एका महत्त्वाच्या वैद्यकीय प्रघातावर प्रकाश टाकणारा व्हिडिओपट
अलीकडे कायदा व वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात रुग्णांचे नैतिक दृष्टिकोन व हक्क यांकडे पूर्वीपेक्षा अधिक लक्ष दिले जात आहे. यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांना ज्यांपासून लाभ घेता येईल अशा नवीन उपचारपद्धती समोर येत आहेत. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे या व्हिडिओपटाचा रोख याच विषयावर आहे. हा व्हिडिओ पाहावा व त्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळाले याची उजळणी करावी. सूचना: या व्हिडिओपटात थोड्या अवधीची शस्त्रक्रियेची दृश्ये दाखवण्यात आली आहे, त्यामुळे आपल्या लहान मुलांसोबत हा व्हिडिओपट पाहावा किंवा नाही हे आईवडिलांनी ठरवावे.
(१) वैद्यक क्षेत्रात अलीकडे रक्त संक्रमणांविषयी पुनर्विचार का केला जात आहे? (२) रक्त संक्रमणांशिवाय केल्या जाऊ शकणाऱ्या तीन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची उदाहरणे द्या. (३) जगभरात किती डॉक्टरांनी व शल्यचिकित्सकांनी रक्त संक्रमणाविना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे? ते असे करण्यास का तयार आहेत? (४) रक्ताच्या वापरासंबंधी अलीकडे करण्यात आलेल्या इस्पितळांच्या पाहणीतून काय दिसून आले आहे? (५) रक्त संक्रमणांमुळे आरोग्याला कोणते धोके आहेत? (६) रक्त संक्रमणांऐवजी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी उपचारपद्धतींच्या फायद्यांविषयी अनेक तज्ज्ञ कोणत्या निष्कर्षास पोचले आहेत? (७) रक्तक्षय कशामुळे होतो? मानवांमध्ये कोणत्या पातळीपर्यंत हा रक्तक्षय चालण्याजोगा असतो? यामुळे शरीराला होणारे नुकसान कसे भरून काढता येते? (८) रुग्णाच्या शरीरात लालपेशी भराभर तयार व्हाव्यात म्हणून काय केले जाऊ शकते? (९) शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी व्हावा म्हणून कोणत्या पद्धती वापरल्या जातात? (१०) संक्रमणाऐवजी वापरले जाणारे पर्याय लहान मुलांच्या किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत उपयोगी ठरतात का? (११) उत्तम वैद्यकीय उपचार कोणत्या मुख्य नीतितत्त्वावर आधारित आहे? (१२) ख्रिश्चनांनी रक्ताऐवजी वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धतींपैकी कोणती उपचारपद्धत आपल्याकरता वापरली जावी हे आधीपासूनच ठरवणे महत्त्वाचे का आहे? हे कसे केले जाऊ शकते?
व्हिडिओपटात दाखवलेल्या काही उपचारपद्धती स्वीकाराव्यात किंवा नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या बायबल-प्रशिक्षित विवेकावर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःकरता व तुमच्या मुलांकरता रक्त संक्रमणाऐवजी कोणत्या पद्धती स्वीकाराल हे ठरवले आहे का? कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांना तुमच्या निर्णयाबद्दल व त्यामागच्या कारणांबद्दल पूर्ण माहिती देणे महत्त्वाचे आहे.—टेहळणी बुरूज जून १५, २००४ व ऑक्टोबर १५, २००० अंकांतील “वाचकांचे प्रश्न” ही सदरे पाहावीत.