ज्योतीसारखी चमकणारी मुले
१. ख्रिस्ती उठून दिसतील हे बायबलमध्ये कशाप्रकारे सूचित करण्यात आले आहे आणि हे शब्द आज ख्रिस्ती मुलांच्या बाबतीत कसे खरे ठरतात?
१ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा.” (मत्त. ५:१४, १६) डोंगराच्या माथ्यावर वसलेले एखादे शहर, सूर्यप्रकाशात चमकते त्याचप्रकारे ते देखील जगात उठून दिसतील. आज अनेक ख्रिस्ती मुले आपल्या उत्तम आचरणाने व आवेशी साक्षकार्याने “ज्योतीसारखे जगात” चमकत आहेत.—फिलिप्पै. २:१५; मला. ३:१८.
२. शिक्षकांना व वर्गसोबत्यांना साक्ष देण्याचे काही मार्ग कोणते?
२ शाळेत: तुम्ही शाळेत साक्ष कशी देऊ शकता? काही मुलांनी वर्गात ड्रग्स, उत्क्रांतीवाद, व नैसर्गिक विपत्ती यांसारख्या विषयांवर समूह चर्चा होतात तेव्हा त्या संधीचा फायदा घेतला. एका बहिणीला दहशतवाद या विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले तेव्हा तिने देवाचे राज्यच मानवजातीकरता खरी आशा आहे याबद्दल साक्ष देण्याकरता या संधीचा उपयोग केला. तिची शिक्षिका तिचा विचारपूर्वक लिहिलेला निबंध वाचून प्रभावित झाली आणि यामुळे आणखी सविस्तर साक्ष देण्याची त्या बहिणीला संधी मिळाली.
३. तुम्ही आपल्या वागण्याबोलण्याने शाळेत आपला प्रकाश कसा चमकवू शकता?
३ ज्योतीसारखे चमकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमचे आचरण व तुमचा शालीन पेहराव. (१ करिंथ. ४:९; १ तीम. २:९) तुमचे वागणेबोलणे इतरांपेक्षा वेगळे आहे हे विद्यार्थी व शिक्षक पाहतात तेव्हा तुमच्या चांगल्या आचरणामुळे काहीजण सत्याकडे आकर्षित होऊ शकतात व तुम्हाला बायबलमधील सत्ये त्यांना सांगण्याची संधी मिळू शकते. (१ पेत्र. २:१२; ३:१, २) देवाला शोभेल असे वागणे नेहमीच सोपे नसते, पण तुम्ही प्रयत्न केल्यास यहोवा तुम्हाला अनेक आशीर्वाद देईल. (१ पेत्र ३:१६, १७; ४:१४) सुवार्तेविषयी जिज्ञासा उत्पन्न करण्यासाठी तुम्ही जेवणाच्या सुटीत बायबलवर आधारित साहित्य वाचू शकता किंवा इतरांना दिसेल अशा ठिकाणी ते ठेवू शकता.
४. शाळेत साक्षकार्य करण्याचे काही फायदे कोणते?
४ शाळेत तुम्ही आपला प्रकाश चमकवता तेव्हा तुमचा विश्वास आणखी दृढ होतो आणि यहोवाची सेवा करण्याबद्दल अभिमान बाळगण्यास मदत मिळते. (यिर्म. ९:२४) तसेच यामुळे तुमचे संरक्षणही होते. एका बहिणीने म्हटले, “माझ्या विश्वासांबद्दल इतरांना सांगण्याचा एक फायदा म्हणजे विद्यार्थी मला बायबलच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी करण्याची गळ घालण्याचा प्रयत्न करत नाहीत.”
५. (क) काही तरुण आपली सेवा कशाप्रकारे वाढवत आहेत? (ख) तुम्ही कोणती आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत?
५ सेवा वाढवणे: अनेक मुले आणखी एका मार्गाने ज्योतीसारखे चमकत आहेत. उच्च माध्यमिक शालेय शिक्षण संपवल्यावर एका बांधवाने राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे ठरवले. येथे तो केवळ एकच वडील असलेल्या एका लहानशा मंडळीत होता. आपल्या मित्राला पत्रात त्याने असे लिहिले: “इथं मी माझ्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद लुटत आहे. सेवेत जाऊन आल्यावर किती तजेला मिळतो. आम्ही प्रत्येक दारी जवळजवळ २० मिनिटे बोलतो, कारण इथं लोक खूप छान ऐकतात; तुम्ही जितकं बोलाल तितकं ते ऐकत राहतात.” पुढे त्याने म्हटले: “प्रत्येक तरुणानं माझ्यासारखं काहीतरी करून, मी जो आनंद अनुभवत आहे तो आनंद अनुभवावा, अशी माझी इच्छा आहे. पूर्ण मनानं यहोवाची सेवा करण्यासारखी उत्तम गोष्ट या जगात नाही.”
६. तुमच्या मंडळीतल्या मुलांचे तुम्हाला का कौतुक करावेसे वाटते?
६ जगात ज्योतीसारखे चमकणाऱ्या तुम्हा मुलांबद्दल आम्हाला किती अभिमान वाटतो! (१ थेस्सल. २:२०) तुम्ही आपल्या पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्तीने यहोवाची सेवा केल्यास तुम्हाला अवश्य प्रतिफळ मिळेल, ‘सांप्रतकाळी शंभरपटीने आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन.’—मार्क १०:२९, ३०; मार्क १२:३०.