परि. २-४]
३. दृश्य साधनांचा उपयोग किती प्रभावकारी ठरतो आणि महत्त्वपूर्ण धडे शिकवण्यासाठी यहोवाने त्यांचा वापर कसा केला? (उत्प. १५:५; यिर्म. १८:६; योना ४:१०, ११) [be पृ. २४७ परि. १-२]
४. शिकवण्याच्या कलेत सुधारणा करण्यासाठी आपल्याला दृश्य साधनांचा वापर कसा करता येईल? [be पृ. २४८ परि. १-३]
५. बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना आपण प्रभावकारी दृश्य साधन म्हणून नकाशांचा वापर कसा करू शकतो? [be पृ. २४८ परि. ४]
नेमणूक क्र. १
६. देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने बायबलचा अभ्यास केल्याने काय समजण्यास मदत मिळू शकते? [be पृ. ३२ परि. ३-४]
७. एखाद्या शास्त्रवचनाचा अर्थ आपण बायबलचाच उपयोग करून कसा शोधू शकतो? [be पृ. ३४ परि. ४-पृ. ३५ परि. २]
८. आपल्या दिवसात बाप्तिस्म्याचे खरे महत्त्व काय आहे? [wt पृ. ११५ परि. ११]
९. केवळ बाप्तिस्मा तारणाची हमी का देत नाही? [wt पृ. ११८ परि. १४]
१०. एखादी व्यक्ती भाषणाची रूपरेषा तयार करण्याची सुरुवात साधारणतः कशी करू शकते? [be पृष्ठे ३९-४१]
साप्ताहिक बायबल वाचन
११. कोणते मंदिर “बांधावयास शेचाळीस वर्षे लागली”? (योहा. २:२०) [w०८-MR ४/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—योहान पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१२. “मरणातून जीवनात पार” होणारे हे कोण आहेत? (योहा. ५:२४, २५) [w०८-MR ४/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—योहान पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१३. येशू कशा प्रकारे आपल्या विश्वासू अनुयायांकरता स्वर्गात “जागा तयार” करणार होता? (योहा. १४:२) [w०८-MR ४/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—योहान पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१४. येशूने मरीया मग्दालीया हिला “मला बिलगून बसू नको,” असे का सांगितले? (योहा. २०:१७) [w०८-MR ४/१५ “यहोवाचे वचन सजीव आहे—योहान पुस्तकातील ठळक मुद्दे”]
१५. येशू स्वर्गात जसा गेला “तसाच” येईल हे कोणत्या अर्थाने? (प्रे. कृत्ये १:९-११) [w०५-MR १/१५ पृ. १५, परि. २१]