मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जून १५
“आजच्या आधुनिक जगात मुलांना शिस्त लावणे एक आव्हानच आहे, हे तुम्हाला नक्कीच पटेल. हो ना? [उत्तर ऐका.] पण पालक हे यशस्वीपणे करू शकतात, या खात्रीच्या शब्दांकडे लक्ष द्या. [नीतिसूत्रे २२:६ वाचा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात पालकांना हे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्यास मदत करण्याकरता व्यावहारिक सल्ला दिला आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“मुलांना वाढवणं एक आव्हान आहे, हे सर्वजण कबूल करतात. पण याला एक आनंददायक अनुभव कसा काय बनवता येईल? [उत्तर ऐका.] सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात, हे प्रभावीपणे कसे करता येईल त्याचे मार्ग सांगितले आहेत.”
टेहळणी बुरूज जुलै १
“संकटकाळात, पुष्कळ लोकांच्या मनात असा प्रश्न येतो, की देवाला लोकांची खरोखरच काळजी आहे का, तो त्यांचं दुःख पाहतो का? तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का? [उत्तर ऐका.] देव आज आपली काळजी कशी घेतो आणि सर्व प्रकारचे दुःख नाहीसे करण्यासाठी त्याने काय तरतूद केली आहे, हे या नियतकालिकात सांगितले आहे.” योहान ३:१६ वाचा.
सावध राहा! एप्रि.-जून
“आपल्या सभोवती आपण पाहत असलेल्या त्रासांचा—युद्ध, हिंसाचार, दहशतवाद यांचा कधी अंत होईल का, असा प्रश्न पुष्कळ लोकांच्या मनात येतो. तुम्हाला काय वाटतं? [उत्तर ऐका.] देवाच्या वचनात ही सांत्वनदायक हमी दिली आहे. [स्तोत्र ४६:८, ९ वाचा.] नजीकच्या भविष्यात देव आपल्याला जी श्रेष्ठ प्रकारची शांती देणार आहे त्या शांतीविषयीच्या काही पैलूंचे वर्णन या मासिकात दिले आहे.”