मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जून १
“देवाने आपल्याला, जीवन-मार्ग निवडण्याची क्षमता दिली आहे तर आपण योग्य निवड कशाप्रकारे करू शकतो? [उत्तर ऐका. मग अनुवाद ३०:२० वाचा आणि मग पृष्ठ २६ वरील लेख दाखवा.] योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत मिळावी म्हणून या लेखात तीन पायऱ्यांचे वर्णन दिले आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“आज शाळेमधील नैतिक वर्तन अतिशय वाईट झालेले आहे. तेव्हा कोणती गोष्ट आपल्या मुलांना शुद्ध राहण्यास मदत करू शकेल असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका आणि मग नीतिसूत्रे २२:३ वाचा. पृष्ठ १६ वरील लेख दाखवा.] या लेखात काही व्यावहारिक मार्गदर्शन आहे जे शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांना मदत करू शकेल.”
टेहळणी बुरूज जुलै १
समस्यांचा सामना करावा लागत असला तरी आपण आनंदी राहू शकतो का? [उत्तर ऐका.] हे मासिक आपले लक्ष मार्गदर्शनाच्या एका स्रोताकडे वेधते जो जीवनाच्या समस्यांना यशस्वीरीत्या तोंड देण्यास आपली मदत करू शकतो. याशिवाय, खऱ्या आशेत जिवंत ठेवण्याची शक्ती आहे, याविषयी देखील या मासिकात चर्चा करण्यात आलेली आहे.” प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.
सावध राहा! जुलै-सप्टें.
“दहशतवाद हा काही नवीन नाही. पण आजकाल त्यानं संपूर्ण जगभरात थैमान मांडले आहे आणि याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे. तुम्हाला काय वाटतं, असं का घडतंय? [उत्तर ऐका.] सावध राहा! याच्या या अंकात बायबलमधून हे सांगितले आहे, की दहशतवादाचा अंत केव्हा होईल आणि देव या पृथ्वीवर खरी शांती कशी आणेल.” मीखा ४:४ वाचा.