आणीबाणीच्या वैद्यकीय प्रसंगासाठी तुम्ही तयार आहात का?
आणीबाणीचा वैद्यकीय प्रसंग आपल्यावर न सांगता केव्हाही येऊ शकतो. (याको. ४:१४) त्यामुळे अशा प्रसंगासाठी एक सुज्ञ व्यक्ती आधीपासूनच होईल तितकी तयारी करून ठेवेल. (नीति. २२:३) असा प्रसंग आल्यास कोणते उपचार व कोणत्या पद्धतींचा तुम्ही स्वीकार कराल याविषयी तुम्ही ठरवले आहे का व तुमचा निर्णय लिहून ठेवला आहे का? याबाबतीत तुम्हाला साहाय्य करण्यासाठी आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर २००६ अंकात, “रक्ताचे अंश आणि माझ्याच रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा निर्णय काय असेल?” या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित करण्यात आला होता.
आगाऊ वैद्यकीय सूचना कार्ड घरून भरून आणण्यास हरकत नाही पण या कार्डवर सही करताना किंवा तारीख घालताना दोन साक्षीदारांच्या समक्ष असे करणे गरजेचे आहे. हे क्षेत्र सेवा गटाच्या पर्यवेक्षकांच्या किंवा दुसऱ्या एखाद्या वडिलांच्या मदतीने राज्य सभागृहात केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की कार्डवरील “साक्षीदारांचे विधान” यात सांगितल्यानुसार साक्षीदारांसमक्ष सही केली जावी. क्षेत्र सेवा गटाच्या पर्यवेक्षकांनी वेळोवेळी, ज्यांनी नवीन कार्ड भरले नाही त्यांना काही मदत हवी आहे का याची चौकशी करावी. दर वर्षी नवे कार्ड भरावे लागेल याची आठवण ठेवावी. प्रचारकांनी नेहमी स्वतःजवळ या कार्डची, झेरॉक्स नव्हे, तर मूळ प्रत बाळगावी.
असे काही उपचार आहेत जे स्वीकारावेत की नाही हे प्रत्येक जण आपल्या विवेकानुसार ठरवू शकतो. त्यामुळे आणीबाणीचा वैद्यकीय प्रसंग उद्भवण्यापर्यंत थांबू नका, तर असा प्रसंग येण्याआधीच तुम्ही कोणते उपचार स्वीकाराल व कोणते नाकाराल याविषयी निर्णय घ्या. कार्ड इंग्रजीत असल्यामुळे त्यावरील माहिती तुम्हाला स्पष्टपणे समजत नसल्यास कृपया मंडळीतील अशा एखाद्या व्यक्तीची मदत घ्या जिला इंग्रजी नीट कळते. इतर प्रचारकांनी त्यांच्या कार्डवर जे लिहिले आहे त्याची नक्कल करण्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने या विषयावर प्रार्थनापूर्वक विचार करावा आणि रक्ताचे अंश व रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय उपचारपद्धतींसंबंधी वैयक्तिक निर्णय घ्यावा. “देवाचे प्रेम” या पुस्तकातील अध्याय ७ व त्यामध्ये दिलेले संदर्भ, तसेच नोव्हेंबर २००६ आमची राज्य सेवा, यातील पुरवणीत दिलेली माहिती तुम्हाला जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास मदत करेल. यानंतर, तुम्ही बाप्तिस्माप्राप्त प्रचारक असल्यास, आगाऊ वैद्यकीय सूचना कार्डवर आपली निवड सूचित करा आणि हे कार्ड नेहमी आपल्यासोबत ठेवा.
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
तुम्ही कोणते उपचार व कोणत्या पद्धतींचा स्वीकार कराल हे ठरवले आहे का व ते लिहून ठेवले आहे का?