नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज एप्रि. - जून
“आपण दररोज, कुणाच्या तरी दुःखाबद्दल, आजारपणाबद्दल, मृत्यूबद्दल ऐकतो. या सर्व गोष्टींचा कधी अंत होईल, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] लाखो लोकांना आशा देणारं एखादं शास्त्रवचन तुम्हाला ऐकायला आवडेल का? [घरमालकानं होकार दिल्यास योहान ३:१६ वाचा. पृष्ठ २३ काढा.] ‘येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते?’ हे या लेखाचे शीर्षक आहे.”
टेहळणी बुरूज जुलै – सप्टें.
“पुष्कळ लोकांचं म्हणणं असतं, की ते फक्त जे दिसतं त्यावरच विश्वास ठेवतात. तुमचंही त्यांच्यासारखंच मत आहे का? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला पवित्र शास्त्रवचनातून एक वचन वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिल्यास रोमकर १:२० वाचा.] या नियतकालिकात, निसर्गात दिसणाऱ्या देवाच्या तीन गुणांविषयी ठळकपणे सांगण्यात आले आहे. तसेच या गुणांविषयी अधिक माहिती घेतल्याने आपल्यावर कसा परिणाम होतो त्याची चर्चा करण्यात आली आहे. तुम्हाला जर आणखी जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी तुम्हाला या मासिकाची एक प्रत देऊ शकतो.”