वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०६ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km १/०६ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. घरमालक पुस्तक घेत नसतील तर जागृत राहा! माहितीपत्रक सादर करा. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. ज्या मंडळ्यांकडे हे पुस्तक नाही त्यांनी प्रकटीकरणाचा कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करा. बायबल अभ्यास सुरु करण्याचा विशेष प्रयत्न करा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती सादर कराव्यात. आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींना पुनर्भेट देताना, तसेच जे नियमित सभांना येत नाहीत पण स्मारकविधी व/किंवा ईश्‍वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात अशा इतर व्यक्‍तींना भेटताना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याचा आपला उद्देश असावा.

▪ एप्रिल महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे या महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याची उत्तम संधी आहे.

▪ फेब्रुवारी पासून, विभागीय पर्यवेक्षकांच्या नव्या जाहीर भाषणाचा विषय, “तुम्ही शांती अनुभवू शकता—आज व सर्वदा” हा असेल. हे जाहीर भाषण देण्यास सुरुवात करण्याची शेवटली तारीख मार्च ५ ही आहे.

▪ या वर्षी बुधवार, एप्रिल १२ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधी पाळण्याकरता मंडळ्यांनी सुयोग्य व्यवस्था कराव्यात. भाषण आधी सुरू करण्यास हरकत नाही, पण बोधचिन्हे उपस्थितांमध्ये फिरवण्यास सूर्यास्त होईपर्यंत सुरुवात करू नये. तुमच्या भागात किती वाजता सूर्यास्त होतो याविषयी तुम्ही संबंधित सूत्रांकडून माहिती मिळवू शकता. प्रत्येक मंडळीने आपापला स्मारकविधी साजरा करावा हे उचित असले तरी ते नेहमीच शक्य नसते. जेथे अनेक मंडळ्या सहसा एकच राज्य सभागृह वापरतात तेथे एक किंवा अनेक मंडळ्या त्या संध्याकाळपुरते दुसरे एखादे सभागृह वापरण्याची व्यवस्था करू शकतात. एकाच सभागृहात होणाऱ्‍या स्मारकविधीच्या दोन कार्यक्रमांदरम्यान कमीत कमी ४० मिनिटांचे अंतर ठेवावे असे आम्ही सुचवू इच्छितो; यामुळे सर्वांना त्या प्रसंगाचा पुरेपूर लाभ घेता येईल. वाहतूक, पार्किंगची सोय, उतारूंची वाहनांमध्ये चढण्याची व उतरण्याची सोय या सर्व गोष्टींवरही विचार करावा. स्थानिकरित्या कोणत्या व्यवस्था उत्तम ठरतील हे वडील वर्गाने ठरवावे.

▪ तुम्ही दुसऱ्‍या एखाद्या देशास प्रवास करणार असाल व तेथे मंडळीच्या सभा, संमेलन अथवा प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची तुमची इच्छा असेल, तर या सभांच्या तारखा, वेळा व स्थाने यांविषयी, त्या देशातील काम पाहणाऱ्‍या शाखा दफ्तराकडे चौकशी करावी. शाखा दफ्तरांचे पत्ते चालू वर्षाच्या वार्षिक पुस्तकाच्या (इंग्रजी) शेवटल्या पानावर दिले आहेत.

▪ मंडळ्यांनी पुढच्या लिटरेचर रिक्वेस्टसोबत वॉचटावर लायब्ररी—२००५ एडिशन सीडी-रॉम्स मागवण्यास सुरुवात करावी. ही सीडी फक्‍त मंडळीतल्या बाप्तिस्मा घेतलेल्या सदस्यांकरताच असून मंडळीकडूनच मागवली जाऊ शकते.

▪ उपलब्ध झालेली नवी प्रकाशने:

बायबल नेमके काय शिकवते? —इंग्रजी मोठ्या अक्षरांत.

हे प्रकाशन स्पेशल रिक्वेस्ट आयटमपैकी असून ज्यांना दृष्टीदोष आहे व लहान अक्षरे वाचणे शक्य नाही केवळ त्यांच्याकरताच उपलब्ध आहे. तेव्हा अशी समस्या असलेल्या प्रचारकांनी विनंती केली असेल तरच या प्रकाशनाकरता ऑर्डर पाठवण्यात यावी. मंडळीच्या सेवा समितीने प्रचारकाला खरोखर गरज आहे का याची खात्री करून संस्थेला पाठवावयाच्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर याविषयी उल्लेख करावा.

टेहळणी बुरूज प्रकाशन विषयसूची २००४ —इंग्रजी

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —निकोबारी

यहोवाचे गुणगान करा (२६ गीते) —उर्दू

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

“पाहा! मी सर्व नवे करतो” —गुजराती, हिन्दी

▪ उपलब्ध असलेल्या नव्या डीव्हीडी:

तरुण लोक विचारतात—मी जीवनात काय करावे? —इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा