प्रश्न पेटी
● दोन किंवा अधिक अशा वेगवेगळ्या भाषिक मंडळ्या एकाच क्षेत्रावर प्रचार कार्य करीत असल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
आमची राज्य सेवा याच्या एप्रिल १९८४ च्या अंकात “सुवार्ता सादरता” या सदरात असे म्हणण्यात आले आहेः “प्रत्येक मंडळीच्या प्रचारकांनी आपापल्या विशिष्ट भाषेच्या गटास अनुलक्षून आपले प्रयत्न करावेत.” जेथे मंडळ्या बहुभाषी क्षेत्रावर काम करतात तेथे त्यांना अशा काही वसाहती किंवा इमारती असतील त्यांची यादी तयारी करावी जेथे त्यांच्या प्रचारकांनी भेटी देऊ नयेत. ही विविध मंडळ्यातील सेवा देखरेख्यांची जबाबदारी आहे की त्यांनी एकत्रित बसून कार्य केल्या जाणाऱ्या क्षेत्राचे असे विभाजन करावे जे सर्वसंमत असेल व मग, विशिष्ट क्षेत्रावर आढळणाऱ्या आस्थेवाईक लोकांना ते क्षेत्र ज्या मंडळीचे आहे तेथे निरवावे. यामुळे एकाच घरी सकाळी एका भाषेच्या मंडळीचे लोक तर सायंकाळी दुसऱ्या भाषेच्या मंडळीचे लोक यांनी भेटी देण्याचा प्रकार घडून त्या घरमालकाला त्रागा निर्माण होण्याची गोष्ट टळू शकेल. “ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा करू नये” अशी आमची इच्छा असली पाहिजे.—१ करिंथ. ९:१२.
लोकांनी स्थलांतर केल्यामुळे जेव्हा नोंदीत बदल करण्याची वेळ येते अशावेळी त्या आस्थेवाईक लोकांची नावे व त्यांचे पत्ते हे लगेचच योग्य मंडळीकडे पाठवावेत. यामुळे क्षेत्र रचनेचा अहवाल अद्ययावत ठेवता येईल. येथे प्रेम, सामायिक काळजी, समजदारपणा, व्यवहार्यता आणि सहकार्य महत्त्वाचे आहे.—फिलिप्पै. ४:५.
रस्त्यावरील साक्षीकार्य, अनौपचारिक साक्षीकार्य इत्यादि करताना प्रचारकांना आपल्यासोबत विविध भाषेची प्रकाशने ठेवता येतील. पण तेच, ज्या क्षेत्रावर दोन किंवा अधिक मंडळ्या कार्य करतात तेथे घरोघरचे साक्षीकार्य करतेवेळी आम्ही आपल्या मंडळीची जी भाषा नेमून देण्यात आली आहे त्यावर अधिकपणे एकाग्र राहिले पाहिजे. हे लक्षात असू द्या की, जेथे अशी समस्या आहे तेथे क्षेत्राची वाटणी भाषावार पद्धतीने करण्यात येईल की ज्यामुळे प्रचारकांनी तेथे प्रकाशने दिल्यावर आस्था दाखविणाऱ्या घरमालकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत जी मंडळी सभा चालविते किंवा त्याला जी भाषा ऐकणे आवडते त्या मंडळीकडे निर्देश करता येईल.
हे खरे की या अनुषंगाने आम्ही जे प्रयत्न करू तेथे दोनदा काम होण्याची शक्यता आहे. तरीपण वर नमूद करण्यात आलेल्या लेखात दाखविल्याप्रमाणे “आम्ही प्रचार करताना आमच्या प्रचाराचे उद्दिष्ट, म्हणजेच सत्याचे शिक्षण देण्यासाठी शिष्य बनविणे हे आमच्या मनात अग्रभागी ठेवले पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) हे शिक्षणाचे कार्य लोकांना जी भाषा चांगली समजते त्या भाषेत होण्यास हवे. (१ करिंथ. १४:९)” आमच्या मंडळीत जी भाषा वापरण्यात येते ती भाषा जाणणाऱ्या किंवा ती चालू शकेल अशा लोकांवर लक्ष केंद्रित ठेवून आम्ही आपले उपाध्यपण उरकले तर अधिक लोकांना तारण प्राप्ती मिळवण्यात आम्हाला खूप चांगले ते करता येईल.