वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०८ पृ. ७
  • तुम्ही वेळ लावत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही वेळ लावत आहात का?
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही विलंब लावत आहात का?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • एका महत्त्वाच्या वैद्यकीय प्रघातावर प्रकाश टाकणारा व्हिडिओपट
    आमची राज्य सेवा—२००६
  • महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रघाताची वैशिष्ट्ये दाखवणारा व्हिडिओ
    आमची राज्य सेवा—२००३
  • आणीबाणीच्या वैद्यकीय प्रसंगासाठी तुम्ही तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km १/०८ पृ. ७

तुम्ही वेळ लावत आहात का?

तुम्ही वेळ लावत आहात, कशासाठी? बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांना देण्यात आलेले डिपीए (ड्युरेबल पावर ऑफ ॲटर्नी) कार्ड भरण्यासाठी वेळ लावत आहात का? “तुम्हांला उद्याचे समजत” नसल्यामुळे, आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार व पद्धती स्वीकाराल हे तुम्ही आधीच लेखी स्वरूपात ठरवणे आवश्‍यक आहे. (याको. ४:१४; प्रे. कृत्ये १५:२८, २९) तुम्हाला मदत व्हावी म्हणून संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे हा व्हिडिओपट तयार करण्यात आला आहे. तो व्हिडिओपट पाहा आणि मग प्रार्थनापूर्वक खाली दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करून उजळणी करा.—नोंद: या व्हिडिओपटात ऑपरेशनची काही दृश्‍ये आहेत. तेव्हा पालकांनी हा व्हिडिओपट आपल्या मुलांबरोबर पाहावा किंवा नाही, हे ठरवावे.

(१) वैद्यक क्षेत्रात अलीकडे रक्‍त संक्रमणांविषयी पुनर्विचार का केला जात आहे? (२) रक्‍त संक्रमणांशिवाय करण्यात आलेल्या तीन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची उदाहरणे द्या. (३) जगभरात किती डॉक्टरांनी व शल्यचिकित्सकांनी रक्‍त संक्रमणाविना रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आहे? ते असे करण्यास का तयार आहेत? (४) रक्‍ताच्या वापरासंबंधी अलीकडे करण्यात आलेल्या इस्पितळांच्या पाहणीतून काय दिसून आले आहे? (५) रक्‍त संक्रमणांमुळे आरोग्याला कोणते धोके आहेत? (६) रक्‍त संक्रमणांऐवजी वापरल्या जाणाऱ्‍या पर्यायी उपचारपद्धतींच्या फायद्यांविषयी अनेक तज्ज्ञ कोणत्या निष्कर्षास पोचले आहेत? (७) रक्‍तक्षय कशामुळे होतो? मानवांमध्ये कोणत्या पातळीपर्यंत हा रक्‍तक्षय चालण्याजोगा असतो? यामुळे शरीराला होणारे नुकसान कसे भरून काढता येते? (८) रुग्णाच्या शरीरात लालपेशी भराभर तयार व्हाव्यात म्हणून काय केले जाऊ शकते? (९) शस्त्रक्रियेदरम्यान रक्‍तस्राव कमी व्हावा म्हणून कोणत्या पद्धती वापरल्या जातात? (१०) संक्रमणाऐवजी वापरले जाणारे पर्याय लहान मुलांच्या किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत उपयोगी ठरतात का? (११) उत्तम वैद्यकीय उपचार कोणत्या मुख्य नीतितत्त्वावर आधारित आहे? (१२) ख्रिश्‍चनांनी रक्‍ताऐवजी वापरल्या जाणाऱ्‍या उपचारपद्धतींपैकी कोणती उपचारपद्धत आपल्याकरता वापरली जावी हे आधीपासूनच ठरवणे महत्त्वाचे का आहे? हे कसे केले जाऊ शकते?

व्हिडिओपटात दाखवलेल्या काही उपचारपद्धती स्वीकाराव्यात किंवा नाही हे प्रत्येक व्यक्‍तीच्या बायबल-प्रशिक्षित विवेकावर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःकरता व तुमच्या मुलांकरता यांपैकी कोणत्या पद्धती स्वीकाराल हे ठरवले आहे का? या बाबतीत आणखी सखोल माहितीकरता कृपया टेहळणी बुरूज जून १५, २००४ व ऑक्टोबर १५, २००० अंकांतील “वाचकांचे प्रश्‍न” ही सदरे आणि आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ अंकातील “रक्‍ताचे अंश आणि माझ्याच रक्‍ताचा वापर करणाऱ्‍या वैद्यकीय प्रक्रियांविषयी माझा काय निर्णय असेल?” ही पुरवणी पाहा. डिपीए कार्डवर तुम्ही ज्यांचे नाव दिले आहे त्यांना व तुमच्या कुटुंबातील साक्षीदार नसलेल्या सदस्यांना तुमच्या निर्णयाबद्दल व त्यामागच्या कारणांबद्दल पूर्ण माहिती देणे महत्त्वाचे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा